Total Pageviews

Wednesday, 28 September 2011

SAVE GIRL CHILD

स्त्री भ्रूण हत्येच्या छायेखाली भारत ********बाळकृष्ण पाडळकर जबाबदारी वैद्यकीय क्षेत्रावर आहे.जात,धर्म, लिंग, पंथ यांच्याशी प्रतारणा करण्याची शपथ मेडिकल डिग्री घेताना घेतल्याचे हे सुशिक्षित लोक थोड्या पैस्याकरिता विसरले आहेतकि कांय असे वाटते..फार पूर्वीपासून स्त्री अपत्या विषइचा आकस समाजात आहे.वेग-वेगळ्या वेळी त्याची वेग-वेगळी कारणे पुढे आली आहे.परंतु स्त्री मुल नको हि या मागची सर्व-साधारण भावना आहे.फार-पूर्वी स्त्री-मुल जन्मल्याबरोबर हत्या करीत.घरातील कोणीही याला विरोध करीत नसे.आई एक तर घरातील लोकांचा विरोध ओढून घेण्यास तयार नसे ,किवा तिला गप्प केले जात.या दिव्यातून मुलगी वाचली तर पुढे तिचा गळा आवळून तिला मारण्यात येई .असे प्रकार
मुख्तः ग्रामीण भागातच घडत, म्हणून त्याची दाखल अथवा बोभाटा होत नसे.परंतु नवीन तंत्र-ज्ञानाने असे अघोरी प्रकार करण्याची गरजच उरली नाही.गर्भातील मुलगी नको असेल तर लगेच गर्भ-पात करून घेऊन सारे कसे आलबेल आहे असा आभास आता निर्माण केला जातो.मुलीना फक्त भ्रूण-हत्तेलाच तोंड द्यावे लागते असे नाही तर या दिव्यातून त्य बाहेर पडल्या तर आयुष्य भर त्यांना भेद-भावाला तोंड द्यावे लागते.बालपण शहरी भागात जरी सामान्य वाटत असले तरी ग्रामीण भागात ते भयंकर आहे.मुलांना चांगली पुस्तके, कपडे खाणे तर मुलीना साफ-सफाई ,झाडू आणि अश्रू वाट्याला येतात.आणि आपल्या आईबरोबर शिळे-पाके खावे लागते.आजही राजस्थान, हरियाना उत्तर-प्रदेशात मुली फार कमी वयाच्या असताना त्यांचे लग्न करून दिले जाते, पुन्हा एकदा परावलंबी आर्थिक पार तंत्रातील जीवन सुरु होते. नको असलेली एकामागून एक येणारी बाळंतपण या दुष्ट चक्रात अडकतात.जर त्यांचे नशीब बल-वत्तर असेल तर पुत्र प्राप्ती झाल्यावर थोडा फरक पडतो मात्र जर मुलगी झाली तर आईच जी स्थिती तीच मुलीची होते. जगातील महासत्ता बनणाऱ्या भारताची हि आंतरिक स्थिती आहे .समानता हा मुल-भूत हक्क घटनेने सर्वाना दिला आहे. मग जन्मा -अगोदर हत्या केली जाणार्या मुलीना जन्म्ण्याचा जगण्याचा हक्क का डावलला जातो?कायद्याने गर्भ-पात करण्यची मुभा दिली स्त्री भ्रूण हत्येच्या छायेखाली भारत (भाग )
या देशाला अनेक दुष्ट वृतिनी घेरले आहे.काळापैसा,भ्रष्टाचार ,दुर्धर रोगराई यांनी आक्राळ-विक्राळ रूप धारण केलेले आज आपल्याला दिसते.उद्या 'स्त्री भ्रूण-हत्या"हि त्यांच्या पंगतीत जाऊन बसण्यासाठी कटिबद्ध आहे .स्त्री भ्रूण हत्या हि समस्या आज-कालच निर्माण झाली असे नाही तर या समसेला इतिहास आहे,परंतु आजच्या एवढे बिकट स्वरूप पूर्वी या समसेने धारण केले नव्हते.पुरुष -प्रधान संस्कृती बर्याच प्रमाणात काळ-बाह्य झाली असली तरी विकासाचे ध्येय गाठू शकणार्या मुलीना समाजाने पाहिजे तेव्हडे हक्क प्रदान केले नाही.त्यामुळे समाजाची प्रगती
खुरटली .वास्तविक मुलीना हक्क नाकारणे म्हणजे देशाच्या प्रगतीला नकार देण्यासारखे आहे.मुलीची संख्या देशात कमी होण्यासाठीची संपूर्ण आहे ,पण मुलगी म्हणून गर्भ-पाताच्या नावाखाली हत्या करण्याची मुभा त्यांना कोणी दिली ?त्यांना सहाय्य करणारे या गुन्ह्यात त्यांचे साथीदार नाहीत का?दुर्देवाची बाब असी आहे कि बर्याच अयादेखील भ्रूण-हत्येची पाठ-राखण करणाऱ्या आहेत.त्यामुळे हि समस्या फार जटील झाली आहे,आणि त्यावर रामबाण तोडगा शोधून काढणे अवघड होऊन बसले आहे.सोनो-ग्राफी ,अल्ट्रा-साउंड हि तंत्र-ज्ञाने माणसाला वरदान ठरत शाप ठरत आहे.निदान भारतात तरी आज तसे दृश दिसत आहे या वरदानाने राक्षसा सारखे आक्राळ-विक्राळ रूप -विशेषतः खेड्या-पाड्यातूनधारण केलेले दिसत आहे.गर्भ-पात गर्भारपणात योग्य वेळी करावा असा नियम आहे ज्या-मूळे आईच्या जीवाला कमी धोका संभवतो. उशिरा गर्भ-पात करण्यास कोणीही धजावत नाही.पण नियम धाब्यावर बसवून खूप उशिरा देखीलस्त्री भ्रूण हत्येची शस्त्र-क्रिया केली जाते.स्वतः चा जीव धोक्यात घालून आया असा धोका पत्करतात.भारतात ५०० कोटी रुपयाव्च्या जवळ-पास उलाढाल असलेला हा व्यवसाय आहे, त्यात डॉक्टर ,नर्सेस, प्रशिक्षित नसलेल्या व्यक्ती सर्रास काम करतात.असे गर्भ-पात करताना मृत्यू झालेल्या महिलांची नोंदही बर्याच वेळा सरकार-दरबारी नसते.गर्भ-निदान गर्भ-निश्चिती हे तंत्र-ज्ञान खेड्या-पाड्यात पोहोचले आहे.ज्याचे प्रमाण पंजाब , हरियाना मध्ये सर्वात जास्त आहे.पहिल्या अपत्याचे वेळीही या टेस्ट करून घे ण्यात कुटुंबाचा काळ दिसून आला आहे.उघडच आहे कि नुकतीच डिग्री घेऊन बाहेर पडलेल्या डॉक्टरांची त्यात चांगली कमाईहोते.हल्ली मशीनच्याही किमती परवडण्या सारख्या आहेत.असे करताना डॉक्टरांना जराही भीती वाटत नाही. जरी तंत्र -ज्ञानाचा उपयोग अयोग्य रीतीने होऊ नये असा जरी कायदा असला तरी कदाचित डॉक्टरांच्या हे ध्यानी-मनीही नसावे.इंडिअन मेडिकल असो.नेही या कारणाकरिता कुणाचेही लायसेन्स रद्ध केल्याचे ऐकिवात नाही मुलीना मारण्याचे शस्त्र सर्रास वापरात असले तरी कोणीही कोणाचे वाकडे करु शकत नाही हि वस्तू-स्तिथी आहे. या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीची तर अशी भावना आहे कि ते पेशण्टला सेवा देत आहेत त्यांच्यावर उपकार करीत आहेत.तर काहीना असे वाटते कि नको असलेली संतान जन्माला घालून ते समाज-कार्य करीत आहेत.गर्भ-परीक्षणासाठी असलेल्या नियमाला काट देण्यासाठी मुलगा आहे कि मुलगी हे सांगण्यासाठी बर्याच वेळा सांकेतिक भाषा वापरली जाते.युनोच्या अहवालानुसार दरवर्षी ७५०००० भारतात मुलींची भ्रूण-हत्या हाते
 

No comments:

Post a Comment