काश्मीर खोर्यात निदर्शकांकडून लष्कराच्या जीपवर करण्यात येणार्या दगडफेकीस आळा घालण्यासाठी एका निदर्शाकालाच जीपला बांधणार्या मेजर गोगोई यांना विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांच्या धैर्यास आम्ही भारतीय आदरपूर्वक सलाम करतो. ज्या कठीण स्थितीत त्यांना हा निर्णय घ्यावा लागला तो योग्यच होता, असे देशातील जनता म्हणत आहे. त्यामुळे त्यांच्या या कृतीने ज्यांना पोटशूळ उठला त्यांची कावकाव व्यर्थ ठरते. मेजर गोगोई यांनी निर्णय घेतलेल्या त्या प्रसंगात कोणाचीही प्राण हानी झाली नाही. जर तसे झाले असते तर सैन्यालाच कोंडीत पकडण्याचे फुटिरतावाद्यांचे उद्योग सुरू झाले असते. कारण त्यांना नेहमीच सैन्य आणि पोलिसांवर दगडफेक करणार्यांप्रती पराकोटीची सहानुभूती आहे. सदैव कडक नियमात राहणार्या सैन्याचा देशासाठीचा त्याग सर्वोच्च आहे. त्यामुळे देशातून शत्रूला हुसकावून लावण्यासाठी त्यांना त्यांच्या पद्धतीप्रमाणे कार्य करू देणे म्हणजेच `फ्री हॅण्ड’ असायला हवा. यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढेलच शिवाय शत्रूलाही चांगलीच जरब बसेल. छत्रपती शिवाजी महाराजांची ज्याप्रकारे आग्—याहून सुटका झाली त्या गोष्टीचे स्मरण या वेळी झाले.
लष्करप्रमुख कडाडले
भारतीय लष्कराच्या जवानांना आपण वार्यावर सोडू शकत नाही, काश्मीर खोर्यात त्यांच्यावर दगडफेक करणार्या व त्यांच्या दिशेने पेट्रोल बॉम्ब फेकणार्यांपुढे मरण पत्करा असे आपण सांगू शकत नाही, असे भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्याने देशातील सव्वाशे कोटी जनतेला भारतीय जवानांविषयी अभिमान तर वाटलाच, पण भारताच्या सरहद्दीवर अहोरात्र पहारा करणार्या आणि छुपे युध्द खेळणार्या दहशतवाद्यांशी सामना करणार्या जवानांनाही ऊर्जा मिळाली आहे. लष्करप्रमुख बोलले ते योग्यच आहे. त्यांच्याकडून अशीच भूमिका अपेक्षित होती. स्वतःला पुरोगामी म्हणविणार्या पुढार्यांनी व त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांनी देशात उच्छांद मांडला आहे. दहशतवाद्यांना दोष न देता, त्यांच्यावर कारवाई करणार्या लष्करी जवानांनाच ते उघडपणे दोष देत आहेत. काश्मीर खोर्यात हिंसाचाराने नंगानाच घातला असताना लष्कराचे नीतीधैर्य खचणे धोक्याचे ठरेल.
एक तर काश्मिरी तरूण या देशाचे आहेत म्हणून त्यांच्यावर गोळीबार करायचा नाही, पण दुसरीकडे दहशतवाद्यांचा खात्मा केल्याशिवाय शांतता निर्माण होणार नाही. पाकिस्तान प्रेरित दहशतवादी कारवायांनी काश्मीर खोर्यात थैमान घातले आहे. अशावेळी अत्यंत कठीण परिस्थितीत लष्करी व निमलष्करी सैनिकांच्या तुकडय़ा तिथे काम करीत आहेत. त्यांनी केलेली कारवाई योग्य की अयोग्य यावर वितंडवाद घालणारे वाचाळवीर या देशात बरेच आहेत, पण लष्करांच्या वाहनांवर दगडफेक करणार्या काश्मिरी तरूणांविषयी ते अवाक्षर काढत नाहीत. दगडफेक करणार्यांपासून बचाव करण्यासाठी मानवी ढालीचा वापर करणार्या मेजर लितुल गोगई यांच्या कृत्याचे लष्करप्रमुखांनी रोख ठोख समर्थ केले, हेही चांगलेच झाले. लोकसभा निवडणुकीच्या दिवशी मतदान केंद्रावर दगडफेक करणार्यांना चिथावणी देणार्या तरूणालाच मेजर गोगई यांनी जीपच्या बोनेटवर बसवले व त्याला रस्त्यावरून फिरवले. पण या घटनेचे चित्रण सोशल मिडियावर व्हायरल झाल्यावर देशातील पुरोगाम्यांनी मानवी हक्कांचे लष्कराकडून उल्लंघन झाले, असा टाहो फोडला.
खरे तर, लष्करी जवानांनी वेळीच हस्तक्षेप केला नसता तर मतदान केंद्रावर काम करणार्या सतरा निवडणूक कर्मचार्यांचे प्राण धोक्यात आले असते. मेजर गोगईंचा लष्कराने सत्कार केला तो त्यांनी काश्मिरी तरूणाला जीपवर बांधून फिरवले म्हणून नव्हे, तर सतरा कर्मचार्यांचे प्राण वाचवले म्हणून… विशेष म्हणजे, शाळा-कॉलेजमधील मुले, मुली आणि महिला लष्करी वाहनांवर व जवानांवर तुफानी दगडफेक करीत आहेत. लष्करी जवान हे आपले शत्रू आहेत असे खोर्यात बिंबवले जात आहे. दगडफेक करणार्यांना पांगविण्यासाठी जवानांना गोळीबार करता येत नाही, हे वास्तव आहे. पण त्याचाच फायदा दहशतवादी उचलत आहेत. काश्मीर खोर्यात रोज हिंसक कारवाया होत आहेत, माझ्या जवानांनी काय करावे, वाट बघा, मरा असे आपण त्यांना सांगू शकत नाही. तुमच्यासाठी शवपेटय़ा तयार आहेत, त्यात तुमचे मृतदेह फुलांनी सजवून तुमच्या मूळ गावी पाठवेन, असे मी त्यांना सांगू काय… असा प्रश्न लष्करप्रमुख बिपीन रावत यांनीच उपस्थित केला आहे. घुसखोरी व दहशतवाद चालू असेपर्यंत आपण व आपल्या फौजा शांत बसू शकत नाहीत,
हाच संदेश त्यांनी आपल्या मुलाखतीतून दिला आहे. काही दिवसांपूर्वी आपल्या नातेवाईकांच्या लग्नासाठी लेफ्टनंट उमर फैयाज हा लष्करातील तरूण काश्मीरमध्ये आपल्या गावी आला होता, त्याला घराबाहेर बोलावून दहशतवाद्यांनी त्याची निर्घृण हत्या केली, त्यावेळी उमर निःशस्त्र होता. त्याच्या हत्येनंतर काश्मीर खोर्यातील स्थानिक म्हणविणार्या कोणीही निषेध व्यक्त केला नाही किंवा कोणी रस्त्यावर आले नाही. हुजबूल कमांडर बुर्हान वाणीच्या हत्येनंतर सुरू झालेला हिंसाचार अद्याप थांबलेला नाही. वाणीचा वारस सबजार भट्ट याच्याही एन्काऊंटरनंतर काश्मीर खोर्यात अशांततेचा स्फोट झाला. फुटिरतावादी संघटनांनी तर काश्मीर बंदची हाक दिली आहे. गेले काही दिवस काश्मीर खोर्यात सारे व्यवहार ठप्प आहेत. सर्वत्र संचारबंदी पुकारण्यात आली आहे. इंटरनेट बंद असल्याने सोशल मिडियावरून पसरवल्या जाणार्या अफवांना काहीसा लगाम बसला असला तरी तो कायमचा उपाय नाही.
सर्वात गंभीर म्हणजे काश्मिरी जनतेला लष्कराची भीतीच वाटत नाही. भारतीय लष्करावर दगडेफक करून `गो बॅक’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. त्यातूनच अंतर्गत सुरक्षा कोलमडली आहे. पाकिस्तानला जे हवे आहे तेच काश्मीरमध्ये दहशतवादी व फुटिरतावादी घडवत आहेत, अशावेळी लष्कराला शांत राहता येणार नाही. काश्मीर खोर्यातील तीन-चार जिल्हे संपूर्ण देशाला वेठीला धरत आहेत. अतिरेक्यांचा खात्मा करणे हे लष्कराला अवघड नाही, पण निरपराध कोणी बळी पडू नये म्हणून सैन्याने कमालीचा संयम ठेवला आहे. लष्कराने बाळगलेला संयम व शांतता म्हणजे लष्कर डरपोक आहे, असा त्याचा अर्थ नव्हे. जवानांच्या पाठीशी आपण ठाम आहोत, त्यांनी चूक केली तर आपण त्याची जबाबदारी घेऊ, असे लष्करप्रमुखांनी सांगून सैन्यदलाला ऊर्जा दिली आहे
No comments:
Post a Comment