Total Pageviews

Friday, 5 May 2017

आता प्रत्येक नागरिकाला सैनिक बनावेच लागेल!-जयेश राणे


अतिरेकी, नक्षलवादी सैनिक आणि पोलिसांवर आक्रमणे करत आहेत. भारतामध्ये अशांती पसरवण्यासाठी या माध्यमांतून त्यांचे सातत्यपूर्ण प्रयत्न सुरूच आहेत. काही दिवसांच्या अंतराने वा सलग काही दिवस आक्रमण करणे चालू ठेवण्यात आल्याचे वर्तमान स्थिती सांगते. गेल्या काही दिवसात यामध्ये झालेली वाढ जेवढी चिंताजनक आहे, तेवढीच निर्माण होत असलेल्या बिकट स्थितीवर चिंतन करून थेट कृती करण्यास भाग पाडणारी आहे. `पाकिस्तानशी युद्धच करा’ असे देशातील जनता टाहो फोडून सांगत आहे. तरीही आजपर्यंत या लोकशाहीत जनतेचा आवाज ऐकला गेलेला नाही. एकाबाजूने देश विविध क्षेत्रांत प्रगती करत आहे. तर दुसर्या बाजूने शत्रुकडून होणार्या हल्ल्यांमुळे पिचत आहे. त्यामुळे देशाची प्रगती शत्रूच्या कारवायांपुढे झाकोळली जात आहे. भारताच्या प्रगतीने पोटशूळ उठणारे शत्रू देशाला कधीच स्वस्थ बसू देणार नाही. ते कुरापती काढत राहून प्रगतीस गालबोट लावण्याचे दुष्कर्म करत रहाणार. भारतावर आक्रमणांची टांगती तलवार कायम कशी राहील याचे व्यवस्थित नियोजन शत्रू करत आहे, हे त्यांच्या आक्रमणांवरून कळते. शत्रूशी युद्ध केल्यास देशाच्या अर्थव्यवस्थेस धोका पोहचेल, देश काही दशके मागे जाईल, त्यावेळी देशांतर्गत सुरक्षा कशी राखायची असे अनेक प्रश्न भारत सरकार समोर असतील. प्रश्न आहे तिथे उत्तर आहेच. या प्रश्नावर अमेरिकेपेक्षा उत्तम उदाहरण नाही. हा देश प्रगतीची उंच शिखरे सर करतच आहे, सोबतच जगाची डोकेदुखी ठरलेल्या जिहादी आतंकवादाची पाळेमुळे खणून काढण्यासाठी शत्रुवर सतत आक्रमणे करून त्यास कमकुवत करत आहे. भारतीय सैन्य पाकिस्तानच्या कुरापतींना वेळीच चोख उत्तर देत असले तरी असेच कुठेपर्यंत चालू रहाणार ? हा प्रश्न देशवासीयांना सतावतो आहे. आयुष्यातील वाईट काळ लवकर संपावा असे प्रत्येकास वाटत असते. अतिरेक्यांच्या माध्यमातून राष्ट्रावर काही दशके कायम असलेल्या वाईट काळाचा पगडा दिवसेंदिवस अधिकच घट्ट होते आहे. आक्रमण करूनच शत्रुला जगाच्या नकाशावरून नष्ट करावे लागणार आहे. तरच हे राष्ट्रीय संकट दूर होणार आहे. या संकटाच्या कचाटय़ात जवानांचे बळीच जातात, तसंच त्यांच्या शरीराची विटंबना करण्यात येत आहे. अशा जवानांच्या कुटुंबीयांचे दुःख कुठल्याही सांत्वनाने भरून येणार नाही. देशाच्या सुरक्षा यंत्रणांना लक्ष केले जात आहे. जिथे सैनिक, पोलिसच सुरक्षित नाही तिथे नागरिकांची सुरक्षा कोण करणार? असा संदेश त्या यंत्रणांवरील आक्रमणांच्या माध्यमातून देशामध्ये सतत जात राहील असे पाहिले जात आहे. सैनिक आणि नागरिकांवर असुरक्षिततेचा मानसिक दबाव टिकवून ठेवण्यासाठी शत्रू खेळत असलेल्या डावपेचांना हरताळ फासण्यासाठी देशातील नागरिकांना सैन्यासोबत राहाणे अत्यावश्यक आहे. शत्रूचा कशाप्रकारे पाडाव करता येतो याचे कैक दाखले भारताने राजे महाराजे यांच्या पराक्रमी कर्तृत्वातून अनुभवले आहेत. ते कर्तुत्व जागृत करण्यासाठी त्यांच्या पराक्रमी गाथांचा गांभीर्याने अभ्यास होण्याची नितांत गरज भासत आहे. सैनिक देशाचे रक्षण करत आहेत. पण आज अशी स्थिती आहे की नागरिकांनाही शत्रू सोबत लढण्यास सिद्ध राहावे लागणार आहे. म्हणजेच नागरिकांनाही सैनिकच बनावे लागणार आहे. 130 कोटी लोकसंख्या असलेल्या भारताने याविषयी जागृती करण्यासाठी काय करता येईल याचा अभ्यास सुरू केला पाहिजे. देशाच्या विविध क्षेत्रातील प्रगती वृद्धी व्हावी यासाठी चोहोबाजूंनी प्रयत्न सुरू आहेत. आता देशांतर्गत सुरक्षा सक्षम करण्यासाठी नागरिकांना कसे प्रोत्साहित करता येईल हे पाहाणे अनिवार्य झाले आहे. दिवसेंदिवस सीमेवरील संघर्षात होणारी वृद्धी त्या आवश्यकतेकडे लक्ष वेधते. यामुळे शत्रूलाही लक्षात येईल की भारताचे सैनिकच नाही तर त्यांचे नागरिकही लढण्यास सज्ज आहेत. परिणामी, शत्रूचे कंबरडे मोडण्यासाठी सैन्यास अधिक हिंमत मिळेल. याप्रकरणी गंभीरतेने विचार झाला पाहिजे. सीमेवर जसा धुमाकूळ घालण्यात येत आहे, त्यामुळे देशात लपून बसलेले पाकिस्तानी, बांगलादेशी घुसखोर यांच्या मुसक्या आवळणे शक्य होईल. राष्ट्रसेवा हे केवळ सैनिकांचे दायित्व नाही तर ते देशातील प्रत्येक नागरिकाचे दायित्व आहे. आपलं मत आमच्या पर्यंत पोहोचवा. नाव*

No comments:

Post a Comment