Total Pageviews

Sunday, 28 May 2017

बुरहान वाणीचा निकट सहकारी सबझर अहमद भट (वय फक्त २७ वर्षे) याचा खातमा झाला आणि सबझरचा आतापर्यंतचा इतिहास बाहेर येऊ लागला आहे. त्याचा म्हणे प्रेमभंग झाला होता. त्यामुळे त्याने चिडून दहशतवादी बनण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बाहेर आली आहे. प्रेमभंग केवळ काश्मिरी तरुणांचेच होतात आणि भारतातील इतर तरुणांचे होत नाहीत काय! पण, म्हणून तरुणांनी हातात बंदूक घेऊन निरपराध लोकांची हत्या करणे सुरू करायचे काय? याचे उत्तर मिळाले पाहिजे- विशेषत: मानवाधिकाराच्या नावाने गळे काढणार्‍यांकडून!


प्रेमभंग झाला म्हणून… May 29, 2017016 Share on Facebook Tweet on Twitter वेध आम्हाला लहानपणापासून सतत सांगण्यात आले आहे की, रक्तारक्तात फरक नसतो. सर्व मानवांच्या रक्ताचा रंग लालच असतो. बरोबर आहे. मग काश्मिरातील तरुणांचेच रक्त का उसळते? प्रेमभंग झाला की हो दहशतवादी. नोकरी मिळाली नाही की हो दहशतवादी. हा काय प्रकार आहे? जर रक्त सारखे आहे, तर मग ही अशी अनाठायी, आत्मघाती, देशद्रोही उसळी का म्हणून? याचीही शहानिशा व्हायला हवी. मागील आठवड्यात आपल्या देशातील वाह्यात राजकारणी मणिशंकर अय्यर फुटीरतावाद्यांशी चर्चा करायला श्रीनगरला जाऊन आले. त्यांनी काय सांगावे?- मोदी सरकारने काश्मिरातील रोजगार बुडविला! इकडे पुरोगामी शिरोमणी शरद पवार म्हणतात की, काश्मिरातील तरुणांना समजावून सांगायला पाहिजे. पवारांना पाठवायचे का तिकडे? बुरहान वाणीला, सबझर भट इत्यादींना काय समजावून सांगायचे? उद्या नक्षल्यांनाही समजावून सांगायला सांगतील हे लोक! स्वत: सत्तेत असताना, वरवर मलमपट्‌ट्या करायच्या, काश्मिरी गालिच्याखाली भारतविरोधी कृत्ये लपवून ठेवायची, भारतीय नागरिकांच्या करातून लाखो कोटी रुपये निधी म्हणून काश्मीरला पाठवायचा (त्यातला अर्धाधिक लुबाडायचा) आणि मग जगाला सांगायचे की, बघा! काश्मिरात कशी शांतता नांदत आहे. तिथला पर्यटन व्यवसाय किती बहरत आहे. हे असलेच धोरण आतापर्यंत राबविण्यात आले. काय फायदा झाला, हे आपण बघतच आहोत. दहशतवाद वज्रमुठीनेच हाताळावा लागतो, असे स्व. केपीएस गिल म्हणत असत. त्यांचे म्हणणे आधीच ऐकले असते, तर आज ही पाळीच आली नसती! ती चूक आता मोदी सरकार दुरुस्त करीत आहे, तर उगाच पोटशूळ कशापायी? हा जो भट मारला गेला, त्याचा ठावठिकाणा स्थानिकांनीच दिला होता, अशी माहिती समोर येत आहे. असे असेल, तर तो एक शुभसंकेत मानावा लागेल. स्थानिक जनताच हा दहशतवाद संपवू शकते. पंजाबात तसेच घडले होते, हे विसरू नये.

No comments:

Post a Comment