चीनमध्ये रमजानवर प्रतिबंध
चीन हा मुस्लिमांचाच नाही, तर त्यांच्या धर्माचा कट्टर विरोधी आहे. जर असे नसते तर चीनने रमजान महिन्यावर प्रतिबंध घातला नसता. तेथील मुस्लिम यावेळी मशिदीत जाऊन मोठ्या आवाजात अजानही देऊ शकले नाहीत. पहाटे पाज वाजता पढली जाणारी नमाज आणि रमजानमध्ये विशेषत: रात्री पढली जाणारी तराबीहपासून ते वंचित राहिले. एवढेच नाही, तर रोजे ठेवण्यावरही कडक प्रतिबंध केला गेला. जो याचे पालन करत नाही त्याला दंड दिला जातो.आंतरराष्ट्रीय युगातील एखादा देश एखाद्या समुदायाच्या धार्मिक कार्यांना प्रतिबंध घालेल, यावर आपण विश्वास कराल काय? मानव अधिकारानुसार प्रत्येक व्यक्ती आपल्या आस्थेनुसार आपल्या धार्मिक अधिकारांचा वापर करतो. जो देश एखाद्या समुदायाच्या धार्मिक अधिकारांची अवहेलना करतो, त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य मानले जात नाही, परंतु चीन सरकार हे जगातील असे सरकार आहे की, आपल्या कायद्याचे पालन जबरदस्तीने करवून तर घेतेच, तसेच जेव्हा एखाद्या धर्माच्या अनुयायांमुळे त्यांच्या सुरक्षेला बाधा येते असे त्यांना वाटत असेल, तेव्हा ते त्यांना प्रतिबंध घालण्यास मागे-पुढे पाहत नाही. मुस्लिम दिनदर्शिकेनुसार गेला महिना हा रमजानचा महिना होता. इस्लामच्या श्रद्धेनुसार या महिन्यात ३० दिवस उपवास केले जातात. ज्याला इस्लामीमध्ये रोजा असे म्हटले जाते. मुस्लिमांमध्ये रमजान महिना धार्मिक महिना मानला जातो म्हणून केवळ नमाज नाही, तर त्याच्या समवेत रोजाचेही पालन केले जाते. मुस्लिम लोक आपल्या कमाईतून दान-दक्षिणाही करतात, त्याला जकात असे म्हटले जाते. ईदच्या नमाज ‘खुत्बा’ पठनापूर्वी आपल्या मिळकतीनुसार लोक दानही करतात. त्याला फितरा असे म्हटले जाते. रमजानच्या शेवटी जी ईद साजरी केली जाते तिला ईदुल फितर असे म्हटले जाते. भारतात मुस्लिम सर्वांत अल्पसंख्यक समाज आहे, ज्याला रमजानच्या महिन्यात शक्य होईल तितक्या सुविधा दिल्या जातात, परंतु शेजारील चीन हा देश त्यांच्या देशात राहणार्या चिनी मुस्लिमांशी दुर्व्यवहार करतो. खरे तर हे आहे की, चीन हा मुस्लिमांचाच नाही, तर त्यांच्या धर्माचा कट्टर विरोधी आहे. जर असे नसते तर चीनने रमजान महिन्यावर प्रतिबंध घातला नसता. तेथील मुस्लिम यावेळी मशिदीत जाऊन मोठ्या आवाजात अजानही देऊ शकले नाहीत. पहाटे पाज वाजता पढली जाणारी नमाज आणि रमजानमध्ये विशेषत: रात्री पढली जाणारी तराबीहपासून ते वंचित राहिले. एवढेच नाही, तर रोजे ठेवण्यावरही कडक प्रतिबंध केला गेला. जो याचे पालन करत नाही त्याला दंड दिला जातो.चीन, धर्माचा कट्टर विरोधी
थोडक्यात म्हणजे, चीन सरकारने रमजानच्या प्रत्येक गोष्टीला प्रतिबंध घातला आहे. मुस्लिम बांधव संघटित होऊन जे नमाज पठन करतात, ते या वेळेस करू शकले नाहीत. सरकारी कार्यालय आणि कारखान्यांमध्ये दुपारी जेवणे आवश्यक केले आहे. जी व्यक्ती दुपारी जेवण करत नाही ती वार्षिक बोनस मिळण्यापासून वंचित राहील, असे नियम लावले गेले आहेत. मुस्लिम वस्तीत हॉटेल चालू ठेवणे अनिवार्य असल्याचा आदेश केला आहे. १८ वर्षांहून कमी वय असणार्याने रोजा ठेवल्यास त्याला दंडित केले जाईल, असेही स्पष्ट केले आहे. एकूणच चीनमध्ये रमजानला प्रतिबंध होता.चीन सरकारद्वारा घोषित केलेल्या या कडव्या प्रतिबंधाचे मुख्य कारण होते चीनच्या जियांग प्रांतातील उगूर मुस्लिम सरकारप्रती द्वेष. चीन सरकार आपल्या या प्रांतातील नागरिकांमुळे त्रस्त आहे. जियांगची उगूर जनता आपल्या प्रांताला चीनपासून स्वतंत्र करू इच्छित आहे.म्हणून ते आपल्या या संघर्षास ‘स्वतंत्रतेचे संघर्ष’ असे म्हणतात. चीनमध्ये जेव्हा ऑलिम्पिकचे आयोजन झाले होते, त्या वेळी उगूरच्या १२२ स्वतंत्रता सेनानींनी प्रदर्शन केले होते. त्यांना ऑलिम्पिक संपल्यानंतर दुसर्या दिवशी गोळ्या घालून मारण्यात आले. जियांग प्रांत खूप दिवसांपासून अशांत आहे. हा प्रांत मुस्लिमबहुल आहे. काही दिवसांपूर्वी चीन सरकारने बंडखोरांना शस्त्रास्त्रे आणि पैसे पुरविणार्या पाकिस्तान्यांना फटकारले होेते. अमेरिकेचे पाकिस्तानशी पहिल्याप्रमाणे संबंध राहिले नाही म्हणून आता पाकिस्तान पूर्णत: चीनवर अवलंबून आहे. याउपरही पाकिस्तानातील सक्रिय आतंकवादी आणि विशेषज्ञ तालिबान इस्लामला धरून चीनशी कोणताही समझोता करू इच्छित नाहीत. मुस्लिम आतंकवाद्यांचा एकच उद्देश आहे की, जियांग लवकरात लवकर स्वतंत्र होऊन मुस्लिम राष्ट्राच्या रूपात परिवर्तित व्हावेे. चीनने याबाबतीत पाकिस्तानलाही सचेत केले आहे आणि येथील उगूर जनतेलाही सतर्क केले आहे. याचे पहिले पाऊल म्हणजे रमजानला प्रतिबंध घालून चीनने मुस्लिम जगताला आव्हान दिले आहे. चीन सरकारचे असे म्हणणे आहे की, रमजानच्या बहाण्याने उगूर जनता आपले देशद्रोही कारस्थान व्यापक करत राहील.संघर्ष टाळण्यासाठी प्रतिबंध
चिनी सरकारला मिळालेल्या माहितीनुसार ते बाहेरील शक्तींशी मिळून चीनच्या राष्ट्रीय हितास बाधा पोहोचवण्यास सक्रिय आहेत. रमजान सुरू होण्यापूर्वी चिनी सरकार आणि उगूर यांच्यामध्ये चकमक झाली होती, ज्यामध्ये ११ लोक मारले गेले. उगूरमध्ये पोलिसांनी गोळ्या झाडून दोन आतंकवाद्यांना ठार केले. मागील काही दिवसांत जर्मनीच्या म्युनिचमध्ये उगूर मुस्लिमांनी संमेलनाचे आयोजन केले होते, ज्यामध्ये निश्चित झाले होते की, रमजानमध्ये चीन सरकारशी संघर्ष करायचा. या माहितीनंतर चीन सरकारने जियांग प्रांतमध्ये आपली स्थिती मजबूत केली. रमजानमध्ये होणार्या घटनांविषयी माहिती मिळताच चिनी सरकारने कायदा आणि व्यवस्थेचा बंदोबस्त केला. म्हणून चिनी सरकारने सर्वप्रथम रमजान सुरू होण्यापूर्वी तेथील जनता आणि विशेषज्ञ उगूरच्या नेत्यांकडून शपथपत्रावर सह्या घेतल्या, ज्यात असे लिहिले होते की, जमातीबरोबर नमाज पठन करणार नाही आणि रमजानचे रोजेही ठेवणार नाही. जियांगमध्ये जे लोक जमातीबरोबर नमाज पठन करतात त्यांच्या ओळखपत्राचे नंबर पोलिस रेकॉर्डमध्ये नोंद केले आहेत.जुलै २००९ मध्ये उगूर जनता आणि चिनी सरकार यांच्यामध्ये हिंसक चकमक झाली होती. कारण की, उगूर लोकांनी आपल्या धार्मिक आणि मानवी अधिकारांसाठी आवाज उठवला होता. या संमेलनात मोठ्या प्रमाणात उगूर सहभागी झाले होते. चिनी सरकारने त्यांना भयभीत करण्यासाठी हिंसेचा वापर केला होता. या लढाईत २ हजार उगूर लोक मारले गेले होते आणि जवळजवळ ४ हजार गंभीर रीत्या जखमी झाले होते. गेल्या दोन वर्षांपासून जुलैच्या दुसर्या आठवड्यात पोलिसांच्या या निंदनीय प्रकाराचा निषेध करण्यासाठी उगूर लोक मोठ्या प्रमाणात एकत्र येतात. पोलिस आणि सेना असूनही उगूर लोक धाडस करतात. म्हणून यावेळी या शहीदांच्या स्मरणार्थ एक सभा बोलवली गेली तेव्हा चिनी सरकारने आपल्या शक्तीने त्यांना दाबण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी या क्षेत्रातील जनतेवर कोणती कारवाई केली नाही, परंतु उगूर लोकांवर कारवाई केली. या हिंसेचा विपरीत परिणाम झाला. उगूर लोकांनीही पोलिसांशी दोन हात केले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात लोक मारले गेले.चीन सरकारचा आता उगूर लोकांवर आरोप आहे की, ते पृथकतावादी आहेत आणि ते शक्तीच्या जोरावर जियांगला चीनपासून वेगळे करू इच्छितात. सद्य:स्थितीवरून हे स्पष्ट होते की, चीन सरकारसाठी पाकिस्तान सरकार आणि सेना आता आरोपीच्या पिंजर्यात आहेत. ते जियांगमधील उगूर लोकांच्या घटनांसाठी पाकिस्तानला जबाबदार ठरवत आहेत. उगूर नेत्यांचे म्हणणे आहे की, चीन सरकार त्यांच्याशी सावत्र वागते. त्यांच्याजवळ ना कोणते काम आहे, ना उपजीविकेसाठी साधन. म्हणून उगूर नेत्यांची म्हणजे चीन तेथील लोकांच्या अधिकारांची अवहेलना करते. ते त्यांच्यावर आरोप लावून चिनी लोकांना भडकवण्याचा प्रयत्न करते. त्यांच्या आर्थिक आणि सामाजिक प्रगतीसाठी चीन सरकार काहीही करत नाही. ते जेव्हा एखाद्या गोष्टीची मागणी करतात तेव्हा त्यांना आतंकवाद आणि बंड या नावांशी जोडले जाते. त्यांचे मत आहे की, पायाभूत अधिकाराच्या लढाईला ते दहशत असे नाव देत आहेत. चीन सरकारचे म्हणणे आहे की, चीनच्या उत्तर पूर्व भागाच्या प्रगतीसाठी ते निरंतर काम करत आहेत, परंतु आपल्या मागासलेपणासाठी कुणी विरोधी कार्य करत असेल, तर त्यांना क्षमा केली जात नाही. उगूर मुस्लिमांचे म्हणणे आहे की, सरकारची नियत ठीक नाही. जियांगच्या काशकार नगरची लोकसंख्या जवळजवळ ६ लाख आहे ज्यामध्ये ८० टक्के लोक मुसलमान आहेत आणि २० टक्के हान समाज आहे. चिनी सरकार हान समाजाला उत्तेजित करून शांती भंग करते आणि जेव्हा उगूर आपल्या रक्षणासाठी पुढे येते तेव्हा त्यांना आतंकवादी असे नाव देऊन निष्ठुर रीत्या त्यांची हत्या केली जाते. उगूर लोकांचे म्हणणे आहे की, सरकारने अशी बदमाशी करणे बंद करावे, नाही तर आम्हाला आत्मरक्षण आणि स्वाभिमानासाठी पुढे सरकावे लागेल. चिनी सरकारचे म्हणणे आहे की, उगूर लोकांवर कोणतीही दया दाखवली जाणार नाही, त्यांना त्यांच्या (चीन) देशाच्या रक्षणासाठी आम्हाला मारावे लागेल. चीनचे गृहमंत्री मेंग जियांग जू यांच्या मतानुसार अपराधी लोकांना कोणतीही सूट दिली जाऊ शकत नाही. त्यांच्या शक्तीचे उत्तर शक्तीनेच दिले जाईल. चीनच्या गृहमंत्र्यांनी गेल्या वर्षी इथपर्यंत सांगितले आहे की, जियांगमध्ये अल् कायदा सक्रिय आहे. चिनी नेत्यांनी त्याप्रसंगी असेही म्हटले होते की, स्थानिक मुस्लिम नेता बंडाला जर धार्मिक अधिकार मानत असेल, तर त्यांच्याशी कोणताही समझोता होऊ शकत नाही. रमजानमध्ये चिनी सरकारने जी शिष्टाई दाखवली आहे, त्यामुळे इस्लमी जगात त्यांची निंदा होत आहे. मानव अधिकार आयोग यावर आपला फतवा काढत आहे, परंतु चीन सरकार कोणतीही तडजोड करण्यास तयार
No comments:
Post a Comment