एकीकडे, सर्वदूर विखुरलेल्याच नव्हे, तर दिवसागणिक पाळेमुळे घट्ट होत असलेल्या इस्लामिक दहशतवादाशी लढण्याकरिता संपूर्ण जगाने एकत्र येण्याची गरज, तिकडे वॉशिंग्टनमध्ये झालेल्या बैठकीनंतर डोनाल्ड ट्रॅम्प आणि नरेंद्र मोदींनी जाहीरपणे व्यक्त करण्याला अद्याप काहीच क्षण उलटले असताना, दहशतवाद्यांचे पोशिंदे ठरलेल्या बहरीन आणि काश्मिरातील मुस्लिमांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचे आवाहन, इराणच्या अयातुल्ला खोमेनी याने केले असल्याची दुर्दैवी बातमी येऊन धडकली आहे. बीभत्स कारनाम्यांचा हिरवा रंग नाकारत, कायम मुजोरी करणार्यान आणि तरीही आडमार्गाने दहशतवादाचाच पदर धरून चालणार्यांतचा चेहरा या निमित्ताने जगासमोर आला असून, ज्यात कुणाचेच कल्याण नाही, असा मार्ग चोखाळणारे लोक नेमके कोण, हेही या निमित्ताने जगजाहीर झाले आहे. तसेही जगाच्या पाठीवर धर्माच्या नावावर घातला जाणारा धिंगाणा नेमका कोण घालतोय्, बंदुकीच्या जोरावर मुजोरी कुणाची चालली आहे, तलवारीच्या पातींनी मुडदे पाडत माणसांचे रक्त कोण सांडवतोय् अन् तरीही शांततेचे गोडवे गात, तोंडी शिवराळ माजोरी कुणाच्या आहे, हेही सार्याम विश्वासला ठाऊक झाले आहे एव्हाना! यात दुर्दैव फक्त एवढेच की, रंग हिरवा असल्याने ही मुजोरी ठेचून काढण्याची मर्दुमकी सिद्ध करायला सरसावणार्यां चीच तेवढी वानवा असते. भारतातील राजकीय वातावरणात मुस्लिमांचे अमर्याद लांगूलचालन, ही सर्वांचीच राजकीय अपरिहार्यता ठरली असली, तरी इतरत्रही सर्वदूर चित्र हेच आहे. अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी, दहशतवादाने प्रभावित सात मुस्लिमबहुल देशांतील नागरिकांनी अमेरिकेत आश्रयाला येण्याच्या प्रकारावर वेसण घालण्याचा नुसता निर्णय घेतला, तरी ज्या त्वेषाने लोक चवताळून उठले, चौफेर प्रतिक्रिया उमटल्या, ज्या तर्हे्ने चहुबाजूने टीकेची झोड त्यांच्यावर उठविण्यात आली, ती बघता, वैश्विअक स्तरावरही, जनमानस कोणत्या बाजूने आहे, हे पुरेसे स्पष्ट होते. दहशतवादाच्या पार्श्वलभूमीवर निर्माण झालेल्या भारतीय परिस्थितीचा आणि त्या विपरीत स्थितीतही मागील कालावधीत या देशाने साधलेल्या नेत्रदीपक विकासाचा विचार करता, प्रगतीच्या मार्गात अडथळा ठरणारा दहशतवाद ठेचून काढण्याची गरज भारताला सातत्याने जाणवणे स्वाभाविकच असले, तरी दहशतवादाच्या या समस्येने दिवसागणिक व्याप्ती वाढवत, गेल्या काही वर्षांत जागतिक पातळीवर जे गंभीर स्वरूप प्राप्त केले आहे, ते बघता, त्याचा त्याच स्तरावरून सामना करणे, ही पृथ्वीतलावरील सर्वच देशांची प्राथमिक निकड झाली आहे. अशा स्थितीत अमेरिकेसारखा बलाढ्य देश आणि भारतासारखी सर्वात मोठी लोकशाही व्यवस्था यांनी एकत्र येऊन निर्माण केलेल्या ताकदीतून त्या विघातक शक्तीचा नायनाट करण्याचा निर्धार व्यक्त होणे, ही खरं तर दहशतवादाविरुद्धच्या लढ्याच्या विजयाची नांदीच म्हणायला हवी! पण, इथे तर सुरू होण्यापूर्वीच या मोहिमेला खोडा घालायला काही लोक सरसावलेले दिसताहेत. इराणची अजब, हेकेखोर, धर्मांध भूमिकाही त्याच सदरात मोडणारी आहे. दहशतवाद नेमका पदराखाली झाकायचा, तो जोपासायचा की कुरवाळायचा, याबाबत मनात जराही संभ्रम नसलेला एक मानवी समूह जगभरात, तो असेल तिथे, स्वत:ला आपल्या धर्माच्या कट्टरतेच्या चौकटीत बंदिस्त करून या दहशतवादाचे समर्थन करीत राहतो. मग कुठल्याही देशाच्या सीमा त्याला आड येत नाहीत, की भाषेचाही कुठे अडथळा निर्माण होत नाही. कुर्बानीच्या नावाखाली आपल्या लहान लहान पोरांनाही लोक त्यात सहभागी करवतात. काश्मीर खोर्याडत अशाच पोरांची फौज मग जिहादी भाषा बोलते. तिथे हाच समूह आपल्याच सरकारविरुद्ध मैदानात उतरला आहे. तो निर्लज्जपणे, खुलेआम दहशतवाद्यांची बाजू घेतो अन् सरकारच्या नावानं बोटं मोडतो. प्रशासनाविरुद्ध रस्त्यावर उतरतो. आपल्याच पोलिसांवर दगडफेक करतो. धर्माच्या नावाखाली, सीमेपलीकडून फेकल्या जाणार्यार चार तुकड्यांसाठी, अनेकदा पैशासाठी या सार्यान बाबी करूनही शेवटी त्याच्या हाती काय पडते, हा प्रश्नी शिल्लक राहतोच. ‘हाती काय पडलं,’ या प्रश्ना चे उत्तर, खरं तर त्या मुस्लिम देशातील बांधवांनाही विचारला पाहिजे, जिथे त्यांच्याच धर्माच्या नावाने जिहादची लढाई चाललेली असतानाही, त्यांच्याच ज्ञातिबांधवांद्वारे ती चालली असतानाही, ज्यांना त्रस्त होऊन, स्वत:चाच देश सोडून परक्या देशात आश्रय घ्यावासा वाटू लागला आहे अलीकडे. जर स्वत:च्या धर्मासाठीचा, स्वधर्मियांनी आरंभलेला जिहादचा लढा त्यांचे स्वत:चेच प्रश्ना सोडवू शकलेला नाही, उलट त्यातून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे देश सोडून जाण्याची वेळ काही मुस्लिमांवर आली आहे, तर मग इतरांना त्यातून काय प्राप्त होऊ शकणार आहे? पण, धर्मांधतेने वेडे होत दहशतवादाला थारा देणार्या इतरही देशांची अवस्था बघा! तिथले तरुण ना शिक्षणाच्या क्षेत्रात पुढे गेले, ना व्यवसायात. ना महिलांचा विकास झाला, ना त्या देशाचा. कायम दहशतीच्या वातावरणात वावरताना दैनंदिन जीवनही अस्ताव्यस्त झालं, अशी अवस्था झाली आहे त्या देशांची. सारं बळ एकवटून यातून बाहेर पडायचं सोडून या परिस्थितीला मूक संमती देताहेत तिथले लोक अन् त्यांच्याच पाठीशी ठामपणे उभं राहण्याचं अयातुल्ला खोमेनीचं आवाहन कुठल्या सदरात बसवायचं? अन् कशासाठी त्याचं समर्थन करायचं? केवळ आपल्या धर्माला समर्थन म्हणून? बाकी जग, समाज यांच्यासाठी कर्तव्य नाहीच कुठले. फक्त मी अन् माझा धर्म? बस्स? त्याच्या पलीकडे काहीच नाही. कुणाचेच अस्तित्वही मान्य करायचे नाही अन् कुणाच्या जगण्याचा अधिकारही स्वीकारायचा नाही. सहअस्तित्वाची कल्पनाच नाकारणार्यास या विचारसरणीची झळ सगळीकडेच बसते आहे लोकांना. एका ख्रिश्चान देशात, भारतासारख्या हिंदू देशात मुस्लिमांच्या अस्तित्वाला कुठेही बाधा पोहोचत नाही. पण, मुस्लिम देशात मात्र इतर धर्मीयांना भीत भीत जीवन जगावे लागते, हे चित्र समाजमान्य कसे होऊ शकेल? हे दृश्य बदलायचे असेल, तर मुस्लिमांना त्यांचे विचार, आचार, बदलावे लागतील. दहशतवादाबाबतच्या त्यांच्या भूमिकेबाबत पुनर्विचार करावा लागेल. धर्मांध माणसांनी चुकीच्या विचारांनी प्रभावित होऊन इतरांच्या रक्ताचे पाट वाहविण्यात भले कुणाचेच नाही, हे सर्वांनीच समजून घ्यावे लागेल. पण प्रत्यक्षात तसे होताना दिसत नाही. एकीकडे अमेरिकेच्या राजधानीत व्यक्त झालेला, दहशतवादाला मातीत गाडण्याचा वज्रनिर्धार आणि नेमका त्याच वेळी इराणच्या राजधानीतून, त्याच दहशतवादाच्या पाठीवर शाबासकीची थाप मारण्याची चाललेली निलाजरी धडपड… संपूर्ण जगाची, दहशतवादाचे समर्थक आणि विरोधक अशा दोन गटांमध्ये विभागणी होण्याचा हा क्षण आहे. कोण बाजूने अन् कोण आतंकवादाच्या विरोधात, हे ही या निमित्ताने स्पष्ट होणार आहे…
No comments:
Post a Comment