Total Pageviews

Saturday, 24 September 2011

OPINION POLL AGAINST GOVT

भ्रष्टाचारमुक्ती हा विषय येणार्‍या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. भ्रष्ट मार्गाने जे भाजपात कोट्याधीश झालेले आहेत त्यांना जर जनतेपुढे आणले तर जनता त्यांना स्वीकारणार नाही. त्यातल्या त्यात स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला जनता स्वीकारेल. म्हणून स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना आतापासूनच मतदारांपुढे आणण्याचे काम सुरू केले पाहिजे. अण्णांच्या आंदोलनात तरुण वर्ग फार मोठ्या संख्येत उतरला होता. या तरुण वर्गाला नवीन चेहरे पाहिजेत. ज्यांनी आमदारकी, खासदारकी पंचवीस-तीस वर्षे सांभाळली आहेत. त्यांना पक्षाचे मार्गदर्शक केले पाहिजे. तरुणांना वाव दिला पाहिजे. 2014 पर्यंतची ही आव्हाने भाजपापुढे आहेत.
अण्णा हजारे यांचे उपोषण संपले, आणि आता "उपोषणाने' काय मिळविले याची चर्चा सुरू आहे. अण्णा हजारे यांचे उपोषण "लोकपाल' या एका विषयाभोवती केंद्रित होते. म्हणून पहिला प्रश्न उपस्थित झाला की, अण्णांना हवा असलेला लोकपाल कायदा संमत झाला का? आता त्याचे उत्तर नाही असे आहे. आपण उपोषण केले की, लगेच कायदा होईल अशी अपेक्षा अण्णांनीही ठेवली नसावी. अण्णांच्या उपोषणाने कायदा करण्याच्या मनिस्थितीत संसद आली हे मोठे यश आहे.
चुका महागात पडल्या
तसे अण्णांचे आंदोलन एका राजकीय पक्षाचे आंदोलन नव्हते. ते राजकीय आंदोलन असले तरी कुठल्याही एका पक्षाला बांधलेले नव्हते. तसे हे आंदोलन सगळ्याच राजकीय पक्षांना अडचणीत आणणारे होते. असे असले तरी हे आंदोलन आजच्या प्रस्थापित राजसत्तेविरुद्ध होते आणि ती राजसत्ता कॉंग्रेस पक्षाच्या हातात आहे. त्यामुळे स्वाभाविकपणे हे आंदोलन कॉंग्रेस सत्तेच्या विरोधात गेले. त्या कॉंग्रेस सरकारने काही गंभीर चुका केल्या. प्रथम अण्णा हजारेंना दिल्लीत उपोषण करण्यास प्रतिबंध केला. नंतर त्यांना अटक झाली. अण्णा तिहार तुरुंगात गेले. तुरुंगातून त्यांची सुटका लगेचच करण्यात आली. कपिल सिब्बल, महेश तिवारी यांनी अण्णांवर बिनबुडाचे गंभीर आरोप केले. या सर्व चुका कॉंग्रेसला फार महागात पडलेल्या आहेत.
आंदोलन संपल्यानंतरही कॉंग्रेसने पुन्हा नवीन चुका करायला सुरुवात केली आहे. कॉंग्रेस सत्तेने अण्णा आणि त्यांच्या सहकार्‍यांवर वेगवेगळे आरोप ठेवायला सुरुवात केली. किरण बेदी, शांती भूषण, केजरीवाल यांच्यावर वेगवेगळे आरोप ठेवण्यात आलेले आहेत. ""तुम्ही आमच्या विरुद्ध लढता! आम्ही तुम्हाला बघून घेऊ.'' अशी सूडाची भावना यामागे आहे. उपोषण काळात शासनाने अण्णांचा केलेला छळ आणि आता त्यांच्या सहकाऱ्यांचा छळ लोकांना आवडलेला नाही. जनतेच्या मनातील असंतोष समजून घेण्यासाठी मार्केट रिसर्चर नेलसेन यांनी स्टार न्यूजसाठी जनमनाचा एक सर्व्हे केला. या सर्व्हेचे निष्कर्ष 4 सप्टेंबर 2011 च्या टाइम्स ऑफ इंडियात प्रकाशित झाले आहेत.
अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचारविरुद्ध आंदोलनाला चुकीच्या पद्धतीने हाताळल्यामुळे कॉंग्रेसचे जनमत समर्थन 1/3 घसरले आहे. याचा फायदा भाजपाला झाला आहे. भाजपाचे जनसमर्थन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. मे 2011 साली नेलसेनने असे सर्वेक्षण केले होते. तेव्हा कॉंग्रेसला 30% जनसमर्थन होते तर भाजपाला 23% जनसमर्थन होते. आताच्या सर्वेक्षणानुसार कॉंग्रेसच्या जनसमर्थनाचे प्रमाण 30% वरून 20% आले आहे. भाजपाचे 32% वर गेले आहे. लोकप्रियतेत भाजपाने कॉंग्रेसला मागे टाकले आहे.
सर्वेक्षण
या सर्वेक्षणात असेही आढळले आहे की 2009 साली कॉंग्रेसला मतदान करणाऱ्या 11% लोकांनी कॉंग्रेसपासून फारकत घेतली आहे. या तुलनेत भाजपाने फक्त 5% मतदार गमावले आहेत. हे सर्वेक्षण 28 शहरातील 9,000 मतदारांचे करण्यात आले.
अशा सर्वेक्षणावर किती विश्वास ठेवायचा? असा प्रश्न सूज्ञ वाचक जरूर उपस्थित करतील. कारण प्रत्येक निवडणुकीत मतदारांने सर्वेक्षण करणाऱ्यांचे सर्व अंदाजांचे तीन तेरा वाजवले आहेत. म्हणून अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा भाजपाला कोणता फायदा होणार आहे, याचा स्वतंत्रपणे विचार करणे गरजेचे आहे. लोकशाहीत सत्ताधारी पक्षाविरुद्ध जो असंतोष निर्माण होतो, त्याचा फायदा प्रबळ विरोधी पक्षाला होत असतो. हे सार्वत्रिक सत्य आहे. इंग्लंड आणि अमेरिकासार"या प्रगल्भ लोकशाही देशात ते जसे लागू होते, तसे भारतातही लागू होते. भारतात भाजपा हा कॉंग्रेसला पर्यायी पक्ष असल्यामुळे कॉंग्रेस सत्तेविरुद्ध असंतोषाचा फायदा भाजपाला होणे स्वाभाविक आहे. अण्णा हजारे यांचे आंदोलन भाजपाला फायदा मिळवून देण्यासाठी जरी नसले तरी लोकशाहीतील नियमानुसार याचा फायदा भाजपालाच होणार आहे.
भाजपाची नऊ राज्यात सत्ता आहे. या नऊ राज्यांपैकी गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश येथील राज्य सरकारे आपले कार्य उत्तम प्रकारे करीत आहेत. गुजरातची प्रशंसा खूपच होत असते. मध्यप्रदेश शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची नक्कल अनेक राज्यांनी सुरू केली आहे. ही सर्व राज्ये राजकीय आणि प्रशासकीय भ्रष्टाचारापासून 100% मुक्त आहेत, असे त्यांचे प्रशंसकही म्हणू शकत नाहीत, परंतु लोककल्याणकारी योजनांच्या बाबतीत ही राज्ये आघाडीवर आहेत असे त्यांच्या विरोधकांनाही म्हणावे लागते. या राज्यातील प्रथम श्रेणीचे नेतृत्व भ्रष्टाचारापासून अलिप्त आहे. नरेंद्र मोदी, शिवराजसिंग चौहान याही मुख्यमंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करण्याचे धाडस अजून कोणाला झालेले नाही. राजकीय स्टंटबाजी करण्यासाठी कोणी आरोप करतात त्याकडे फारसे लक्ष देण्याचे कारण नाही. या गोष्टीही भाजपाची लोकप्रियता वाढवण्यास कारणीभूत ठरलेल्या आहेत. राज ठाकरे गुजरातचा दौरा करतात आणि मुख्यमंत्री नरेंद्रभाई मोदी यांची मुक्तकंठाने प्रशंसा करतात याला खूप राजकीय महत्त्व आहे.
संघ संस्कार ही प्रेरणा
अण्णा हजारे यांच्या आंदोलनाचा फायदा होण्याचे आणखी एक कारण आहे. खेडोपाडी आणि शहरात काम करणारा भाजपाचा सामान्य कार्यकर्ता बहुतांशी स्वच्छ प्रतिमेचा, प्रामाणिक, नि:स्वार्थीपणे काम करणारा असतो. संघ संस्कार ही त्याची प्रेरणा असते. म्हणून तो सामान्यपणे सत्ता स्थानाच्या शर्यतीत उतरत नाही. असा कार्यकर्ता हीच भाजपाची सर्वात मोठी शक्ती आहे. अण्णा हजारे यांनी भ"ष्टाचाराविरुद्ध आंदोलन छेडून राजकारणात स्वच्छ प्रतिमेची माणसे असली पाहिजेत हा विषय पुढे आणलेला आहे. इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत स्वच्छ प्रतिमेच्या माणसांची संख्या भाजपात खूप मोठी आहे. जनतेला हे कार्यकर्ते आणि असे नेते दिसतात. म्हणून या आंदोलनाचा राजकीयदृष्ट्या फायदा भाजपाला होणे हे अगदी स्वाभाविक आहे. सर्वेक्षणाने त्याला पुष्टी जोडली आहे किंवा बळकटी दिली आहे एवढेच म्हणता येईल.
जनमनाचे वारे
आणखी एका प्रश्नाचा विचार करूया. लोकसभेच्या निवडणुका 2014 साली येतील. तोपर्यंत जनमनाचे हे वारे असेच कायम राहतील का? कॉंग्रेस तर स्वस्थ बसून राहणार नाही. भाजपाला बदनाम करण्यासाठी वेगवेगळ्या क्ल्युप्त्या कॉंग्रेस योजित राहील. बंगारू लक्ष्मण हे प्रकरण भाजपाने विसरता कामा नये म्हणून "तिसरे ते सावधपण! सर्वविषयी' हे समर्थांचे वचन भाजपा नेत्यांनी रोज गिरविण्याची आवश्यकता आहे.
भाजपात गटबाजी नाही, असे जर कोणी म्हटले तर यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. या गटबाजीला नियंत्रित करणे अत्यंत गरजेचे आहे. कॉंग्रेस पक्ष या गटबाजीला खतपाणी घालील. पक्षात फूट पाडण्याचा प्रयत्न करील. लोकप्रतिनिधी फोडण्याचे प्रयत्न होतील. माझ्यापेक्षा पक्ष मोठा आहे, माझ्या स्वार्थापेक्षा पक्षाचे यश मोठे आहे. माझ्या गटापेक्षा पक्षाची संघटित शक्ती मोठी आहे ही जाणीव सर्व गटांमध्ये निर्माण करणे ही काळाजी गरज आहे. दैव दिल्लीची सत्ता घेेऊन भाजपाच्या द्वारी येत आहे. गटबाजीचे करंटेपण करून त्या दैवाला लाथाडण्याचे पाप करू नये.
राजकारणाचा केंद्रबिंदू
भ्रष्टाचारमुक्ती हा विषय येणार्‍या काळात राजकारणाचा केंद्रबिंदू राहणार आहे. भ्रष्ट मार्गाने जे भाजपात कोट्यधीश झालेले आहेत त्यांना जर जनतेपुढे आणले तर जनता त्यांना स्वीकारणार नाही. त्यातल्या त्यात स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला जनता स्वीकारेल. म्हणून स्वच्छ प्रतिमेच्या कार्यकर्त्यांना आतापासूनच मतदारांपुढे आणण्याचे काम सुरू केले पाहिजे. अण्णांच्या आंदोलनात तरुण वर्ग फार मोठ्या सं"येत उतरला होता. या तरुण वर्गाला नवीन चेहरे पाहिजेत. ज्यांनी आमदारकी, खासदारकी पंचवीस-तीस वर्षे सांभाळली आहेत. त्यांना पक्षाचे मार्गदर्शक केले पाहिजे. तरुणांना वाव दिला पाहिजे. 2014 पर्यंतची ही आव्हाने भाजपापुढे आहेत.
टाइम्स ऑफ इंडियात झालेल्या सर्वेक्षणाचे वृत्त वर दिले आहे. या वृत्तावर इंटरनेटवर टाइम्सच्या साईटवर असंख्य प्रतिक्रिया आलेल्या आहेत. जे.पी.(युएसए) यांना असे वाटते की, कॉंग्रेस जाण्याची आता वेळ आलेली आहे आणि आता ती लवकरात लवकर गेली पाहिजे. लोकमताचे वारे अशा पत्रातूनही कोणत्या दिशेने वाहत आहे हे लक्षात येते. वारे अनुकूल असले तरी जहाजाची शिडे उघडावी लागतात. वाऱ्याच्या दिशेला जहाज वळवावे लागते आणि योग्य कप्तानाच्या नेतृत्वाखाली ते हाकारावे लागते मगच ते इच्छित किनारा गाठते

No comments:

Post a Comment