Total Pageviews

Thursday, 8 September 2011

DELHI BLASTS REACTIONS FROM COMMON PEOPLE

दिल्ली हायकोर्टाबाहेर गेट नंबर पाच बाहेर सकाळी १०.१४ वाजता बॉम्बस्फोट झाला. या स्फोटात अकरा जण ठार आणि ५० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाल्याची माहिती विशेष गृहसचिवांनी दिली. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. पाच नंबर गेट जवळ हायकोर्टाचा एन्ट्री पास देणारे ऑफिस आहे. कोर्टाचे कामकाज सुरू होणार असल्यामुळे अनेकजण पास मिळवण्यासाठी गेटजवळ उभे होते. त्याचवेळी स्फोट झाला.
एका बॅगेत ठेवलेल्या मोठ्या क्षमतेच्या बॉम्बचा स्फोट झाल्यामुळे अनेकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. कोर्टाच्या आवारात प्रवेश घेण्यासाठी पास बनविण्याच्या तयारीत असलेले लोक या स्फोटाचे बळी ठरले. हायकोर्ट हे सर्वात सोपे लक्ष्य असल्यानेच त्याठिकाणी लागोपाठ दोन स्फोट घडवण्यात आले. गेल्या २५ मे रोजी त्यापैकी कमी क्षमतेचा स्फोट घडवण्यात आला होता, भारत म्हणजे दहशतवाद्यांना अत्यंत सुरक्षित जागा आहे.याचे कारण म्हणजे आपले राज्यकर्ते .पहील्यांदा आपल्या ताब्यात असलेल्या सर्व अतिरेक्यांना फाशी द्या. म्हणजे असे धाडस वारंवार होणार नाही. भारतात कितीही बोंब स्पोट आणि अतिरेकी कारवाया केल्या तरीही देश द्रोह्यांवर वर्षानुवर्षे फक्त खटले चालतात, शिक्षा किव्हा फाशी फक्त जाहीर होते पण त्याची अंमलबजावणी होत नाही हे अतेरीक्याना कळून चुकल्यामुळे या पुढेही बॉम्ब स्पोट होतच राहणार आणि आपले राजकारणी त्यांचेच लाड पुरवण्यात स्वतःला धन्य मानणार. पंतप्रधान म्हणतात- आतंकवाद्यांचा हल्ला आम्ही कदापि सहन करणार नाही. चितंबरम म्हणतात- एकजुटीने या हल्याचा आपण सामना करू. याचा अर्थ असा होतो कि, आमच्यावर किती हि हल्ले झाले (आतंक वाद्यांचे) , तरी आम्ही हल्ला करून त्याचे प्रत्युत्तर देणार नाही. आतापर्यंत हजारो लोकांचे प्राण गेलेत....., तरी हि सरकारला अजून जाग आलेली नाही. तेच ते, तेच ते, तेच ते आणि तेच ते. तेच बॉम्बस्फोट तेच उसासे, त्याच प्रतिक्रिया आणि तीच मदत. सरकारलाही त्याच शिव्या, system ला हि त्याच शिव्या अतिरेक्यांनाही तेच शाप. आपण प्रतिक्रिया देताच राहतो, कसाबला पंतप्रधान करा.. आणि अफझल गुरुला गृहमंत्री ... कारण तो गुरु आहेना! भ्ह्रस्त लोकांनी भरला आहे देश. भ्रस्ताचारी नेत्यांवर हल्ले करा देशाला नवी दिशा तरी मिळेल.अतिरेक्यांना शिक्षा करून दाखवा. हे पूर्वीपासून चालू आहे आणि चालू राहणार. रामायणात सुद्धा यज्ञ चालू असताना राक्षस तो उधळून लावायचे , हा सुद्धा दहशतवाद होता. नवीन काहीही नाही फक्त पद्धत बदलली आहे. चला आता पुन्हा निषेध आणि मोर्चे काढायला मोकळे झाले राजकारणी काय प्रतिक्रिया द्यावी तेच कळत नाही. लाज वाटते मला भारतीय असल्याची . भारत म्हणजे दहशतवाद्यांना अत्यंत सुरक्षित जागा आहे.अगदी पुराव्यानिशी सापडलेल्या अफजल गुरु, अजमल कसब यांना आपले सरकार पोसत राहते.याउलट काहीतरी तथाकथित कुभांड रचून आपल्याच लोकांना जाळ्यात ओढून सर्वांचे लक्ष विचलित करते.अमेरिकेत एकच स्फोट झाला पण त्या नंतर कशाचीही पर्वा करता त्यांनी ओसामा ला खतम केले.काय भिशाद आहे पुन्हा दहशतवादी डोके वर काढण्याची.आपल्या इथे काही करताना जात धर्माचा विचार जास्त केला जातो. मुंबईनंतर आता दिल्लीवर हल्ला. निर्दोष लोकांचा जीव वाचण्यासाठी आता कोणाला शरण जावे? अरविंद काजरीवालांच्या जुन्या फाईल काढण्यापेक्षा सरकारने सुरक्ष्या वाढवण्यासाठी काय करता येईल याचा प्लान केला तर निर्दोष लोक वाचतील. राहुल गांधी म्हणतात तेच खरे आहे, असे छोटे मोठे स्फोट होताच राहणार, ते सरकार थांबवू शकणार नाही.

No comments:

Post a Comment