Total Pageviews

Monday 8 May 2017

८४ वर्षाच्या वृद्धाने लष्कराला दिले १ कोटी-SALUTE THIS PATRIOTIC INDIAN


Maharashtra Times | Updated: May 8, 2017, 12:26PM IST 10 आणखी माहिती : retired employee donates one crore | Donation to armed forces | Donates | Bank employee | Armed forces मटा ऑनलाइन वृत्त । भावनगर फिल्मी हस्ती आणि बड्या उद्योगपतींकडून लष्करासाठी तसेच भारतीय जवानांसाठी आर्थिक मदत केल्याच्या बातम्या आपण नेहमीच वाचतो...पण निवृत्तीचं आयुष्य जगणाऱ्या एका सामान्य माणसानं लष्कराला एक कोटी रुपयांची देणगी दिल्याचं कधी ऐकलंय का?...विश्वास नाही ना बसत! पण ते खरे आहे. भावनगरमधील एका ८४ वर्षीय वृद्धाने त्यांच्या आयुष्यभरातील कमाईतील एक कोटी रूपये लष्कराला दिले आहेत. जनार्दन भट्ट असे या ८४ वर्षीय वृद्धाचं नाव आहे. ते गुजरातच्या भावनगरमध्ये राहतात. एसबीआय बँकेतून लिपिक म्हणून निवृत्त झाले आहेत. सीमेवर जवान शहीद होत असल्याच्या आणि पाकिस्तानकडून दहशतवादाला खतपाणी घातल्या जात असल्याच्या बातम्या ऐकून भट्ट व्यथित झाले होते. त्यामुळेच त्यांनी एक छोटासा हातभार म्हणून भारतीय लष्कराला एक कोटींची देणगी देण्याचा निर्णय घेतला आणि नॅशनल डिफेन्स फंडाला त्यांनी एक कोटींची देणगीही दिली. भट्ट यांनी त्यांच्या आयुष्यभराची कमाई विविध ठिकाणी गुंतवली होती. त्यातलीच ही रक्कम त्यांनी लष्कराला दिली. एसबीआयमध्ये ते युनियन लिडरही होते. शिवाय आयुष्यभर गरजवंतांना त्यांनी मदत केली आहे. यापूर्वीही भट्ट आणि त्यांच्या सहकाऱ्याने मिळून एकाल ५४ लाखांची मदत केली होती पाकिस्तानने दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करण्याचे अमानवी कृत्य केल्यानंतर भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. भारताकडून पाकिस्तानला जशास तसे प्रत्युत्तर दिले जात असल्याचा दाखवणारा हा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ असणारी पाकिस्तानी चौकी भारतीय लष्कराने क्षेपणास्त्र डागून उडवून दिल्याचे दिसत आहे. एनडीटीव्हीला मिळालेल्या माहितीनुसार भारताने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्याचा हा व्हिडीओ मागच्या महिन्यातील असून, हे नेमके कुठले स्थान आहे ते स्पष्ट झालेले नाही. नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्यानंतर भारतीय सैन्य जरब बसवण्यासाठी घातक शस्त्रास्त्रांनी उत्तर देत आहे.

No comments:

Post a Comment