Total Pageviews

Tuesday, 23 May 2017

यापुढे जशास तसे?- pudhari-आचारसंहितेचे कौतुक सांगणार्याव दीडशहाण्यांनी लष्कराला जाब विचारण्याची स्पर्धा सुरू केली आणि त्या राजकीय दबावामुळे गोगोईच्या विरोधात चौकशी घोषित करावी लागली. अशाच राजकीय पोरखेळामुळे आज काश्मिरात दगडफेके व घुसखोर जिहादी शिरजोर झाले आहेत आणि लष्करासह पोलिस हतप्रभ झाले आहेत. हातातले हत्यार वा अंगातला पुरुषार्थ वापरण्यासच पायबंद घातला जाणार असेल, तर जवानांनी व सेनेने कुठला पराक्रम करून दाखवावा?


कुठल्याही कठोर कारवाईच्या आधी इशारा दिला जात असतो आणि भारताचे लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी तो इशारा आपल्या एका कृतीतून दिला आहे. तो इशारा अर्थातच काश्मिरात माजलेल्या अनागोंदीच्या संदर्भातला आहे. काश्मिरात सातत्याने हिंसक हल्ले होत आहेत आणि पाकिस्तानी घुसखोर जिहादी हलकल्लोळ माजवत आहेत. गेल्या तीन दशकांत क्रमाक्रमाने हा प्रकार अधिकच वाढला आहे. तिथे लष्कर तैनात करूनही हिंसाचार थांबलेला नाही, किंवा अनागोंदीला पायबंद घातला जाऊ शकलेला नाही. आता तर घुसखोर वा जिहादींशी पोलिस लष्करच्या चकमकी चालू असताना, गुन्हेगारांना वाचवण्यासाठी पोलिसांवरच दगडफेक करण्याचा नवा प्रकार आरंभला गेला आहे. शाळा वा सरकारी इमारती पेटवून देण्याच्या घटना नित्यनेमाने घडत असतात. त्यात निवारण कार्याला पोलिस, लष्कराचे जवान गेले, की त्यांच्यावरच हल्ले चढवले जातात. गेल्या महिन्यात श्रीनगर येथील पोटनिवडणुकीच्या बंदोबस्ताला तैनात असलेल्या जवानांवर दगड मारण्यापासून त्यांची छेडछाड करण्यापर्यंतची घटना कॅमेर्यावत टिपली गेली व जगाने बघितली आहे. त्याच काळात गडबड झाल्याची सूचना मिळाल्यावर आपली तुकडी घेऊन लष्कराचा अधिकारी मेजर नितीन गोगोई चालला होता. त्याच्या तुकडीवरही दगडफेक सुरू झाली. अशाप्रसंगी कुठलीही सेना वा तिची तुकडी हल्लेखोरांवर गोळीबार करून आपला मार्ग मोकळा करीत असते. तसे गोगोई करू शकला असता आणि त्यात दगडफेक्यांसह कदाचित काही नागरिकही मारले गेले असते; पण या तरुण अधिकार्याफने आपली कल्पकता दाखवून एकही गोळी न झाडता सुखरूप आपल्या स्थानी पोहोचून दाखवले. त्याने दगडफेक करणार्यांूपैकी एकाला पकडला आणि आपल्या लष्करी जीपच्या पुढे बॉनेटवर बांधला. सुरुवातीला त्याची जीप चालली होती आणि त्यावरच आपला एक काश्मिरी दगडफेक्या बांधलेला बघून, तमाम आझादीप्रेमींचा धीर सुटला. हातातले दगड निकामी झाले आणि कोणी त्या लष्करी तुकडीवर दगड मारण्याची हिंमत करू शकला नाही. हे कितपत योग्य होते? याची नंतर खूप चर्चा झाली. लष्कराने काय करावे आणि कसे वागावे, त्याचे नियम व आचारसंहिता वातानुकूलीत दालनात बसून करणार्यांसना त्यात अमानुषता दिसली. कारण त्यांना युद्धभूमी वा दंगलग्रस्त प्रदेश यातला फरक ठाऊक नसतो. कागद वा त्यातल्या नोंदी इतकीच वास्तविकता त्यांना ठाऊक असते; पण मारला गेलेला दगड वा झाडली जाणारी गोळी यातून जखमी होऊन रक्ततबंबाळ अवस्थेत विचार नावाची प्रक्रिया कशी होत असते, त्याचा त्यांना सूतराम अनुभव नसतो. मृत्यूशी झुंज वा मृत्यूशी भेटगाठ, याची त्यांना ओळखही नसते; पण गोगोई वा कुठलाही सैनिक त्याच अनुभवातून कायम जात असतात. म्हणून त्यांना त्या स्थितीतले उपाय शोधावे लागत असतात. कुठल्याही कामाची पद्धत दुय्यम असते आणि परिणाम मोलाचे असतात. परिणाम साधण्यासाठीच काम करायचे असते. ठराविक परिणाम साधण्यासाठी प्रत्येकवेळी तोच उपाय वा तीच पद्धती उपयुक्ता असेल असे नाही. कामासाठी निघालेल्या माणसाने काम पूर्ण करण्याला महत्त्व असते. गोगोई एका निवडणूक केंद्रात झालेले अराजक शांत करण्यासाठी निघाला होता आणि तिथे सुखरूप पोहोचून मतदान शांतपणे पार पाडण्याची कामगिरी मोलाची होती. त्याच्यावर कुठला जमाव दगडफेक करीत असेल तर त्यांच्याशी लढत बसणे वा त्यांना शांत करण्यात कालापव्यय करणे, म्हणजे सोपवलेल्या कामाला दुय्यम लेखून आचारसंहितेचे थोतांड माजवणे होते. गोगोईने त्यातून प्रासंगिक उपाय शोधला. दगड मारणार्यांेपैकी एकाला उचलून जीपवर बांधले आणि लष्करी गाड्यांचा ताफा आरामात त्याच ठरल्या मार्गाने पुढे आणला. समोर आपलाच एक भाईबंद असल्याने त्या ताफ्यावर कोणी दगड मारू शकला नाही आणि लष्करी तुकडीलाही कुठली गोळी झाडावी लागली नाही. थोडक्यात, काश्मिरी दगडफेके व लष्करी जवान दोघेही सुखरूप राहिले. योग्यस्थळी पोहोचल्यावर गोगोईने त्या दगडफेक्याला जीपवरून सोडवून स्थानिक पोलिसांच्या हाती सोपवले; पण गोगोईच्या या कल्पकता वा कर्तव्यदक्षतेचे कौतुक बाजूला राहिले. आपापल्या आचारसंहितेचे कौतुक सांगणार्याव दीडशहाण्यांनी लष्कराला जाब विचारण्याची स्पर्धा सुरू केली आणि त्या राजकीय दबावामुळे गोगोईच्या विरोधात चौकशी घोषित करावी लागली. अशाच राजकीय पोरखेळामुळे आज काश्मिरात दगडफेके व घुसखोर जिहादी शिरजोर झाले आहेत आणि लष्करासह पोलिस हतप्रभ झाले आहेत. हातातले हत्यार वा अंगातला पुरुषार्थ वापरण्यासच पायबंद घातला जाणार असेल, तर जवानांनी व सेनेने कुठला पराक्रम करून दाखवावा? सेना व सैनिक हे पराक्रमी असतात, ते पराक्रम गाजवू शकतात, चमत्कार करू शकत नाहीत, हे वैज्ञानिक सत्य आहे. दगडफेक्यांना समजून सांगणे हे नागरी यंत्रणांचे काम आहे. हत्यारबंद लष्कराने शस्त्राचीच भाषा वापरायची असते. जेव्हा सैन्याची तैनाती होते, तेव्हा समजावण्याची भाषा निकामी ठरल्याचा इशारा आपोआप दिला जात असतो आणि सैन्याने सैन्यासारखेच वागायचे असते. बलप्रयोग हाच सैन्याचा मार्ग असतो; पण दोन्हीच्या मधला उपाय गोगोईने चतुराईने शोधला आणि वापरला असेल, तर त्याच्या कल्पकतेचे कौतुकच व्हायला हवे आहे. सुदैवाने तितकी हिंमत व आत्मविश्वा स असलेला सेनाप्रमुख बिपीन रावत आपल्या देशात आहे आणि त्याने सोमवारी आपल्या या कल्पक अधिकारी मेजर गोगोईचे स्पष्ट भूमिका घेऊन कौतुक केले आहे; पण ते नुसते कौतुक नसून त्यात काश्मिरी उचापतखोरांना इशारा दिला गेला आहे. यापुढे जशास तसे उत्तर मिळेल, असा तो इशारा आहे..

No comments:

Post a Comment