इराण-सौदी संघर्ष
By pudhari | Publish Date: Jun 10 2017 1:52AM
अग्रलेख
अफगाणिस्तान वा पाकिस्तानात नित्यनेमाने गर्दीच्या वा महत्त्वाच्या जागी बॉम्ब फुटतात वा घातपात होतात. अगदी शुक्रवारचा मुहूर्त साधून शिया मशिदीत स्फोट घडवले जातात; पण तशी घटना इतक्या सहजासहजी इराण वा सौदी अरेबियात घडल्याचे आपल्या वाचनात येत नाही. म्हणूनच या आठवड्यात इराणची राजधानी तेहरान येथे झालेल्या दोन घातपाती घटना धक्काादायक आहेत. यापैकी एक घटना इराणी संसदेत झाली, जेव्हा तिथे संसदेची बैठक चालू होती. त्यातून संसदेची फारशी हानी झाली नाही; पण त्याचवेळी तेहरानमध्येच असलेल्या आयातुल्ला खोमेनी यांच्या स्मारकानजीक तशाच घातपाताचा प्रयत्न झाला. दोन्ही प्रयत्न हाणून पाडण्यात सुरक्षा दलांना यश आलेले असले, तरी इराणसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या दोन महत्त्वपूर्ण ठिकाणी घातपाताचे प्रयत्न गंभीर इशारा देणारे आहेत. पश्चिाम आशियातील हा संघर्ष इस्लामच्या दोन पंथातला असून, तो दिवसेंदिवस विकोपास चालला आहे. प्रामुख्याने सौदी अरेबियाने सुन्नीि देशांची आघाडी बनवून फौजांची जमवाजमव केल्याने या संघर्षाला युद्धाचे स्वरूप येत चालले आहे. त्यामुळेच तेहरानच्या हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने घेतलेली असली, तरी त्यामागचा बोलविता धनी सौदी अरेबियाच आहे, ही बाब विसरून चालणार नाही. इराणच्या क्रांतीपासून हा शिया-सुन्नीय संघर्ष सुरू झाला असून, तो थांबण्याची कुठलीही चिन्हे नाहीत. खरेतर त्यात बिगर मुस्लिम देशांनी नाक खुपसण्याचे कोणतेही कारण नाही; पण मानवाधिकार वा जागतिक शांतता असल्या गोष्टी पुढे करून पाश्चाित्त्य देशातील काही लोकांनी जगाच्या शांततेला सुरुंग लावलेला आहे; अन्यथा यापैकी कोणालाही पश्चिाम आशियात हस्तक्षेप करण्याचे काही कारण नव्हते. इराणमध्ये क्रांती होऊन पूर्वीच्या शहाची सत्ता संपुष्टात आली तेव्हा नवी सत्ता प्रस्थापित झाली नव्हती; पण ही सत्ता शिया धर्मगुरूंची असणार हे गृहीत असल्याने तेव्हापासूनच इराणला मोडीत काढण्याचे राजकीय डावपेच सुरू झाले होते. प्रशासन, लष्कर वा अन्य व्यवस्था उद्ध्वस्त झालेल्या इराणला कोंडीत पकडण्यासाठी, तेव्हा शेजारच्या हुकूमशहा सद्दाम हुसेनने चाल केली होती. तरीही इराणने दहा वर्षे झुंज देऊन सद्दामला इराणी प्रदेश गिळंकृत करू दिला नाही. सद्दामच्या पाठीशी तेव्हा सौदी राजांचीच प्रेरणा होती आणि अमेरिकेचाही छुपा पाठिंबा होता; पण त्याला पुरून उरलेल्या इराणने पुढल्या काळात आपली सुरक्षा यंत्रणा अधिक सज्ज करून आसपासच्या प्रदेशातील शियापंथीय सत्ताधारी व राज्यकर्त्यांना एकत्रित करण्याचे नियोजन आरंभले. त्यानंतर पश्चिसम आशियाचा राजकीय संघर्ष प्रतिदिन शिया-सुन्नीण असा बळावत गेला. त्यात इराणविरोधात सौदीने इस्रायलशीही दोस्ती करण्यापर्यंत मजल मारली. त्यातून या संघर्षाची धार लक्षात येऊ शकते.
‘इसिस’ ही संघटना वा त्यांची खिलाफत, ही सौदी अरेबियाच्या राजाची कठपुतळी आहे. पश्चि्म आशियामध्ये वहाबी इस्लामचा प्रचार व प्रसार करण्यासाठी हिंसक जिहादी मार्गाने लढणारी फौज, सौदीने ‘इसिस’च्या रूपात उभी केलेली आहे आणि आताही इराणमधील हल्ल्याची जबाबदारी ‘इसिस’ने तत्काळ घेतलेली आहे. ‘इसिस’ने आजवर अनेक हल्ले व घातपात केले आहेत; पण त्यांनी कधी सौदी अरेबिया वा त्यांच्या आघाडीतील कुठल्याही देशात वा देशाविरुद्ध काही केल्याचे ऐकायला मिळणार नाही. कारण अशा सौदी वहाबी आघाडीतले देशच ‘इसिस’चे बोलविते धनी आहेत. साहजिकच त्या आघाडीचा कडवा विरोधक वा शत्रू असलेला इराण, ‘इसिस’च्या घातपात यादीत असला तर नवल नाही. यात कुठलेही मोठे नुकसान झालेले नसले तरी इराणची राजधानी सुरक्षित नाही, हा संदेश त्यातून दिला गेलेला आहे. ‘इसिस’ची इराक-सीरियन प्रदेशात जबरदस्त पीछेहाट झालेली आहे आणि त्या लढाईत ‘इसिस’शी लढणार्याल फौजांमध्ये इराणची शिया लढवय्यांची हजेरी आहे. लेबेनॉन व सीरिया अशा दोन शियाबहुल देशातच ‘इसिस’ धुमाकूळ घालत असते. बळकावलेल्या प्रदेशातून पीछेहाट होत असल्यानेच सूड म्हणून ‘इसिस’ने इराणमध्ये घातपाताची सज्जता दाखवायला हा हल्ला केलेला असावा. त्यात मनुष्यहानी हा मुद्दा दुय्यम आहे. त्यापेक्षा इराणच्या पवित्र वा मोक्याच्या जागी आपण धडक देऊ शकतो, हे दाखवण्याचा हेतू त्यात अधिक आहे; पण असल्या हल्ल्यांनी विस्कळीत इराण संपला नव्हता. तर तशा हल्ल्यांनी आता इराण ‘इसिस’विरोधात माघार घेईल, अशी अपेक्षा कोणी करू शकत नाही. मात्र या हल्ल्यामागचा सौदीचा हात लक्षात आल्यावर इराण खुद्द सौदीवरच चाल करण्याची मोठी शक्यता आहे. याचा अर्थ थेट लष्करी हल्ला सौदीवर केला जाणार नाही; पण अन्य मार्गाने असे काही होऊ शकेल. सौदीच्या सुन्नीा वहाबी आघाडीची जशी ‘इसिस’ वा जिहादी फौज आहे; तशीच इराणच्या शियापंथीय लढवय्या लोकांचीही फौज आहे. त्यांनीच मध्यंतरी येमेनमधील सौदीप्रणीत राष्ट्राध्यक्षाला पळून जाण्याची वेळ आणली होती. आता अशाच लोकांना सौदीमध्ये पाठवून तिथल्या अन्यायपीडित शियापंथीयांना इराण चिथावणी देऊ शकतो. तसे झाले तर प्रथमच जिहादी व धार्मिक युद्धाचे चटके सौदी साम्राज्याला बसू लागतील. असला माथेफिरू उद्योग इराण करू शकतो. काही वर्षांपूर्वी इराणच्या शिया धर्मांधांनी मक्केतील पवित्र मशिदीवर कब्जा मिळवण्यासाठी प्रयत्न केला होता. आता तेहरानच्या हल्ल्यानंतर इराण तशाही मार्गाचा अवलंब करू शकतो. मग ‘इसिस’ बाजूला पडून शिया-सुन्नीच धर्मयुद्धालाच तोंड फुटेल. सौदीला ते महाग पडेल. कारण सौदीच्या ऐषोरामी सुलतानांपेक्षाही इराणी धार्मिक नेते अधिक माथेफिरू आहेत
No comments:
Post a Comment