Total Pageviews

Sunday, 21 May 2017

सायबर सुरक्षा आणि भारत- अभिजित वर्तक


सध्या जगभर उत्पात माजवणार्या- वॉन्नाक्राय रॅन्समवेअरमुळे जागतिक अर्थव्यवस्थेचे कमीतकमी चार अब्ज डॉलर्सचे (सुमारे २५ हजार कोटी रुपये) नुकसान झाले आहे, असा अंदाज आहे. आधीच्या २०१५ च्या सायबर हल्ल्यात दीड अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले होते. सायबर हल्ल्यामुळे संगणक व्यवस्था बंद पडते. डाटा चोरीला जातो. हल्ल्यानंतर व्यवस्था पुन्हा उभी करावी लागते. सुरक्षेवर अधिक खर्च करावा लागतो. या सर्व एकत्रित खर्चांमुळे नुकसान वाढत राहते. डिजिटल युगात आपण प्रवेश करून किमान दशक लोटले आहे. एकापाठोपाठ एक व्यवस्था स्वयंचलित (ऑटोमेशन) होत आहेत. काही दशकांपूर्वी कार उत्पादनांमध्ये आलेले ऑटोमेशन आता घरापर्यंत पोचले आहे. स्मार्ट लॉक, स्मार्ट टीव्ही इत्यादींपासून ते स्मार्ट होमपर्यंतचा हा प्रवास सुरू आहे. आजघडीला त्रुटी असल्या, तरी ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’च्या क्षेत्रात ज्या वेगाने प्रगती होत आहे ती पाहता, येत्या २० वर्षांत घरातल्या दैनंदिन गरजेच्या वस्तू-सेवांचेही ऑटोमेशन होईल, असे दिसत आहे. या पार्श्वआभूमीवर, नजीकच्या भविष्यात डिजिटल/सायबर हल्ल्यांची तीव्रता, स्वरूप आणि त्यापासून होणारे नुकसान वाढत राहील, अशी चिन्हे आहेत. सायबर हल्ल्यांची क्षमता किती वाढू शकेल, या विषयावर १९८० च्या उत्तरार्धापासून चर्चा झडत आहेत. हॉलिवूडमध्ये हा विषय कित्येक चित्रपटांमधून १९९० च्या उत्तरार्धात हाताळला गेला आहे. सायबर सुरक्षा क्षेत्रात काम करणार्याह तज्ज्ञांनी येत्या काळात संगणक व्हायरसमध्ये अधिकाधिक बदल होत जातील आणि त्यामध्ये दहशतवादी संघटनाही शिरतील, असा इशारा दिला आहे. भविष्यातले व्हायरसहल्ले फक्त संगणकापुरता परिणाम घडवणार नाहीत, तर ते मानवी आयुष्यापर्यंत पोचतील, असा इशारा आयबीएम सिक्युरिटी इंटेलिजन्सने २००५ मध्ये दिला होता. मोबाईल फोन, मायक्रोव्हेव अशा इलेक्ट्रॉनिक उपकरणांपर्यंत व्हायरस पोचतील, असे अवघ्या १२ वर्षांपूर्वी वाटले होते. या १२ वर्षांमध्ये तंत्रज्ञान झपाट्याने बदलले आहे आणि त्यामुळे सायबर हल्ल्याची शक्यताही अनेकपटींनी वाढली आहे. डिजिटल युगापासून दूर पळणं हा यावर मार्ग नाही. गुन्हेगारी मानसिकता डिजिटल युगापूर्वी होती आणि डिजिटल युगातही असेल. प्रश्नळ आहे तो आपण डिजिटल युगातल्या सुरक्षिततेची सातत्यानं तपासणी करतो का हा! सध्या तरी याचे उत्तर नकारार्थी आहे. मुद्रित माध्यमांचे आशादायी चित्र २००६ ते २०१६ या दशकात भारतातील वृत्तपत्रांच्या खपामध्ये सुमारे पाच टक्क्यांची वाढ झाली. या काळात इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा अक्षरश: धुमाकूळ सुरू झाला आणि मोबाईल ‘स्मार्ट’ झाला. याचा परिणाम वृत्तपत्रांवर होणे खरे तर स्वाभाविक म्हणायला हवे. तसा तो जगातल्या प्रगत देशांत होताना दिसतोही आहे. जगातील अनेक वृत्तपत्रे आर्थिक संकटात असून, त्यांचा खप कमी होत असल्याची चर्चा होत असताना, भारतीय वृत्तपत्रांच्या खपात होणारी वाढ लक्षणीय म्हटली पाहिजे. ही वाढ भाषक वृत्तपत्रांमध्ये जास्त झाली आहे, याचे कारण देशातील साक्षरतेमध्ये होत असलेली वाढ. भारतीय साक्षरतेचे प्रमाण ७४ टक्के आहे आणि ते जगाच्या सरासरीपेक्षा (८६.३ टक्के) कमी आहे. मात्र, भारतातील युवकांमधील साक्षरतेचे प्रमाण गेल्या दशकभरात कमालीचे वाढले असून ते ९० टक्क्यांपर्यंत गेले आहे. या साक्षरतेमुळे संगणक वा स्मार्टफोन आदी उपकरणे यांतून, इंटरनेटमुळे उपलब्ध होणार्यात माहितीच्या देवाणघेवाणीची अतिजलद सेवा यांचा उपयोग सर्वाधिक प्रमाणात होऊ लागला. मात्र, या सेवा अद्यापही देशातील सर्वांनाच सहज उपलब्ध आहेत, असे नव्हे. परिणामी हिंदी, तेलगू आणि कन्नड या भाषांमधील वृत्तपत्रांच्या खपात गेल्या दशकभरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली. २०१३ ते २०१५ या दोन वर्षांच्या काळात भारतीय वृत्तपत्रांचा खप १२ टक्क्यांनी वाढला, तर ऑस्ट्रेलिया, फ्रान्स, जर्मनी, जपान आणि अमेरिका या देशांमध्ये हा खप तीन ते सहा टक्क्यांनी घसरला. त्यातही इंग्लंडमध्ये सर्वाधिक म्हणजे १२ टक्क्यांची घसरण होती. गेल्या दशकभरातच भारतीय इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा सुकाळ झाला आणि देशातल्या कोणत्याही ठिकाणी किमान ८०० वाहिन्या दिसण्याची सोय झाली. भारतीय नागरिक आजही वृत्तपत्रे, मासिके, नभोवाणी, दूरचित्रवाणी यांसारख्या पारंपरिक माध्यमांवर दिवसातले अडीच तास, तर डिजिटल माध्यमांवर एक तास खर्च करतात. इंटरनेट सुविधा जसजशी गतिमान होईल, तसा हा एक तासाचा अवधीही वाढणार आहे. मात्र, जोवर संगणकाधारित माहितीचा स्रोत भारतीय भाषांमध्ये वेगवान होत नाही, तोवर भाषक वृत्तपत्रांच्या खपात वाढ होणे शक्य आहे. हिंदी वृत्तपत्रांच्या खपातील वाढ सर्वात जास्त म्हणजे सुमारे ९ टक्के आहे. मात्र, मराठी आणि बंगाली वृत्तपत्रांची वाढ दीड टक्का एवढी आहे. याचेही कारण या दोन राज्यांमधील साक्षरतेचे प्रमाण अन्य राज्यांच्या तुलनेत अधिक, हेच असावे. मात्र, सर्वाधिक साक्षरता असलेल्या केरळमधील वृत्तपत्रांच्या खपात मराठीपेक्षाही अधिक वाढ (४.११ टक्के) होते, ही बाब लक्षात घेण्याजोगी आहे. वाचनसंस्कृतीचा प्रभाव हे त्याचे कारण असले, तरीही याबाबतीत अन्य सगळ्याच भाषक वृत्तपत्रांनी आत्मचिंतन करणे आवश्यक आहे. गेल्या १० वर्षांत वृत्तपत्रीय जगात सवादोन कोटींहून अधिक वाचकांची आणि नव्याने नोंदविल्या गेलेल्या दोन हजार वृत्तपत्रांची पडलेली भर याचा विचार करता आता हे वाचक टिकवून ठेवण्याची नवी स्पर्धा निर्माण होईल. –

No comments:

Post a Comment