Total Pageviews

Friday, 2 September 2011

CONTRIBUTE YOUR MIGHT FOR SNEHALAYA

स्नेहालय : वंचित, शोषितांसाठी उभारायचंयहिम्मतग्राम’ या संस्थेला देणगी देऊ इच्छिणाऱ्या गणेशभक्तांनी आपले धनादेशस्नेहालय, अहमदनगर’ या नावानेलोकसत्ता’च्या वरील चौकटीत नमूद केलेल्या कोणत्याही कार्यालयात प्रत्यक्ष आणून द्यावेत अथवा पाठवावेत. सोबत एका कागदावर देणगीदाराचे संपूर्ण नाव, पत्ता आणि संपर्क क्रमांक देणे आवश्यक आहे. देणगीदाराला आयकरात त्या रकमेवर सूट मिळेल.
किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना, मुंबईतील बॉम्बस्फोटात जखमी झालेल्यांना सर्वात आधी मदतीचा हात पुढे करणाऱ्यांमध्ये होत्या शरीरविक्रय करणाऱ्या महिला. आपण समाजाचं काही देणं लागतो, हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं. पणलालबत्ती’ म्हणून बदनाम झालेल्या वस्तीत राहणाऱ्या वेश्यांना समाज आपलं मानत नाही, सरकार मदत करत नाही. पोलीस तर त्यांना गुन्हेगारच समजतात. कुणाला लग्नाचं आमिष दाखवून फसवून देहबाजारात आणलेलं, तर कुण्या अभागीला जन्मदात्यानेच गरिबीला कंटाळून दलालाला विकलेलं. नकळत्या वयात कुंटणखान्यात आलेली मुलगी तिथून बाहेर पडणं अवघड. तारुण्य ओसरलं की ती रस्त्यावर येते आणि कुत्र्याच्या मौतीनं मरते. ‘स्नेहालय’सारख्या संस्थांमुळे हे चित्र आता बदलायला लागलं आहे. ‘स्नेहालय’ हे ३५०-४०० अश्राप मुलांचं घर आणि पोटाची खळगी भरण्यासाठी नाइलाजानं देहविक्री करणाऱ्या दोन हजारांवर महिलांचा, एचआयव्हीग्रस्तांचा आधार बनला आहे.
स्नेहालय’नं या मायबहिणींना केवळ आधारच दिला नाही, तर त्यांच्या जगण्याला अर्थ दिला. सतत कुणाकडून होणारं शोषण ही त्यांची मुख्य समस्या होती. त्यात भर निरक्षरता आणि व्यसनाधीनतेची. शिवाय गुन्हेगारीचा विळखा. या सर्वातून या महिला आणि त्यांच्या मुलांची सोडवणूक करण्याचं काम सोपं नाही. पण हे आव्हान गिरीश कुलकर्णी आणि त्याच्या मित्रांनी स्वीकारलं. सुरुवातीला अनेकांनी नाकं मुरडली, कुचेष्टा केली. पहिली काही वर्षे या महिलांचा विश्वास संपादन करण्यात आणि त्यांना नाडणाऱ्यांशी संघर्ष करण्यात गेली. दंडुकेशाहीवरच विश्वास असणाऱ्या पोलिसांच्या जाचाच्या विरोधात अनेकदा रस्त्यावर उतरावं लागलं. नाठाळ प्रशासनाला समजावण्यासाठी मूक मोर्चे काढावे लागले. अल्पवयीन मुलींना वाममार्गाला लावणाऱ्यांना कायमची अद्दल घडावी म्हणून न्यायालयीन लढाई लढून ती जिंकावी लागली. यासाठी सुदैवाने लोकाश्रय मिळत गेला, ध्येयवादी कार्यकर्त्यांची, हितचिंतकांची साथ लाभली.
स्नेहालय’च्या कार्याची क्षितिजं नंतर विस्तारत गेली. नगरजवळील एमआयडीसी परिसरातमधूबेनजी गादिया पुनर्वसन संकुल’ उभारून मुला-मुलींच्या राहण्याची, शिक्षणाची व्यवस्था करण्यात आली. आईकडे आलेल्या गिऱ्हाईकांना दारू आणून देण्यातच बालपण हरवलेली ही मुलं प्रतिष्ठित शाळांमध्ये जाऊ लागली, संगणक शिकू लागली, आयटीचे धडे गिरवू लागली. नुकतीच त्यांच्यासाठी इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यात आली आहे. कधी काळी अंगावर धड चिंधी नसणारी ही मुलं आता टाय-बुटात असतात. दहावी, बारावीनंतर व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन काहीजण स्वत:च्या पायावर उभे राहिले आहेत. नर्सिगनंतर मुली नोकरी करू लागल्या आहेत. ‘स्नेहालया’त वाढलेल्या सुमारे ५० युवतींची लग्न चांगल्या कुटुंबांत होऊन त्यांनी नवं आयुष्य सुरू केलं आहे. एड्सचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर महिलांचे प्रश्न बिकट बनले. त्यांच्या नियमित आरोग्य तपासणीसाठी स्नेहालयनंस्नेहज्योत-मुक्ता’च्या माध्यमातून जिल्ह्य़ात यंत्रणा उभी केली. कोपरगाव, शेवगाव, श्रीरामपूर येथीलपरिवर्तन संकुलां’चं काम या महिलाच पाहतात. एचआयव्ही टाळण्यासाठी कंडोम कसा आवश्यक आहे हे त्या इतरांना पटवून देतात. रेशनकार्ड मिळवून देण्यापासून बचत गट चालवण्यापर्यंत सर्व जबाबदाऱ्या या महिला सांभाळतात. पण या कामात अडथळे येतातच. पोलीस कुंटणखान्यांवर छापे टाकून आपल्या कर्तृत्वाचा डांगोरा पिटतात. यात मुख्यत्वे बळी जातो शोषित महिलांचाच. पोलिसांपासून वाचण्याकरिता त्या लपूनछपून धंदा करतात. मग त्यांची ट्रीटमेंट थांबते, कंडोमचा वापर बंद होतो. त्या पुन्हा दुर्दैवाच्या शिकार बनतात. वेश्यांना आधार देण्याबरोबरच नव्याने अल्पवयीन मुलींना या व्यवसायात आणले जाऊ नये यासाठीस्नेहालय’नंमुक्तीवाहिनी’ सुरू केली. ‘चाईल्ड लाइन’च्या रूपानं तिला भक्कम जोड मिळाली. घरच्यांच्या जाचाला कंटाळून पळालेल्या, फसवलेल्या, भीक मागण्यासाठी पळवलेल्या, तसंच बालमजुरीत अडकलेल्या असंख्य मुलांच्या मदतीलाचाईल्ड लाइन’ धावून गेली आहे. झोपडपट्टय़ांमधील मुलांचा प्रश्न लक्षात आल्यावर तिथंबालभवन’ सुरू करून दिव्यांची, अभ्यासाची व्यवस्था करण्यात आली. व्यसनात अडकलेल्या अनेकांना त्यातून बाहेर काढण्यात आलं. भरकटणाऱ्या तरुणांच्या आयुष्याला योग्य दिशा देण्यासाठी स्पर्धा परीक्षा पूर्वतयारी केंद्र सुरू करण्यात आलं. बाबा आमटेंच्या प्रेरणेनं स्नेहालयश्रम संस्कार छावणी’ आयोजित करतं. शेकडो युवक-युवती त्यात सहभागी होतात. काहींनी त्यापासून प्रेरणा घेऊन कामाला सुरुवातही केली आहे. समाजातील वंचित, शोषित वर्गाला स्वत:चाआवाज’ मिळावा म्हणून स्नेहालयनंरेडिओ नगर ९०. एफएम कम्युनिटी रेडिओ’ सुरू केला. अशा प्रकारचं हे देशातील पहिलंच केंद्र आहे. जेव्हा डॉक्टरही एड्सग्रस्ताला हात लावायला घाबरायचे, तेव्हा गिरीशनं त्यांना आपल्या घरात जागा दिली. आतास्नेहालय’नं अशा रुग्णांसाठी सुसज्ज कम्युनिटी केअर सेंटर सुरू केलं आहे. एआरटी, डॉटस्ची ट्रीटमेंट तिथे दिली जाते. २० खाटांचं अद्ययावत रुग्णालय आहे. तीन हजारांवर रुग्णांना याचा फायदा झाला आहे. या कामाची व्याप्ती पाहता आणखी किमान २५ लाख रुपयांची संस्थेला गरज आहे. कुमारी मातांचा, बलात्कारामुळं गर्भवती बनलेल्यांचा प्रश्न गेल्या काही वर्षांत जटिल बनला आहे. घरच्यांनी नाकारलेल्या या महिलांना आधार देऊन नवजात बाळांच्या संगोपनाची, त्यांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी स्नेहालयनंस्नेहांकुर’ प्रकल्प सुरू केला. स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी गावोगावी जनजागरण करण्यात आलं. अनेक गावांनीआम्ही स्त्री भ्रूणहत्या होऊ देणार नाही’ अशी शपथच आता घेतली आहे. नकोशा अर्भकाला ओढय़ा-नाल्यात, उकिरडय़ावर फेकण्याऐवजी ग्रामपंचायतीत ठेवलेल्या पाळण्यात ठेवा, आम्ही त्याचा सांभाळ करू, असं संस्थेचे कार्यकर्ते सांगतात. स्वयंसेवी संघटनांना एकत्र आणून त्या माध्यमातून वंचितांच्या प्रश्नांवर दाद मागण्यासाठी कार्यकर्त्यांची मजबूत फळीस्नेहालय’नं उभारली आहे. चांगले काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळावं यासाठी मामासाहेब कौंडिण्य यांच्या कायम ठेवीतून पुरस्कार दिले जातात. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या जनलोकपाल आंदोलनाचा आवाज बुलंद करण्यात स्नेहालयने मोठी भूमिका बजावली. ज्यांना देहविक्रीच्या धंद्यातून बाहेर पडायचं आहे, अशा महिला त्यांच्या मुलांच्या पुनर्वसनाची जबाबदारी खरं तर सरकारनं घ्यायला हवी. ‘स्नेहालय’ त्यासाठी पुढाकार घेत आहे, पण लालफीत आडवी येते. लालबत्ती भागातील मुलांसाठीच्या बालगृहाला सरकारने गेल्या २२ वर्षांत एक पैशाचीही मदत केलेली नाही. ‘आनंदवन’च्या धर्तीवरहिंमतग्राम’ उभारून तिथं या महिलांसाठी घरकुले उभारण्याचा स्नेहालयचा प्रयत्न आहे. एखाद्या कामाचं प्रशिक्षण देऊन त्यांना आत्मनिर्भर केलं, तर माणुसकीला लागलेला डाग थोडा तरी धुतला जाईल, पण त्यासाठी सरकार जागा देत नाही. पुनर्वसन, व्यसनमुक्ती केंद्र यासाठी मोठा निधी लागणार आहे. समाजातील प्रत्येकानं मानवतेच्या या कार्यात सहभागी व्हावं असंस्नेहालय’चं आवाहन आहे. एकदा वेळ काढून आवर्जूनस्नेहालय’ला भेट द्या. तिथल्या मुलांशी हितगुज साधा. तुमच्या चार शब्दांनी त्यांच्या आयुष्यात आशेचा एखादा दीप प्रज्ज्वलित होईल..! संपर्क : स्नेहालय, श्रीटाईल्सजवळ, एमआयडीसी, अहमदनगर. पिन - ४१४१११. मोबाईल - ९०११०२०१७३.
E-mail: info @ snehalaya.org
www.snehalaya.org

No comments:

Post a Comment