Total Pageviews

Tuesday, 27 September 2011

CORRUPT RTO

लाचखोरीची नशा!
लाच दिली नाही म्हणून उत्तर प्रदेश परिवहन कार्यालयाच्या कर्मचार्‍यांनी एका ट्रकचालकाला बेदम मारहाण केली आणि त्याचा जीव घेतला. आनंदलाल गुप्ता या ट्रकचालकाकडून या कर्मचार्‍यांना एक हजार रुपयांची लाच हवी होती. मात्र गुप्ता यांच्या ट्रकमधील सामानाचे वजन नियमबाह्य नसल्याने त्यांनी एक हजार रुपये देण्यास नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या आरटीओ कर्मचार्‍यांनी त्यांना एवढी मारहाण केली की त्यात त्यांचा मृत्यू झाला. लाचखोरीच्या जाळ्यात गेल्या काही दिवसांत विविध सरकारी खात्यांचे वरिष्ठ अधिकारी अडकले कोठडीत गेले. मात्र अशा काही घटना घडल्या की, लाचखोरीचा रोग जराही कमी झालेला नाही हेच स्पष्ट होते. मध्यंतरी अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरोधी आंदोलनामुळे देशभरात भ्रष्टाचार आणि लाचखोरीविरोधात माहोल वगैरे निर्माण झाला होता. जनलोकपालामुळे या देशातून आता लाचखोरीचा रोग समूळ नष्ट होईल असे म्हटले गेले. मात्र त्यानंतरही मुंबई महापालिकेचे एक उपायुक्त लाच घेतानारोकडे’ सापडले. आता तर उत्तर प्रदेशमधील आरटीओ कर्मचार्‍यांनी एका ट्रकचालकाचा जीवच घेतला. हा सरळ सरळ खुनाचाच प्रकार म्हटला पाहिजे. लाच घेणे आणि लाच देणे हा आपल्या देशात कायद्याने गुन्हा आहे. तरीही तो सर्रास केला जात असतो. मात्र उत्तर प्रदेशच्या आरटीओ कर्मचार्‍यांनी लाच देणे हादेखील गुन्हा ठरविला. तोदेखील देहान्त प्रायश्‍चित्ताचा. फक्त एक हजार रुपयांसाठी त्यांनी ट्रकचालकाचा बळी घेतला. आरटीओ किंवा विशेष वाहतूक शाखेतील पोलीस मंडळी रस्त्यावरून धावणार्‍या ट्रकचालकांकडून हप्तावसुली करण्यासाठी तसे बदनामच आहेत. कोणतेच राज्य त्याला अपवाद नाही. राज्य, राष्ट्रीय महामार्गांवरील चेकपोस्ट हे तर अशा लाचखोरीसाठी कुप्रसिद्धच आहेत. महाराष्ट्र आरटीओच्या घोटाळ्यांचेही वाभाडे यापूर्वी अनेकदा निघाले आहेत. त्यामुळे ट्रकचालक आणि लाचखोर आरटीओ कर्मचारी किंवा महामार्ग पोलीस यांचे नाते हे असेदेण्या-घेण्या’चेच आहे. मात्र लाचखोरीच्या नशेने बेभान झालेल्या उत्तर प्रदेश आरटीओच्या कर्मचार्‍यांनी यानात्या’चे पालन करणार्‍या ट्रकचालकाचा बळीच घेतला

No comments:

Post a Comment