उठता बसता छत्रपती शिवरायांचे नाव घेणारे सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत आहेत. त्यांचे खरे रूप पुणे पोलिसांच्या फतव्यामुळे उघड झाले आहे.
शिवरायांचे वैरी महाराष्ट्रातच!
आपल्या महाराष्ट्र राज्यात कधी कुणाचे डोके फिरेल याचा नेम नाही. हे डोकेफिरू मग मागचा-पुढचा विचार न करता हवे तसे निकाल देत असतात. मुंबईसह महाराष्ट्रातील गणेशोत्सव संपला. गणराय वाजतगाजत आले व वाजतगाजत त्यांचे विसर्जनही झाले. श्री गणराय हेच विघ्नहर्ते असल्यामुळे विघ्ने दूर पळणारच. हे सर्व सुरळीत पार पडत असताना पुण्यातील पोलिसांनी मात्र छत्रपती शिवरायांच्या बाबतीत त्यांची टांग आडवी टाकलीच. गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत शिवरायांचा पुतळा वगैरे आणू नये. शिवरायांमुळे दंगल पेटेल अशा प्रकारच्या नोटिसा पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर पोलिसांनी बजावल्या. यास पुणेरी पोलिसांचा जावईशोध म्हणावा की शाहिस्तेखानी फतवा? मुळात हा जो फतवा आहे त्यावर पोलिसी शाहिस्तेखानांनी सही केली असण्याची शक्यता नाही, कारण याच पुण्यनगरीत छत्रपती शिवरायांनी शाहिस्तेखानाची बोटे छाटली आहेत. त्यामुळे बोटे नसलेल्या हातांनी ते फतव्यावर सही, शिक्का तरी कसा मारणार? अर्थात, शाहिस्तेखान नसला तरी यानिमित्ताने पुणे पोलिसांच्या अंगात अफझलखान किंवा औरंगजेब नक्कीच संचारला व त्याने गणरायाच्या मिरवणुकीत प्रत्यक्ष महाराष्ट्राचे स्वामी श्रीमंत छत्रपती शिवरायांवरच बंदीहुकूम बजावला. पुण्यातील अंबिका लोढा कॉलनीतील सानेगुरुजी मंडळ विसर्जन मिरवणुकीत शिवरायांचा मुलूखमैदान पुतळा आणणार होते. विसर्जन मिरवणुकीत शिवराय पुतळ्याच्या रूपाने आले असते तर कुणाच्या पोटात दुखायचे कारण नव्हते, पण पोलिसांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांवर नोटीस बजावून शिवरायांचा पुतळा न आणण्याचा आदेश दिला. पुण्याचे अफझलखानी पोलीस म्हणतात, ‘सद्यस्थितीत दहशतवादी कारवाया होत असल्याने समाजकंटकांकडून गालबोट लागून अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. पुतळ्याची विटंबना होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तेव्हा महाराजांचा पुतळा न आणलेलाच बरा,’ अशी नोटीस पोलिसांनी बजावल्याने गणेश मंडळे चक्रावलीच असतील. शिवाजी महाराजांनी पुण्यात सोन्याचा नांगर चालवून हिंदवी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. त्याच पुण्यात कॉंग्रेस राजवटीत शिवरायांवर बंदीहुकूम बजावला जातो. यापेक्षा
मराठ्यांच्या मर्दानगीची शोकांतिका
ती कोणती? आता कोठे बरे गेले ते बेगडी शिवभक्त, ज्यांनी जेम्स लेन प्रकरणात भांडारकर संस्थेची तोडफोड केली व लालमहालातील गुरू दादोजी कोंडदेवांचा पुतळा रातोरात हलवला? आता तर पोलिसांनी दिवसाढवळ्या शिवरायांच्या पुतळ्यावरच बंदीहुकूम बजावला. शिवरायांची विटंबना करणार्या जेम्स लेनला लंडनमधून फरफटत आणण्याची गर्जना करणारे गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्याच गृहखात्याने जेम्स लेनला अभय देऊन शिवरायांवर बंदीहुकूम बजावला. शिवरायांमुळे दंगली भडकतील व गुन्हे वाढतील असे सांगणारे नक्की कोणासाठी हे राज्य चालवीत आहेत? शिवरायांमुळे ज्यांच्या पोटात विद्वेषाचा गोळा येतो तो देशाचा दुश्मनच मानायला हवा व अशा दुश्मनांना भरचौकात फासावर लटकवायला हवे. पाकिस्तानात किंवा अफगाणिस्तानात शिवरायांवर बंदी टाकली असती तर एकवेळ समजण्यासारखे होते, पण हा प्रकार प्रत्यक्ष पुण्यनगरीत घडला असून महाराष्ट्राची मान शरमेने खाली झुकावी असा हा सर्व प्रकार आहे. शिवराय दिसताच दंगल घडविणारे हे अतिरेकी कोण आहेत? गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत घुसून शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करण्याची हिंमत कुणात आहे? शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना करणार्यांना रोखण्याचे धाडस कदाचित पोलिसांत नसेल, पण गणेश विसर्जनात जमलेला मर्दमावळ्यांचा भगवा सागर हे शिवरायांचेच सैन्य दल असल्याने विटंबना करणारे हात मुळापासून उखडून फेकण्याची हिंमत या सैन्यात होतीच होती. त्यामुळे स्वत:ची नामर्दानगी झाकण्यासाठी पोलिसांना शिवरायांच्या पुतळ्यावर बंदी घालण्याची गरज नव्हती. राज्य कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांचे असल्यामुळेच शिवरायांचा हा घोर अपमान झाला आहे. शिवाजी महाराजांच्या राज्यात ढोंगाला, पापाला नि बदफैलीपणाला स्थान नव्हते. आपल्या हाताखालच्या अधिकार्यांनी गुन्हा केल्याचे त्यांना आढळून आले तर त्यांचा किल्ल्यावरून कडेलोट करावयाला ते कमी करीत नसत. त्यामुळे महाराजांचा सर्वांना धाक आणि दरारा वाटे, पण
कॉंग्रेसच्या राज्यात ढोंग, लाचखाऊपणाआणि बदफैलीपणा या गैर प्रकारांना अक्षरश: ऊत आला आहे. छत्रपतींना चोर, लुटारू आणि वाट चुकलेले देशभक्त म्हणणारे हेच कॉंग्रेसवाले होते. या वक्तव्याबद्दल खवळलेल्या मराठी जनतेपुढे त्यांना अखेर नाक घासून, गुडघे टेकून माफी मागायला लागली होती. आजही अफझलखान वधाचा देखावा गणेशोत्सवात लागला की कॉंग्रेसवाले आणि पोलीस भयंकर चिडतात. या देखाव्यामुळे धार्मिक भावना दुखावतील व दंगली भडकतील असा बुट ते काढतात आणि अफझलखान वधाचा देखावा लावणार्या मंडळांवर गुन्हे दाखल करतात. अफझलखानाचा शिवाजी महाराजांनी वध केला याचे कॉंग्रेस पुढार्यांना सर्वात जास्त दु:ख वाटते. जणू काही अफझलखान हा कॉंग्रेसवाल्यांचा सासरा किंवा मेहुणा होता! अफझलखान हा स्वराज्याचा नि स्वदेशाचा अगदी उघड उघड शत्रू होता. शिवाजी महाराजांना जिवंत पकडण्याची किंवा ठार मारण्याची त्याने विजापूरच्या दरबारात प्रतिज्ञा केलेली होती आणि शिवाजी महाराजांची भेट होताच त्यांचे मस्तक बगलेत दाबून धरून त्यांच्या बरगडीत कट्यार खुपसण्याचा अफझलखानाने प्रयत्न केला. तेव्हा स्वसंरक्षणासाठी शिवाजी महाराजांना खानाच्या पोटात वाघनखे खुपसणे भाग पडले. हा इतिहास सूर्यप्रकाशाइतका स्वच्छ असताना अफझलखान वधाच्या देखाव्यांवर बंदी येऊच कशी शकते? शिवरायांचे वैरी या महाराष्ट्रातच आहेत. त्यामुळेच अफजलखान वधाच्या देखाव्यावर बंदी घालण्याचा आणि ‘गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवरायांचा पुतळा आणला तर दंगल पेटेल’, अशी नोटीस गणेश मंडळाला बजावण्याचा प्रकार घडतो. उठता बसता छत्रपती शिवरायांचे नाव घेणारे आणि शिवरायांच्या अभिमानाचा ठेका फक्त आपल्यालाच आहे असा आव आणणारे सध्या महाराष्ट्राच्या सत्तेत बसले आहेत. त्यांचे खरे रूप पुणे पोलिसांच्या शाहिस्तेखानी फतव्यामुळे उघड झाले आहे

No comments:
Post a Comment