Total Pageviews

Monday 1 May 2017

युद्धरत सैनिक कुणाचा पुत्र आहे?वीर सैनिक चेतन चीता तर आपल्या मनोबलाने आणि लष्करी डॉक्टरांनी घडविलेल्या चमत्काराने बचावले. पण, जेव्हा जखमी मेजर सतीश दहिया यांना इस्पितळात नेण्यात येत होते, तेव्हा दगडफेक करणार्‍यांनी त्यांचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे उशीर होऊन मेजर दहियांना वाचविता आले नाही.


May 1, 2017016 अन्वयार्थ •• ••सुकमा येथे सीआरपीएफच्या २५ जवानांच्या हौतात्म्यामुळे देशभरात जो तीव्र संताप व्यक्त व्हायला हवा होता त्याचा कुठलाही संकेत मिळत नाही. हल्लेखोर कम्युनिस्ट विचारसरणीला मानणारे आहेत म्हणूनच केवळ गोरक्षकांवर संपादकीय लिहिणारे आणि सोशल मीडियावर त्यांची पाकिस्तानी दहशतवाद्यांशी तुलना करणारे आज गप्प बसले आहेत काय? वस्तुस्थिती ही आहे की, या २५ सैनिकांना कम्युनिस्ट दहशतवाद्यांनी मारले आहे. ही गोष्ट ढळढळीतपणे दिसत असूनही ती मान्य करण्यास व त्याचा जाहीरपणे उच्चार करण्यास हे लोक का कचरतात? जेव्हा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला होता, तेव्हा तो हल्ला म्हणजे भारतावर हल्ला असल्याचे समजण्यात आले होते. कम्युनिस्ट दहशतवाद्यांनी आमच्या सैनिकांवर केलेला हल्लाही भारताविरुद्ध पुकारलेले युद्धच होय. गेल्या काही वर्षांपासून कम्युनिस्ट आणि जिहादी यांच्यात भारतविरोधी आघाडी झाली आहे, जी काश्मीर ते छत्तीसगडपर्यंत सक्रिय आहे. जम्मू-काश्मीरमधील जवळजवळ सर्वच शहरे आणि सीमेवरील आघाडीवर लष्करी जवानांसमवेत राहण्याची मला पुष्कळ संधी मिळाली आहे. मी कारगिल युद्धाचेदेखील बटालिकच्या आघाडीवरून वार्तांकन केले होते. केरळ, कर्नाटक, बिहार, आसाम, अरुणाचलपासून गुजरात, पंजाब आणि जम्मूचे निवासी हे सैनिक अतिशय अभिमानाने आणि गौरवाने लष्करात दाखल होतात. मग सीआरपीएफ असो, बीएसएफ असो अथवा आयटीबीपी, आघाडीवर तैनात सैनिकांच्या गणवेषाच्या आधारे कुठलाही भेदभाव होऊ शकत नाही, तो जो कोणी आहे तो भारताचे संविधान आणि भारतीय नागरिकांचे रक्षण करण्यासाठी प्राणांची आहुती देण्यास तत्पर भारतमातेचा पुत्र आहे. याशिवाय त्याची दुसरी कुठली ओळख करून देणे चुकीचे ठरेल. आता काही दिवसांपूर्वी मी जम्मू-काश्मीरच्या दौर्‍यावरून परतलो. सैनिकांना होणारा त्रास, त्यांचे दु:ख जवळून अनुभवले आणि मनात ते खोल रुतून बसले. काश्मीरचे दगडफेक करणारे लोक आमच्याशी काय नाते ठेवू इच्छितात आणि आम्ही त्यांच्याशी कुठले नाते ठेवले पाहिजे, हे आधी ठरवावे लागेल. विडंबना ही आहे की, या देशात क्वचितच असा कुठला नेता असेल ज्याचा मुलगा लष्करात दाखल झाला आहे अथवा आजही तैनात आहे. दहशतवाद्यांना सहानुभूती दाखविणारा पत्रकार बनणे ही मीडियात अभिमानाची बाब बनली आहे. मात्र, जवानांचे दु:ख, त्यांच्या वेदना टीव्हीच्या पडद्यावर दाखविणे मागासलेले समजले जाते. आपला मुलगा आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असूनही बदमाश व दगडफेक करणार्‍यांचा बळी ठरणार असेल आणि तो आपले आणि आपल्या सहकारी सैनिकांचे रक्षण करण्यासाठी गोळीचा उपयोग करू शकत नसेल, तर आपल्याला कसे वाटेल? सोशल मीडियावर ज्या प्रकारचे व्हिडीओ जबरदस्त वेगाने पसरत आहेत, ते पाहून जर कुणाचे रक्त उसळत नसेल, तर त्याच्या भारतीयतेविषयी शंका घेण्यास जागा आहे. हे लोक देशभक्त भारतीय जनतेच्या परिश्रमाच्या कमाईतून दिलेल्या महसुलाच्या बळावर शिकतात. आपली कारकीर्द घडवितात आणि नंतर टवाळखोरी करण्यासाठी भरपूर वेळ काढून आपल्याच रक्ताच्या, भारतीय बांधवांविरुद्ध लढण्यास उभे ठाकतात. सकाळी ६ वाजल्यापासून संध्याकाळ होईपर्यंत जे सैनिक या काश्मिरींचे रक्षण तथा पूर, वादळासारख्या नैसर्गिक संकटांपासून वाचविण्यासाठी आपल्या प्राणांची बाजी लावूनही काम करतात, त्यांच्याविषयी कृतज्ञता बाळगणे तर दूर, साधा आदरही मिळत नसेल तर कुठे ना कुठे धोरणात बदल करण्याची गरज पडणारच आहे. जे दगडफेक करणारे लोक देशद्रोह, विश्‍वासघात व बेईमानीने पैसे गोळा करून आपल्याच मातृभूमीविरुद्ध नारे लावत आहेत व आमच्या वीर सैनिकांचे धैर्य व संयमाची परीक्षा घेत भेकडांप्रमाणे स्त्रियांना पुढे करून दगडफेक करतात आणि शिवीगाळ करतात, त्यांच्याविषयी दया दाखविण्याचा विचार तरी सहन केला जाऊ शकतो काय? दगडफेक करणारे खोटारडे आणि विश्‍वासघातकी काश्मिरी आंदोलक आणि त्यांचे सहानुभूतिदार, जे देशातील विविध विद्यापीठात जहाल कम्युनिस्ट आणि जिहादींच्या साहाय्याने केवळ भारताचे सामाजिक धागेदोरे उसविण्याचे कारस्थानच रचत नसून, आपल्या भाषणांच्या आणि पोस्टरांच्या माध्यमातून भारताच्या एकतेवर आघात करीत आहेत आणि त्यांना सर्वात मोठे पाठबळ भारताच्या त्या इंग्रजी माध्यमे आणि चॅनेलकडून मिळत आहे, जे देशभक्ती हा अतिशय वाईट, तुच्छ व त्याज्य गुण समजतात. वीर सैनिक चेतन चीता तर आपल्या मनोबलाने आणि लष्करी डॉक्टरांनी घडविलेल्या चमत्काराने बचावले. पण, जेव्हा जखमी मेजर सतीश दहिया यांना इस्पितळात नेण्यात येत होते, तेव्हा दगडफेक करणार्‍यांनी त्यांचा मार्ग रोखून धरला. त्यामुळे जो उशीर झाला त्यामुळे मेजर दहियांना वाचविता आले नाही. एवढे सगळे असूनही आम्ही खोर्‍यात चर्चेसाठी योग्य वातावरण निर्माण करण्याची गोष्ट करतो. एवढे सगळे असूनही काश्मिरी मुले आमचीच आहेत, असे आम्ही म्हणतो. दगडफेक करणार्‍या कुटुंबातून निघणार्‍या मुलांचे आयुष्य अतिशय आत्मीयतेने आणि प्रामाणिकपणे कोण सावरत आहे, हे वास्तव जाणून घ्यायचे असेल, तर एकाच संघटनेचे नाव पुढे येईल आणि ती म्हणजे भारतीय लष्कर! आपल्याच लोकांनी केलेल्या आघातानंतरही काश्मिरात कानाकोपर्‍यात ४५ हून अधिक सद्भावना विद्यालये भारतीय लष्कराकडून चालविली जातात. ज्यात जवळजवळ १४ हजारांपेक्षा अधिक काश्मिरी मुस्लिम मुले-मुली जवळजवळ नगण्य फी देऊन देशातील सर्वश्रेष्ठ शिक्षण प्राप्त करीत आहेत. अशा जवळपास २० शाळा पाहण्याची संधी मला प्राप्त झाली. खूपच गोड मुले या शाळांमध्ये राष्ट्रीय गीते म्हणतात. उच्च स्वरात वंदे मातरम् ऐकवतात. या सर्व शाळामंध्ये भारताचे महान राष्ट्रीय नायक व महापुरुषांची छायाचित्रे आहेत. तेथे तिरंगा फडकविला जातो. गणतंत्र दिन आणि स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो आणि या शाळांमध्ये प्रवेश घेण्यासाठी अक्षरश: रांगा लागतात. मोठमोठ्या नेत्यांकडून शिफारस पत्रे आणली जातात. हे विषासमोर भारतीय सेनेचे अमृत आहे, जे तिरंग्याची शान व संविधानाचा सन्मान वाढवीत आहेत. भारताचे मन नेहमी चांगलेच करू इच्छिते आणि या बदल्यात नेहमी दगडच मिळाले आहेत. ही गोष्ट केवळ काश्मिरात तैनात सैनिकांपर्यंतच मर्यादित राहिलेली नाही, तर ते सर्व जण जे देशातील कुठल्याही भागात राहणारे असोत, जर ते देशभक्तीची भावना दर्शवीत सैनिकांच्या सुखदु:खात त्यांच्यासमवेत उभे राहत असतील, अयोध्या, काश्मीर, गोरक्षा आणि धर्मांतरणावर त्यांचे एक विशिष्ट मत असेल, तर त्या सर्व लोकांविरुद्ध शाब्दिक दगडांचे बरसणे आता सामान्य बाब झाली आहे. भगवे वस्त्र परिधान केले आहे, ठीक आहे. पण, तरीही अशा व्यक्तीचे मुख्यमंत्री बनणे या वर्गाला पसंत पडलेले नाही. गोमांस भक्षण करणारे भलेही कमी संख्येने असतील. पण, महानगरात बसून शाब्दिक दगडफेक करणारे गोपालाच्या देशात गोमांसभक्षकांची वकिली करणे आपले पवित्र सेक्युलर कर्तव्य समजतात. सैनिकांविषयी सहानुभूती वाटण्याऐवजी सर्वसाधारण नागरिकांना व सुरक्षा दलांना विश्‍वासघाताने ठार करणार्‍यांविषयी आपलेपणा, सहानुभूती दर्शविणे, या शाब्दिक दगडफेक करणार्‍यांना प्रिय आहे. जसजशी विकासमूलक राष्ट्रीयतेची प्रखर भावना मजबूत होत आहे, तसतसे भारतीय सैनिकांचा उज्ज्वल, धवल पक्ष विजयी होईल, अशी आशा आहे आणि दगडांच्या प्राक्तनात जे लिहिले असते अगदी तशीच गती सर्व प्रकारच्या दगडफेक्यांना प्राप्त होईल, या विषयी शंका बाळगण्याचे कारण नाही

No comments:

Post a Comment