Total Pageviews

Friday 16 June 2017

काश्मीरचे काय होणार, याची चिंता सगळ्यांनाच वाटत असली, तरी केंद्रातील मोदी सरकार काश्मीरचा प्रश्‍न योग्य रीतीने हाताळत आहे आणि त्याबाबत सामान्य जनतेने काळजी करण्याचे कारण नाही


दक्षिण काश्मिरातील एका घरात आश्रय घेणार्‍या आणि तेथील नागरिकांना ढाल बनवून लष्करी जवानांवर गोळीबार करणार्‍या लष्कर-ए-तोयबाच्या दोन अतिरेक्यांचा जवानांनी आज शुक्रवारी खात्मा केला. यात तोयबाचा क्षेत्रीय कमांडर जुनैद मट्टूचा समावेश आहे. त्याला ठार करण्यात आल्यामुळे तोयबाची मोठी पिछेहाट झाली आहे. या कारवाईत एका अतिरेक्याला जिवंत पकडण्यात आले आहे. अनंतनाग जिल्ह्यातील बिजबेहाराच्या अर्वानी गावात आज सकाळी काही अतिरेकी आले असल्याची माहिती लष्कराला मिळाल्यानंतर जवानांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने या भागात मोहीम हाती घेतली. जवानांना पाहताच या अतिरेक्यांनी एका घरात आश्रय घेतला आणि तेथील नागरिकांना ढाल बनवून गोळीबार सुरू केला. नागरिकांना कुठलेही नुकसान होणार नाही, याची काळजी घेताना जवानांनी अतिशय सावधपणे पावित्रा घेतला आणि अतिरेक्यांना प्रत्युत्तर दिले, अशी माहिती लष्करी प्रवक्त्याने दिली. या चकमकीत दोन अतिरेकी ठार झाले असून, यातील एक तोयबाचा क्षेत्रीय कमांडर जुनैद मट्टू असून, दुसर्‍याचे नाव मुझम्मिल असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्या तिसर्‍या साथीदाराला जिवंत पकडण्यात जवानांना यश आले आहे. जुनैदने मागील वर्षी पोलिसांच्या वाहनावर केलेल्या हल्ल्यात तीन पोलिस मृत्युमुखी पडले होते. जुनैद गेल्या दोन वर्षांपासून तोयबासाठी काम करीत होता. त्याच्यावर दहा लाख रुपयांचे बक्षीसही ठेवण्यात आले होते. दोन नागरिकांचा मृत्यू दरम्यान, घरातील अतिरेक्यांना ठार मारण्याच्या या कारवाईत दोन नागरिकही ठार झाले आहेत. यातील एकाचे नाव मोहम्मद अश्रफ असे असून, दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू असताना तो मधात आल्याने एक गोळी त्याला लागली. या घटनेनंतर काही लोकांनी जवानांवर दगडफेक केली. त्यांना पांगविण्यासाठी जवानांनी पेलेट गनचा वापर केला. यात एक नागरिक जखमी झाला, अशी माहिती सूत्रांनी सांगितले. (वृत्तसंस्था) गेल्या वर्षापासून भारतीय लष्कराला मिळालेले हे तिसरे मोठे यश आहे. बुरहान वाणी, त्याचा साथीदार अहमद भट याच्यानंतर मट्टूला ठार मारण्यात यश आले आहे. काश्मीर खोर्‍यातील १२ वॉण्टेड अतिरेक्यांच्या यादीत जुनैदचा समावेश होता काश्मीरचे काय होणार, याची चिंता सगळ्यांनाच वाटत असली, तरी केंद्रातील मोदी सरकार काश्मीरचा प्रश्‍न योग्य रीतीने हाताळत आहे आणि त्याबाबत सामान्य जनतेने काळजी करण्याचे कारण नाही. जेवढी चिंता आपल्याला आहे, त्यापेक्षा कितीतरी अधिक चिंता पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या सहकार्‍यांना आहे. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि त्याकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍याला धडा शिकविण्याची ताकद आमच्या सेनादलात आहे, याविषयी आम्ही खात्री बाळगली पाहिजे. आज काश्मीरमध्ये जी अभूतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे, ती त्या प्रदेशाला कुठे घेऊन जाणार, हे येणारा काळच सांगेल. पण, काश्मीरमधल्या लोकांची वृत्ती बदलली नाही तर ते आत्मनाश करून घेणार, यात शंका नाही. काश्मीरचे भारतात विलीनीकरण झाल्यापासून आजपर्यंत तिथे कधीही शांतता नांदली नाही. नांदू दिली गेली नाही. बोटावर मोजण्याएवढ्या काही स्वार्थी लोकांनी तिथल्या शांतताप्रिय नागरिकांना भडकवले आणि आपल्या पोळ्या शेकण्याचा उद्योग केला. आजही तो घाणेरडा उद्योग सुरूच आहे. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या चिथावणीवरून काश्मिरी तरुण, भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांवर दगड फेकत आहेत, त्यांना शिवीगाळ करीत आहेत, त्यांचा अपमान करीत आहेत. अतिरेक्यांशी लढणार्‍या आमच्या जवानांच्या मार्गात ते आडवे येत आहेत. तिथले तरुण पाकच्या चिथावणीला बळी पडत असेच वागत राहिले, तर त्यांच्या सत्यानाशाला कारणीभूत तेच ठरणार आहेत! सगळे मुसलमान दहशतवादी नाहीत हे खरे असले, तरी सगळे दहशतवादी मुसलमानच आहेत, हे दुर्दैवाने खरे आहे. काश्मीर भारतात विलीन झाल्यापासून भारत सरकारने कधीही काश्मीरला सापत्न वागणूक दिली नाही. मुसलमानांना त्यांच्या धर्मानुसार आचरण करण्याच्या मार्गातही सरकारने कधी बाधा आणली नाही. त्यांच्या धार्मिक मान्यताही कधी फेटाळून लावल्या नाहीत. एखादे सरकार तुम्हाला जर तुमच्या धर्मातील रीतिरिवाजानुसार वर्तन करण्याची अनुमती देत आहे, तर मग त्या सरकारच्या विरुद्ध आवाज उठविण्याचे कारण काय? जे सरकार तुम्हाला धर्माचरणाचे संपूर्ण स्वातंत्र्य देते त्या सरकारविरुद्ध लढाई लढणे इस्लामला खरे तर मान्य नाही. जम्मू-काश्मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता असताना भारताच्या जवानांवर दगडफेक होत नाही, असे मानले जाते. बहुतांशी ते खरेही आहे. पण, नॅशनल कॉन्फरन्सची सत्ता जाताच तिथे दगडही फेकले जातात, हिंसाचारही वाढतो, भारताविरुद्ध जनमानस पेटून उठते, हे कसे काय? सत्ता गमावलेल्या नॅशनल कॉन्फरन्सचे नेते तर फुटीरवाद्यांना चिथावणी देत नाहीत ना? तेच तर त्यांना आर्थिक रसद पुरवत नाहीत ना? असे एक ना अनेक प्रश्‍न उपस्थित होतात. जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी मध्यंतरी एक वादग्रस्त आणि अतिशय बेजबाबदारपणाचेही विधान केले. कुपवाडामध्ये भारतीय लष्करासोबत जी चकमक झाली, तिची चर्चा ही मुसलमानांना बदनाम करण्यासाठीच केली जात आहे, असे ते बेजबाबदार विधान फारुख अब्दुल्ला यांनी केले होते. डॉ. फारुख अब्दुल्ला यांनी असे वक्तव्य केल्याने आश्‍चर्य वाटण्याचे काही कारण नाही. कारण, तो त्यांचा स्वभावच आहे. त्यांच्यावर जे संस्कार झाले आहेत, त्या संस्कारांचाच तो एक भाग आहे. त्यांचे वडील शेख मोहम्मद अब्दुल्ला यांनी जे संस्कार दिले, ते लक्षात ठेवूनच फारुख यांची वाटचाल सुरू आहे. चकमकीचा मुसलमानांना बदनाम करण्याशी काय संबंध आहे? सीमेपलीकडून पाकिस्तानप्रशिक्षित अतिरेकी काश्मिरात घुसतात, आमच्या लष्करी तळांवर हल्ला करतात, त्यात आमचे शूर जवान शहीद होतात अन् हे अतिरेकीही मरतात. आता चकमक करणारे आणि मरणारे अतिरेकी हे मुसलमान आहेत, हा काय सुरक्षा दलाचा दोष आहे का? त्या चकमकीची चर्चा करणार्‍यांचा दोष आहे का? मग, फारुख अब्दुल्ला यांनी चकमकीच्या चर्चेचा संबंध मुसलमानांच्या बदनामीशी जोडण्याचे कारण काय? कारण आहे त्यांचे अतिशय संकुचित, घाणेरडे, जातीयवादी राजकारण! काश्मीर खोर्‍यात आज जेवढे नेते आंदोलनाचे नेतृत्व करीत आहेत, ते सगळे या आंदोलनाला इस्लामिक असे संबोधत आहेत. पण, खरे पाहता या आंदोलनाचा इस्लामशी काहीएक संबंध नाही. गनिमी कावा आणि कटकारस्थान करून लढाई लढणेही इस्लामच्या तत्त्वात बसत नाही. असे असतानाही काश्मिरातील नेते गनिमी काव्याने आणि कटकारस्थान करून भारतीय लष्करासोबत लढताना दिसतात. ही बाब इस्लामच्या विरुद्ध आहे, असे इस्लामला मानणारे अनेक विद्वान सांगतात. आज काश्मिरी तरुणांना भारतीय लष्कराविरुद्ध चिथावण्यात आले आहे. काश्मिरात अशांतता, अस्थिरता असल्याने मुलं शाळेत जात नाहीत, तरुण कॉलेजात जात नाहीत, त्यांचे शिक्षण अर्धवट होत आहे. दुसरीकडे मात्र चिथावणी देणार्‍या फुटीरतावादी नेत्यांची मुलं परदेशात इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये शिकत आहेत. त्यांची मुले उच्चशिक्षित होऊन तिकडेच राहात आहेत अन् रग्गड कमाईही करीत आहेत. फुटीरतावादी सगळे नेते भारत सरकारकडून विविध सोईसवलतीही घेत आहेत अन् भारताविरुद्ध लढाईही पुकारत आहेत. या नेत्यांचे ऐकणे सोडले नाही, तर तिथल्या तरुणाईचे भविष्य अंधकारमय आहे, हे वेगळे सांगण्याची गरज नाही! फुटीरतावादी नेते आपल्याच लोकांचे जीवन बरबाद करीत आहेत, हे तिथल्या लोकांनी ओळखले पाहिजे. काश्मिरी लोकांनी जरा भूतकाळात डोकावून पाहिले तर त्यांच्या पदरी फक्त आणि फक्त निराशाच पडेल, दुसरे काही नाही! ज्या अंधार्‍या गल्लीला अंतच दिसत नाही अशा गल्लीत फुटीरतावादी नेते काश्मिरी तरुणाईला ढकलत आहेत. फुटीरतावाद्यांमध्येही दोन गट आहेत. एकाला असे वाटते की, काश्मीर स्वतंत्र झाले पाहिजे अन् दुसर्‍याला असे वाटते की, पाकिस्तानात विलीन झाले पाहिजे. आज काश्मीरकडे जो पर्याय शिल्लक आहे तो भारत किंवा पाकिस्तान नव्हे, तर यश व अपयश हाच आहे. आजची परिस्थिती लक्षात घेतली, तर काश्मिरी जनता अपयशी ठरल्याचेच दिसते आहे. काश्मिरी जनतेच्या कल्याणासाठी भारत सरकारने सर्व प्रकारचे उपाय केलेत, प्रचंड आर्थिक मदत केली, सुरक्षा पुरविली. असे असतानाही तिथली जनता अतिशय दरिद्री, अस्थिर जीवन जगत आहे, हे दुर्दैवीच होय. आज जगात जेवढे मुसलमान आहेत, त्यांच्यापैकी सगळ्यात जास्त प्रगती कुणाची झाली असेल तर ती भारतातल्या मुसलमानांची झाली आहे! भारत हे एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे. भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश आदी देशांचा विचार केला तर सर्वाधिक श्रीमंत मुसलमान हे भारतात आहेत. ही बाब तमाम मुस्लिमांनी लक्षात घेतली पाहिजे. काश्मिरी जनता जोपर्यंत स्वत:ला भारताचा अविभाज्य घटक मानत नाही तोपर्यंत त्यांची सर्वांगीण प्रगती केवळ अशक्य आहे. भारतीय लष्कर जेव्हा पहिल्यांदा काश्मीरमध्ये दाखल झाले होते, तेव्हा ते काश्मिरी जनतेच्या रक्षणासाठीच, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. जर आपण अजूनही दहशतवाद्यांनाच आश्रय देणार असू, तर शांतता अन् स्थैर्य कधीच लाभणार नाही अन् आर्थिक प्रगती तर शक्यच होणार नाही, हेही तिथल्या जनतेने लक्षात घेणे गरजेचे आहे. कट्‌टरपंथी विचार कधीच प्रगतीकडे नेत नाहीत, ते विनाशाचेच कारण ठरतात, हे लक्षात घेऊन काश्मिरी जनतेने स्वयंनिर्णय घेतला तरच त्यांचे कल्याण होईल. अजूनही वेळ गेलेली नाही. काश्मिरी तरुणांनी आयएसआय आणि फुटीरतावाद्यांच्या कचाट्यातून स्वत:ला सोडवावे आणि उत्तम आयुष्य जगण्याचा मार्ग चोखाळावा…

No comments:

Post a Comment