Total Pageviews

Monday, 19 June 2017

क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्ताननं भारतीय संघाची पार दाणादाण उडवली असली, तरी हॉकीमध्ये भारताच्या वीरांनी पाकवर जबरदस्त 'सर्जिकल स्ट्राइक' करून देशवासीयांच्या दुःखावर फुंकर घातली आहे. त्यांच्या या दणदणीत विजयाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. पण, त्यांनी आणखी एक अशी कृती केलीय की, ती कळल्यावर त्यांच्याबद्दलचं प्रेम, अभिमान नक्कीच दुणावेल.


पुन्हा पुन्हा काश्मीर Maharashtra Times | Updated: Jun 19, 2017, 01:05AM IST 0 टीम इंडियाचा दारूण पराभव करून पाकिस्ताननं चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरल्यानं पाकमध्ये आठवडाभर आधीच ईद साजरी होतेय. पण, काश्मीरमधील फुटीरतवादीही या विजयाने खुश झालेत. या आनंदाच्या भरातच हुर्रियतचे नेते मीरवाइज उमर फारुख यांनी पाकच्या अभिनंदनाचं ट्विट केलं. ते वाचून क्रिकेटवीर गौतम गंभीर खवळला आणि त्यानं एक खणखणीत 'स्ट्रेट डाइव्ह' हाणला. 'चहुकडे फटाके फुटताहेत. असं वाटतंय जणू ईद लवकर आलीय. चांगल्या संघाने बाजी मारली. पाकिस्तानचं अभिनंदन', असं ट्विट फारुख यांनी केलं होतं. या ट्विटवरून सोशल मीडियावर वादळ येणार, हे नक्कीच होतं. त्यावर लगेचच तीव्र प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. गौतम गंभीरनं हे ट्विट उशिरा पाहिलं, पण त्यावर त्याने हाणलेल्या षटकाराने देशप्रेमींची मनं जिंकली. 'मीरवाइज, तुम्ही सीमेपलीकडे का जात नाही. तिथे तुम्हाला आणखी चांगले फटाके (चिनी?) आणि ईदेचा जल्लोष पाहता येईल. तुम्हाला बॅगा भरण्यासाठी मी मदत करू शकतो', असा फटका त्यानं लगावला. हे ट्विट १० हजाराहून अधिक ट्विपल्सनी 'लाइक' केलंय.क्रिकेटच्या मैदानावर पाकिस्ताननं भारतीय संघाची पार दाणादाण उडवली असली, तरी हॉकीमध्ये भारताच्या वीरांनी पाकवर जबरदस्त 'सर्जिकल स्ट्राइक' करून देशवासीयांच्या दुःखावर फुंकर घातली आहे. त्यांच्या या दणदणीत विजयाचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. पण, त्यांनी आणखी एक अशी कृती केलीय की, ती कळल्यावर त्यांच्याबद्दलचं प्रेम, अभिमान नक्कीच दुणावेल. हॉकी वर्ल्ड लीग स्पर्धेत कालच्या पाकविरुद्धच्या सामन्यात भारतीय संघ दंडावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरला होता. त्या नेमक्या कशासाठी आहेत, कशाच्या निषेधार्थ आहेत, हे कुणालाच ठाऊक नव्हतं. परंतु, ते जेव्हा समोर आलं, तेव्हा भारतीयांची मान उंचावली आणि पाकिस्तानची शरमेनं खाली गेली. पाकिस्तानी सैन्याकडून काश्मीरमध्ये होत असलेल्या भ्याड हल्ल्यांचा निषेध म्हणून भारतीय हॉकीपटूंनी या काळ्या फिती लावल्या होत्या. देशाबद्दलचा, लष्करी जवानांबद्दलचा आदर व्यक्त करण्यासाठी भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफने एकमताने हा निर्णय घेतला होता. दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे आणि फुटीरतावाद्यांना बळ देणाऱ्या प्रवृत्ती वाढल्यामुळे धुमसत असलेल्या काश्मीर खोऱ्यातील स्थिती सुधारण्याची चिन्हे तूर्त तरी दृष्टिपथात नाहीत. लष्करे तैयबाचा म्होरक्या जुनैद मॅटूसह अन्य दोघांचा खात्मा केल्यानंतर चवताळलेल्या दहशतवाद्यांनी अनंतनाग जिल्ह्यातील अचबल येथे केलेल्या हल्ल्यात पोलिस उपनिरीक्षक फिरोज दार यांच्यासह सहा पोलिस शुक्रवारी हुतात्मा झाले. मृतदेहांची विटंबना करून दहशतवाद्यांनी पळ काढला. त्याच दिवशी राजौरी येथील ताबारेषेवर पाकिस्तानच्या गोळीबारात नाईक बखतवारसिंह हे हुतात्मा झाले. शुक्रवारी या एकाच दिवशी मृत्यूने असे थैमान घातल्याने काश्मीरमधील स्थितीबाबत पुन्हा पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहे. या घटनांनंतर शनिवारी जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी विधानसभेत भाषण करून आपल्या सरकारच्या धोरणांचा पाढा वाचला खरा; परंतु त्यांची उक्ती आणि कृती यांमध्ये नेहमीच अंतर राहिले आहे. बंदुकांनी वा लष्कराच्या उपस्थितीने काश्मीरमध्ये शांतता नांदणार नाही, असे वक्तव्य करून खोऱ्यातील असंतोषावर संवाद आणि चर्चेशिवाय पर्याय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. संरक्षणमंत्र्याचा अतिरिक्त कार्यभार सांभाळणाऱ्या अरुण जेटली यांनी दहशतवादी हल्ल्याचे भ्याड असे वर्णन करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर हेच होत आले आहे. गेल्या दीड वर्षापासून काश्मीरमधील संघर्ष वाढत असून, केंद्र आणि राज्यातील सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी त्याचे निव्वळ राजकारण केले आहे. काश्मीर प्रश्नावर संवाद आणि चर्चा व्हायला हवी, असे म्हणणाऱ्या मेहबूबा मुफ्ती यांनी त्यासाठी किती गांभीर्याने प्रयत्न केले, हा प्रश्न आहेच. आपला प्रभाव असलेल्या भागांतील हिंसाचार थांबावा, यासाठी विशेष प्रयत्न घेतले काय, हाही प्रश्न आहे. बंदूक वा लष्कराच्या उपस्थितीने काश्मीरमध्ये शांतता नांदणार नाही, हे त्यांचे विधान तत्त्वतः चुकीचे नाही. काश्मीरचा प्रश्न राजकीय असल्याचे तेथील विरोधी नेते उमर अब्दुल्ला यांचे विधानही अगदीच चुकीचे नाही. हे दोन्ही नेते आणि त्यांचे वाडवडीलच गेल्या अनेक वर्षांपासून काश्मीरमध्ये आलटून पालटून सत्तेवर राहिले आहेत. सत्तेवर आणि विरोधात असताना त्यांची भाषा दरवेळी बदलत असते. सत्तेत असताना संवाद-चर्चा अशी भाषा करणारे विरोधात गेले की फुटीरतावाद्यांची वकिली करतात, असा आजवरचा अनुभव आहे. काश्मीरचा प्रश्न हा देशांतर्गत प्रश्न असला, तरी त्यात पाकिस्तानी तिढाही आहे. काश्मीरच्या मुद्द्यावरून पाकिस्तानने भारताबरोबर चारवेळा युद्ध केले आहे. त्यात अपयश आल्याने त्याने दहशतवाद्यांचे पालनपोषण करून, फुटीरतावाद्यांना बळ देऊन भारताच्या विरोधात छुपे युद्ध छेडले आहे. त्यामुळेच काश्मीरमधील असंतोष किती खरा आणि किती पाकपुरस्कृत असा प्रश्न आहे. पाकिस्तानच्या छुप्या युद्धाला तोंड देण्याचे आणि ताबारेषेवर शांतता ठेवण्याचे काम लष्कर करीत आहे.

No comments:

Post a Comment