Total Pageviews

Saturday, 3 June 2017

नरेंद्र मोदी यांच्या सरकारने आत्ता तीन वर्षे पूर्ण केली. त्यानंतर एक महत्त्वाचा टप्पा म्हणून त्यांनी युरोपीय देशांचा दौरा सुरू केला. भारताला महासत्ता म्हणून असलेली प्रतिष्ठा प्राप्त करून देण्यासाठी आणि भारतामध्ये परदेशी गुंतवणूक आकर्षित करून घेण्यासाठी आणि ऊर्जा, पर्यटन आणि उद्योग या क्षेत्रांत दमदार पावले टाकण्यासाठी या दौर्यािची आखणी करण्यात आली होती. त्यातही दहशतवादाविरोधात जगातील सर्व मानवतावादी राष्ट्रांची एकजूट करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी जी बलदंड भूमिका घेतली आहे, त्या भूमिकेला युरोपातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे, हे या दौर्यालचे महत्त्वाचे फलित आहेप्रा. डॉ. वि. ल. धारुरकर-

. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वपूर्ण युरोप दौर्या‍ची सुरुवात 28 मे रोजी झाली. सर्वप्रथम पंतप्रधानांनी जर्मनीला भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी विविध करारांवर स्वाक्षर्यास केल्या आणि इंटरगव्हर्नमेंटल कॉन्फरन्समध्ये सहभाग घेतला आणि उभय राष्ट्रांच्या विकास व गुंतवणुकीस एक मोठी झेप प्राप्त करून दिली. भारत आणि जर्मनी यांनी मैत्री म्हणजे ‘मेड फॉर इच अदर’ अशी आहे. चौथ्या आंतरराष्ट्रीय इंटरगव्हर्नमेंटल परिषदेमध्ये नरेंद्र मोदी उपस्थित राहत असल्याने भारत आणि जर्मनीदरम्यानच्या आर्थिक व औद्योगिक संबंधांना नवी चालना आणि नवी दिशा प्राप्त झाली आहे. उभय राष्ट्रांमधील संबंधांना मुत्सद्दी वळण मिळाले आहे. भारत आणि जर्मनी यांच्यातील मुत्सद्दी मैत्रीस 2000 पासून नवीन स्वरूपात प्रारंभ झाला आणि गेली 17 वर्षे ही भागीदारी दमदारपणे सुरू आहे. उभय राष्ट्रे जी-4 या परिषदेचे सदस्य आहेत. त्यांनी एकमेकांना सहकार्य करीत पाठीशी उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. जागतिक राजकारणात भारत जी भूमिका घेतो जर्मनी त्याच्या पाठीशी उभा असतो आणि संयुक्ति राष्ट्र संघाच्या सुरक्षा परिषदेमध्ये भारताला कायमस्वरूपी सदस्यत्व मिळावे म्हणून जर्मनी भारताला सहकार्य करीत आहे. तसेच हवामान बदलांच्या मुद्द्यावर भारत आणि जर्मनी यांचे एकमत झाले असून आंतरराष्ट्रीय पातळीवर एक जबरदस्त दबावगट तयार करून आपल्यासारखी भूमिका तयार करण्यासाठी उभय राष्ट्रांचे सहकार्य महत्त्वाचे ठरणार आहे. दहशतवाद हा एक महत्त्वाचा मुद्दा असून भारत, जर्मनी आणि इतर युरोपीय राष्ट्रे मानवतावादाच्या द‍ृष्टीने एकत्र येऊन दहशतवादाशी मुकाबला करण्यासाठी एकत्र येत असून दहशतवादाला ठोस प्रत्युत्तर देण्याचा संकल्प उभय राष्ट्रांनी केला आहे. 2016 मध्ये ब्रेक्झिट झाले तेव्हा अमेरिकेनेही नाक मुरडले होते. आता फ्रान्स, स्पेन या युरोपीय राष्ट्रांशी भारताने मुक्तट व्यापार करारावर सह्या केल्या तर अमेरिका, इंग्लंड यांनी माघार घेतल्याने निर्माण झालेली पोकळी भरून निघणार आहे. तसेच आवश्यक साधनसामग्री आणि संपत्तीचा ओघ भारताकडे वळू शकेल. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विकास करता येईल. युरोपीय राष्ट्रांना आशिया खंडात गुंतवणूक करायची आहे. भारताचा भूप्रदेश, लोकसंख्येतील तरुणांची संख्या पाहता भारतात गुंतवणूक करण्यासाठी युरोपीय राष्टे्र उत्सुक आहेत आणि यासाठी जर्मनी भारताच्या जवळ येत आहे. विशेषतः या करारांनुसार, जर्मनी दर वर्षी 1 अब्ज डॉलर रुपये अक्षय ऊर्जा, सौर ऊर्जा, तसेच पर्यावरण संवर्धन या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणार आहे. म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जर्मनी दौर्या्चे दुहेरी फायदे दिसून येतात. स्पेनचा दौरा तीस वर्षांनंतर प्रथमच नरेंद्र मोदी यांनी स्पेनचा दौरा केला तेव्हा स्पेनमधील जनतेने त्यांचे उत्स्फुर्त स्वागत केले. स्पेनमधील दौर्यादत उभय राष्ट्रांतील महत्त्वाच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विषयांवर नवी चर्चा घडून आली. 1956 पासून असलेल्या उभय राष्ट्रांच्या संबंधाला आता एक नवे यशोशिखर प्राप्त झाले आहे. मोदी यांच्या दौर्या्मध्ये स्पॅनिश जनता रोमांचित झाली. राजीव गांधी यांनी स्पेनला भेट दिल्यानंतर मोठीच पोकळी निर्माण झाली होती; परंतु आता ही पोकळी मोदी यांनी आपल्या राजकीय चतुराईने भरून काढली आहे आणि भारत-स्पेन मैत्रीचा सुवर्ण धागा पुन्हा एकदा भक्क म केला आहे. स्पेनचे पंतप्रधान मारियाना राजुए यांच्याशी द्विपक्षीय शिखर परिषद झाली आणि भारत-स्पेनदरम्यान अनेक महत्त्वाचे करार संमत करण्यात आले. तसेच स्पेनचे राजे फिलिप सहावा यांचीही सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मोदी यांनी तेथील भारतीय उद्योग आणि स्पॅनिश कंपन्यांचे प्रतिनिधी यांची संयुक्ता बैठक घेतली असून त्या बैठकीत भारतातील उद्योगक्षेत्रात असलेल्या संधींबद्दल त्यांच्याशी चर्चा केली आणि या चर्चेतून अनेक उद्योजक स्पेनमधून भारतात उद्योग आणण्यासाठी इच्छुक असल्याचे दिसून आले आहे. भारत आणि रशिया मैत्रीचा सेतू सत्तर वर्षांच्या मैत्रीची दीर्घ परंपरा असलेला भारत हा रशियाचा जुना साथीदार असून रशियाचे पंतप्रधान पुतीन यांच्याबरोबर 18व्या आंतरसरकार शिखर परिषदेत नरेंद्र मोदी यांनी सहभाग घेतला आणि मौलिक उद्बोधन केले. उभय राष्ट्रांतील मैत्री आणि करार यांचा तेजस्वी इतिहास त्यांनी तिथे मांडला. सेंट पीटर्सबर्ग या रशियातील मोठ्या शहरात आंतरराष्ट्रीय इकोनॉमिक फोरम किंवा आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यासपीठाची बैठक झाली. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक विकासाच्या आपल्या अनेक नव्या संकल्पना मांडल्या. प्रामुख्याने भारतातील परदेशी गुंतवणूक कशी वाढेल, रशियातील भारतीयांना कशा संधी मिळतील या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या आदानप्रदानाच्या योजना त्यांनी खुल्या करून दाखवल्या आहेत. प्रामुख्याने पायाभूत विकास, उभय राष्ट्रांतील नागरी पातळीवरील सहकार्य, आर्थिक गुंतवणूक याबाबतीमध्येही रशियाने भारताच्या पाठीशी उभे राहण्याचा संकल्प केला आहे. रशियाबरोबर प्रामुख्याने राजकीय मुत्सद्दी पातळीवरील सहकार्य, ऊर्जा क्षेत्र, तसेच अंतराळ संशोधन, ऊर्जा विकास, उद्योग क्षेत्रातील आर्थिक सहकार्य याविषयी करार झाले आहेत. प्रामुख्याने भारताला दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी रशियाचे सहकार्य मिळणार आहे. अफगाणिस्तानचा नाजूक प्रश्नत हाताळतानादेखील रशियाने भारताची बाजू घेतली आहे. फ्रान्स हा भारताचा महत्त्वाचा भागीदार मोदींच्या दौर्याचची सांगता फ्रान्स भेटीने झाली. युरोपच्या राजकारणात फ्रान्सचे महत्त्वाचे स्थान आहे. भारत-फ्रान्स संबंधांदरम्यान अणुऊर्जा, संरक्षण आणि आर्थिक विकास क्षेत्रातील परस्पर सहकार्य ही महत्त्वाची क्षेत्रे असून युरोपीय राष्ट्रांशी मुक्तु व्यापार करार कसा करता येईल याविषयी फ्रान्सच्या दौर्या त चर्चा करण्यात आली. अमेरिका आणि इंग्लंडने मुक्त् व्यापारासाठी दारे बंद केल्याच्या पार्श्व्भूमीवर सर्व युरोपीय राष्ट्रांशी मुक्ती व्यापार करार करून भारताने आपले दरवाजे खुले केले आहेत. सर्व नफ्याचा लोट अमेरिका आणि इंग्लडकडे न जाता सबंध युरोपाची बाजारपेठ भारतासाठी खुली होणार आहे. नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यानंतरच्या काळात केलेला हा सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. कारण, प्राचीन काळापासूनच भारताने जेव्हा जेव्हा मुक्ता व्यापार केला आहे तेव्हा भारताचा विकास झाला आहे. त्यामुळे हा निर्णयही भारताला प्रगतीच्या आणि समृद्धीच्या शिखराकडे घेऊन जाणारा ठरू शकेल. अशा प्रकारे नरेंद्र मोदी यांचा सात देशांचा दौरा युरोपीय देशांशी सुसंवाद साधणारा एक महत्त्वपूर्ण दौरा ठरला आहे. पंतप्रधान नरेेंद्र मोदी यांनी युरोपीय देशांची सहानुभूतीच नव्हे, तर सहकार्यदेखील मिळवले आहे. पाच युरोपीय राष्ट्रे फार मोठी गुंतवणूक करण्यासाठी भारताशी सुसंवाद साधत आहेत, ही सगळ्यात मोठी जमेची बाजू होय. - प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर

No comments:

Post a Comment