Total Pageviews

Wednesday 14 September 2011

THIRD CORRUPT POLICE MEN CAUGHT IN A MONTH

लाच स्वीकारताना पोलिस उपनिरीक्षकाला अटक
सकाळ वृत्तसेवा
Thursday, September 15, 2011 AT 03:30 AM (IST)
Tags: mira road,   bribe,   police,   crime,   arrest,   mumbai
मिरा रोड - एका विकसकाकडून पन्नास हजार रुपयांची लाच स्वीकारताना भाईंदर पोलिस ठाण्यातील एका उपनिरीक्षकाला आज (ता.14) लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. शिवशंकर मोरे असे या उपनिरीक्षकाचे नाव आहे. मिरा-भाईंदर परिसरात लाचखोरीप्रकरणी पोलिसाला अटक झाल्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे.

मिरा-भाईंदर परिसरातील विकसक इक्‍बाल शेख महाडिक यांचे भाईंदर पश्‍चिमेकडे इमारत बांधण्याचे काम सुरू आहे. या जागेच्या मालकी हक्काच्या वादातून एका महिलेने भाईंदर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीच्या तपासादरम्यान त्रास न देण्यासाठी मोरे याने महाडिक यांच्याकडे पाच लाख रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर महाडिक यांनी दोन लाख रुपये देण्याची तयारी दर्शविली होती. त्यापैकी 75 हजार रुपयांचा पहिला हप्ता त्यांनी काही दिवसांपूर्वी मोरे याला दिला होता. आज दुसरा हप्ता देण्याचे आश्‍वासन त्यांनी मोरे याला दिले होते. या प्रकरणी महाडिक यांनी नवी मुंबईतील लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार दाखल केली होती. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्यातच सापळा रचून मोरे याला लाच स्वीकारताना अटक केली.

मिरा-भाईंदर परिसरात लाचखोरीप्रकरणी पोलिसाला अटक झाल्याची एका महिन्यातील ही तिसरी घटना आहे. यापूर्वी पोलिस उपअक्षीधक नितीन संबटवाड आणि मिरा रोड पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या नयानगर पोलिस चौकीतील पोलिस कॉन्स्टेबल वाय. एस. निकम यांना लाचखोरीप्रकरणी अटक झाली होती.

No comments:

Post a Comment