Total Pageviews

Friday, 2 September 2011

ANNA HAZARE AGAINST CORRUPT GOVERNMENT 60 BY RASHMI GHATWAI

रश्मी घटवाईrashmighatwai12@gmail.com अण्णांचे भ्रष्टाचार विरोधी आंदोलन ही एक नव्या युगाची नांदीच म्हणावी लागेल. हे केवळ अण्णा हजारे नावाच्या एकटय़ा बाशिंद्याचे आंदोलन नव्हते. या आंदोलनाने सर्वसामान्यांना आपल्यातल्या असामान्यत्वाची जाणीव करून दिली. अहिंसक आणि सन्माननीय मार्गाने आपला आवाज बुलंद करून भ्रष्ट यंत्रणेच्या छातीत धडकी भरवण्याचा मार्ग दाखवला. अण्णांना समर्थन देता देता हा समुदाय स्वत: अण्णा बनला.. त्याची ही गोष्ट. झपाटल्यागत जो तो रामलीला मदानाकडे निघालेला होता. रामलीला मदानाला गर्दी मुळीच नवीन नाही. गेली कित्येक वष्रे दिल्लीत ह्य़ा रामलीला मदानात नवरात्रात रामलीलेचं आयोजन केलं जातं. दसऱ्याच्या दिवशी श्रीराम रावणाचा वध करतात. रावण दहन होतं. दुष्टावर सुष्टाचा विजय होतो. मात्र आताची रामलीला मदानातली गर्दी वेगळी होती. दुष्टावर सुष्टाचा विजय व्हावा म्हणून तिथे प्रत्येक जण जात होता, ह्य़ा देशातला भ्रष्टाचार समूळ नष्ट व्हावा म्हणून प्राण पणाला लावून अहिंसेच्या मार्गानं लढणाऱ्या अण्णांना आपला संपूर्ण पाठिंबा देण्यासाठी पाण्यापावसात धडपडत तिथे पोहोचत होता. लहान मुलं म्हणू नका, वयोवृद्ध म्हणू नका, अन तिथली गर्दी तर प्रामुख्यानं तरुणांचीच होती- प्रत्येक जण भ्रष्टाचाराच्या विरोधात अण्णांच्या हाताला हात लावूनमम म्हणत भ्रष्टाचारमुक्त भारतनिर्मितीच्या कामी आपापला खारीचा उचलतोय. दिल्लीतल्या रामलीला मदानात जणू वणवा पेटलाय आणि त्यात भारतवर्षांतलं जे जे मलीन, अमंगल, ते ते सारं जळून जाणार आहे. एका नव्या युगाची ही नांदी आहे.एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने;अशी तुतारी द्या मजलागुनि.अवकाशाच्या ओसाडींतिल
पडसाद मुके जे आजवरी
होतिल ते वाचाल सत्वरी
फुंक मारितां जीला जबरी-कविवर्य केशवसुतांची अजरामर तुतारी दिल्लीत अण्णांच्या रूपानं निनादली. या युगातल्या महात्म्यानं दिलेल्या हाकेला देत लहान म्हणू नका, तरुण म्हणू नका, वयानं ज्येष्ठ म्हणू नका- सारे एका अनावर ओढीनं, उत्स्फूर्तपणे अण्णांना साथ देण्यासाठी रामलीला मदानाकडे निघाले. ‘अण्णा नहीं आँधी है, देश का दुसरा गांधी है अशा घोषणांनी सारा परिसर दुमदुमला. त्यांच्यावर कुणी जंतरमंतर केलं नव्हतं की तिथे झुंडीच्या झुंडींनी जायला कुणी त्यांना सक्ती केली नव्हती. पण ती तरुणाई कुठल्याशा अंत:प्रेरणेनं अण्णांकडे धाव घेत होती. तीमास फ्रेन्झी कुठल्या वेडातून आलेली नव्हती. शनिवार- रविवार- सोमवार या सलग आलेल्या सुट्टय़ांच्या दिवशी तर तिथे जनतेचा महासागर लोटला होता. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जंतरमंतरवर उसळलेल्या गर्दीकडे त्यावेळी सरकारनं दुर्लक्ष केलं असतं आणि सरकारनं जनतेच्या भावनांना कमी लेखलं असतं, कदाचित अण्णांना काही त्रास झाला असता वा त्यांची प्रकृती बिघडली बिघडली असती, तर तिथे काहीही होऊ शकलं असतं. बहुधा तेव्हा त्याच भावनेतून सरकारनं पावलं उचलली नी अण्णांच्या साऱ्या मागण्या मान्य केल्या होत्या, तसं सूचनापत्र जारी केलं होतं. अण्णांनी तेव्हा आपलं उपोषण ९७ तासांच्या उपवासानंतर सोडलं, देशभरात आनंदाला उधाण आलं. मात्र हा काही या लढाईचा अंत नाही. ही तर सुरुवात आहे, हे लवकरच सर्वाना उमगलं. बिल बनेल, पास होईल, त्याचा कायदा होईल, पण तोवर कमालीच्या जागृत झालेल्या तरुणाईनं या देशातून भ्रष्टाचार समूळ उपटून फेकायचं केवढं मनावर घेतलंय, हे समस्त फेसबुक, ट्विटर, ऑर्कुटवासीयांना वेगळं सांगायची गरज नाही.फेसबुकच्या माध्यमातून, तरुणाईच्या चष्म्यातून आणि प्रत्यक्ष तिथे जाऊन खरं तर हे आंदोलन जवळून अनुभवता आलं. भारतात प्रत्येक व्यक्ती एकेकटी उत्कृष्ट काम करते असं म्हटलं जातं. पण तेच त्यांना एकत्रितपणे काम करायची वेळ आली, की पार वाट लागते, अशी बाहेरच्या लोकांची एक धारणा आहे. मात्र भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात लोक एकजूट झालेले आहेत. दिल्लीतच नव्हेत; संपूर्ण भारतभर लोक-विशेषत: तरुण अण्णांच्या हाकेला देऊन, जमेल त्या मार्गानं भ्रष्टाचाराच्या विरोधातला आपला आक्रोश व्यक्त करताहेत. पूर्वी भारताचं स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन चिरडायचा गोऱ्या इंग्रजांनी निकरानं प्रयत्न केला होता, तसंच भ्रष्टाचारमुक्तीचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आपलं सरकार - हे काळे इंग्रज करीत असल्याचं डिव्हाइड अ‍ॅण्ड रुल हे इंग्रजांचं तंत्र हेही आचरणात आणीत असल्याचं अगदी प्रत्येकाला वाटतंय. त्या काळात संपर्काची साधने नव्हती, प्रत्यक्ष व्यक्तीच्या हाती निरोप धाडावा लागायचा. एवढंच काय, पोळ्यांच्या (चपात्या) माध्यमातून संदेशांची गुपचूप देवाण-घेवाण व्हायची! आता ज्या क्षणी विचार मनात येतो, अथवा घटना घडते, त्या क्षणी अन्य लोकांना ट्विटर, फेसबुक अथवा एसएमएसच्या माध्यमातून कुठलाही हो-हल्ला करता ते सारं कळवता येतं. प्रत्येक पिढीची जीवनशैली, विचार करण्याची पद्धत वेगळी असते, म्हणून तर समाजात सतत बदल घडून येत असतात. अन्यथा हा समाज एकसाची झाला असता. आजची युवापिढी टेक्नोसॅव्ही आहे. जन्मत: शिकून आल्याप्रमाणे मोबाइल आणि कॉम्प्युटर ही प्रगत तंत्रज्ञानाची साधनं मोठय़ांपेक्षाही प्रभावीपणे त्यांना हाताळता येतात. अद्याप बालवाडीतही जाणारी मुलं सराईतपणे मोबाइल नंबर मिळवतात, एबीसीडी येत नसतानाही कम्प्युटरचा पासवर्ड अचूक टाइप करतात.. हे बघता ह्य़ा पुढच्या पिढीची संपर्काची माध्यमं आता आहेत, त्यापेक्षाही प्रगत राहणार, नी त्यांच्या अभिव्यक्तीची पद्धतही वेगळीच असणार आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराच्या विरोधात या तमाम युवावर्गानं एकमेकांशी फेसबुक, ट्विटर या माध्यमातून संपर्क साधत मेणबत्ती मोर्चा काढला नी आपला पाठिंबा अण्णांना दिला, तर बिघडलं कुठे? मेणबत्ती संप्रदाय अशी त्याची खिल्ली उडवत काही लोकांनी त्यांना कमी लेखलं, हे म्हणजे ज्यांना काळाबरोबर चालता येत नाही, त्यांनी आमच्या वेळी हे असं नव्हतं.. असा सूर लावत प्रत्येक गोष्टीत त्रुटी शोधण्यासारखं झालं. मेणबत्ती संप्रदायातले तर मेणबत्ती संप्रदायातले! मात्र ज्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातल्या एखाद्या मेणबत्ती मोर्चात भाग घेतला असेल, त्यांनाच कळू शकेल, की एवढा हजारोंचा जमाव एका हजारेसाठी का एवढा असोशीनं चालला आहे ते. एक शब्द बोलताही सगळे काही ये हृदयीचे ते हृदयी पोहोचते. तानपुऱ्याची जव्हार उत्तम जुळल्यावर तो सुरेल लागलेला तानपुरा ऐकताना जसा एक अवर्णनीय आनंद होतो, अगदी तोच आनंद मी मेणबत्ती मोर्चात हजारो आबालवृद्धांबरोबर चालताना अनुभवलाय. ही युवा पिढी कुणाचे ऐकत नाही. आपले शिक्षक, प्रोफेसर्स, आईवडील, इतर वडीलधारी मंडळी वगरेंबद्दल त्यांना मुळीच आदर नसतो अशी सर्वत्र ओरड होत असताना एक ७४ वष्रे वय असलेला माणूस त्यांच्यावर गारुड कसं काय करू शकतो?पूर्वी भारताचं स्वातंत्र्यासाठीचं आंदोलन चिरडायचा इंग्रजांनी निकरानं प्रयत्न केला होता, तसंच भ्रष्टाचारमुक्तीचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न आपलं सरकार - करीत असल्याचं प्रत्येकाला वाटतंय. मेरे प्यारे देशवासियों, हमारी लडमई किसी दल या नेता के खिलाफ नहीं है. हम सत्ता नहीं, व्यवस्था बदलना चाहते है. एक भ्रष्टाचारमुक्त भारत चाहते है. देश के लोगों की मांग है की भ्रष्टाचार के खिलाफ एक ऐसा मजबूत जन लोकपाल कानून लाया जाये जिस के तहत जांच जल्दी पूरी हो, भ्रष्टाचारी जेल जाये, उनकी संपत्ती जब्त हो और उन्हें नौकरी से निकाला जाये. क्या हम कुछ गलत मांग रहे हैं?’’ अण्णा विचारतात. ‘‘दोन महिने चर्चा चालली. मात्र सरकार भ्रष्टाचाराविरुद्ध पाऊल उचलायला सुद्धा कांकूं करते आहे. सरकार की नीयत ठीक नही है. अगर सरकार एक सख्त और स्वतंत्र लोकपाल कानून नहीं लाती, तो हम १६ अगस्त से फिर आमरण अनशन पर बठेंगे. इस पर हमें धम की दी जा रही है की हमे भी वैसेही कुचल दिया जायेगा, जैसे रामदेव बाबा के शांतीपूर्ण आंदोलन को बर्बरता से कुचला गया था. अगर १६ अगस्त को अनशन करोगे तो कुचल दिये जाओगे ऐसा उनका कहना हैं. जंतर मंतर पर धारा १४४ लगा देंगे ऐसा उन का सोचना है. पर मेरा कहना है- हर भारतवासी सडम्क पर उतर आए, घर के सामने, अपने मोहल्ले में, चौराहे पर, पूरा देश यदी हाथों में तिरंगा झंडा उठाकरभारत माता की जय का नारा लगाते हुए सडम्कों पर उतर आए, तो उनकी पुलिस और लाठियां भी कम पडेंगी.’’ अण्णा त्यावर उतारा सांगतात.रामदेव बाबांचं आंदोलन चिरडलं तसं अण्णांचं आंदोलनही हा हा म्हणता चिरडून टाकू असा सरकारचा पवित्रा होताच. एक फरक मात्र खरोखरी ह्य़ा दोन्ही आंदोलनकर्त्यांमध्ये होता. अण्णांच्या आंदोलनात सहभाग हा प्रामुख्यानं पोटतिडकीनं आलेल्या शिक्षित, सुसंस्कारित आणि टेक्नोसॅव्ही अशा युवावर्गाचा आहे. ग्रामीण ते शहरी असा सर्व चेहऱ्याचा हा युवावर्ग आहे. रामदेव बाबांचा आंदोलनकर्ता वर्ग हा मुख्यत्वे अगदी ग्रामीण होता आणि वयानं मोठे असलेल्यांचा होता, सगळेच काही शिक्षित नव्हते. शिवाय साध्य भलेही एक असेल, साधन आणि साधना या दोन्ही आंदोलनात भिन्न असल्याचं जाणवत होतंच. अण्णांचं सच्चेपण थेट हृदयापर्यंत पोहोचणारं.. रामदेवबाबांच्या त्या आंदोलनात याचाच तर अभाव होता.रामदेव बाबांचं आंदोलन चिरडलं तसं अण्णांचं आंदोलनही हा हा म्हणता चिरडून टाकू असा सरकारचा पवित्रा होताच. एक फरक मात्र खरोखरी ह्य़ा दोन्ही आंदोलनकर्त्यांत होता. आणि मग काँग्रेसच्या नेत्यांची बेताल वक्तव्ये सुरू झाली. अण्णांच्या आंदोलनासाठी एवढा अमाप पसा येतो कुठून असा सवाल उपस्थित करून अण्णा घटनाबाह्य़ मागणीसाठी आंदोलन करीत आहेत, देशाला अस्थिर करण्यासाठी काही शक्ती एकत्र आल्या आहेत, लोकपालाच्या नावाखाली अण्णांना टीव्हीच्या कॅमेऱ्यापुढे दिसण्यासाठी यायचे आहे, असे आरोप केंद्रीय दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी लावले. आम्हाला हवे तेच विधेयक संसदेने पारित करावे, आम्हाला घटना मंजूर नाही असेच अण्णांना म्हणायचे आहे, यापेक्षा घटनाबाह्य़ वर्तन दुसरे कुठले असू शकत नाही, वगरे बरंच काही सिब्बल म्हणाले. गम्मतच आहे.. आंदोलनासाठी एवढा पसा येतो कुठून हे अण्णांना विचारायच्या आधी निवडणुकांसाठी एवढा पसा येतो कुठून असं जर त्यांनी आमदार-खासदारांना दरडावून विचारलं असतं नी हिशेब मागितले असते, तर अण्णांना विचारायची वेळच नसती आली. ‘‘अण्णा हजारे राज्यघटनेला आणि संसदेलाच आव्हान देत आहेत, विधेयके कुणाच्या मर्जीने पारित होत नाहीत, आपल्या इच्छेनुसार कायदा करण्यासाठी कोणीही आग्रह करू शकत नाही. कायदा करण्याचे काम संसदेचे आहे, अण्णा संसदेच्या घटनेलाच आव्हान देत आहेत, ते अजिबात स्वीकारार्ह नाही,’’ असे लोकसभेचे नेते आणि अर्थमंत्री प्रणव मुखर्जी म्हणाले. अण्णाच नखशिखांत भ्रष्ट असल्याचा आरोप करून देशात अण्णांना अस्थर्य माजवायचे आहे वगरे वगरे बरेच काही काँग्रेसचे प्रवक्ते मनीष तिवारी म्हणाले- त्यांना नंतर अण्णांच्या उपोषणाच्या दहाव्या दिवशी आपल्या बेताल वक्तव्यांबद्दल जाहीर माफीही मागावी लागली. अण्णांनी मात्र ते सारे आरोप फेटाळून लावले. आपल्या सर्व सहकाऱ्यांना भ्रष्टाचाराचे आरोप करून सरकारने बदनाम करायचा प्रयत्न केला. आतापर्यंत मीच तेवढा वाचलो होतो, आता माझ्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप सरकारनं केले. मागच्या आंदोलनानंतर सरकारने माझ्या गावी सीए पाठवले, कागदपत्रे गोळा करून नेली, तरीही त्यांच्या हाती काहीच लागले नाही. सरकारमध्ये हिम्मत असेल तर माझ्याविरुद्ध घोटाळा केल्याचा गुन्हा दाखल करावा, असं परखड आव्हान त्यांनी दिलं. १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून भाषण करताना पंतप्रधान मनमोहन सिंग म्हणाले, ‘‘भारताच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण करण्यासाठी काही लोक गडबड करण्याच्या प्रयत्नात आहेत, पण आम्ही तसे घडू देणार नाही.’’ नंतरचा घटनाक्रम सर्वविदित आहे. खूप नियम-अटी घालून दिल्यावर जयप्रकाश नारायण पार्कमध्ये आमरण उपोषणाला बसण्याची परवानगी दिल्ली पोलिसांनी अण्णांना नाकारली, ते राजघाटावर गेले नी त्यांनी अडीच तास ध्यानधारणा केली, नंतर उपोषणासाठी बाहेर पडत असताना लिफ्टमध्येच अण्णांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांना नी त्यांच्या सहकाऱ्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांना सरकारनं तिहार जेलमध्ये कॉमन-वेल्थ हडपणाऱ्या सुरेश कलमाडी आणि भ्रष्टाचाराचा टू वाईड स्पेक्ट्रम असलेल्या . राजा अशा घोटाळेबाज भ्रष्टाचारी लोकांच्या शेजारी ठेवून आपल्या अपरिपक्व बुद्धिमत्तेचं जाहीर प्रदर्शनसुद्धा केलं.भारताच्या इतिहासातल्या ह्य़ा दुसऱ्या ऑगस्ट क्रांतीला बळ देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले. मात्र तोवर अण्णांच्या देशभर पसरलेल्या समर्थकांना हे कळताच ते सारे तिहार जेलच्या समोर आणि अन्यत्र एकवटले, आपली तीव्र नाराजी अतिशय शांततापूर्ण मार्गानं व्यक्त करू लागले. थोडक्यात, भारताच्या इतिहासातल्या ह्य़ा दुसऱ्या ऑगस्ट क्रांतीला बळ देण्यासाठी अनेक जण पुढे सरसावले; तर पोलिस त्यांचं आंदोलन दडपण्यासाठी! तो जनक्षोभ पाहून सरकारनं रात्री त्यांची तिहारमधून सुटका केली, पण त्यांनी आपल्या अटींवर ठाम राहात तुरुंगातून बाहेर पडण्यास नकार दिला आणि तिहार जेलच्या परिसरात त्यांना दिलेल्या कक्षात आपले उपोषण आणि आंदोलन जारी ठेवले. तिहारच्या बाहेर जनप्रवाहो लोटला. अण्णांना क्रांतिवीर म्हणणे अतिशयोक्ती होईल कदाचित, पण इंग्रजांना या देशातून हाकलून लावणे जितके कठीण होते त्याहीपेक्षा या देशात रुजलेल्या भ्रष्टाचाराला मुळासकट उपटून त्याचा नायनाट करणे म्हणजे त्याहीपेक्षा महाकठीण कर्म आहे. इतका तो लोकांच्या हाडामांसात, रक्तात भिनलाय. संसदेत विरोधी पक्षसुद्धा आधी गुळमुळीत भूमिका घेऊन बसले होते, अळीमिळी गुपचिळी करून बसले होते. त्याअर्थी इतर बाबतीत ते कितीही जानी दुश्मन असले तरीह्य़ा एका बाबतीत ते चांगले जिगरी दोस्त असतात.
‘‘
तुम्हाला काय वाटतं, विरोधी पक्षनेते दूध के धुले हुए है? सगळे एकाच माळेचे मणी आहेत. ते सातरंगी असतील तर हे एकरंगी आहेत, एवढाच फरक.’’ अण्णांच्या आंदोलनातला एक समर्थक मला म्हणू लागला, ‘‘सब का परसेण्टेज सेट रहता है. तशीच प्रत्येक गोष्टीला किंमत असते.. चिल्लाने का दाम अलग, ना चिल्लाने का अलग.. राजकारणातले सगळेच भ्रष्ट असताना पुढे येऊन कोण सांगायला धजणार आहे की, हो हो सगळ्यांना लोकपालच्या अमलाखाली आणा म्हणून. आज ही मंडळी जात्यात आहेत, नी ती सुपात, पण उद्या आपणही भरडले जाऊ हे त्यांनाही चांगले ठाऊक आहे.’’गांधीजी म्हणायचे, स्वातंत्र्य मिळालं, पण जोवर सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या हातात सत्ता येत नाही, तोवर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळणार नाही. मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण कुठे झालंय, नी सत्ता तळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कुठे पोहोचलीय?अखेर सरकारनं अण्णांना रामलीला मदानावर सप्टेंबपर्यंत उपोषण करायची परवानगी दिल्यानंतर ६७ तासांनंतर अण्णा तिहारमधून बाहेर पडले आणि उपोषण सुरू झाल्यावरच्या चौथ्या दिवशीपासून रामलीला मदानावरजन लोकपाल लाओ या जाओ असा नारा देत त्यांचा हा सत्याग्रहाचा लढा आणखी तीव्रतेनं सुरू झाला. रविवारी २१ ऑगस्टला अक्षरश: लाखो लोकांनी रामलीला मदानाकडे धाव घेतली, तो नजारा टिपायला टीव्ही चॅनेल्सचे कॅमेरेसुद्धा तोकडे पडले. लोकांनी लगे रहो मुन्नाभाईच्या धर्तीवर खासदारांच्या दरवाजावरगेट वेल सून संदेशादाखल फुले पाठवली. गावात, शहरात शाळा-कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधातले फलक घेऊन निषेध मोच्रे काढले. चिमुरडी पोरेसोरेहीअण्णा तुम आगे बढमे, हम तुम्हारे साथ है म्हणत पुढे सरसावली. युवकांनी बाइक रॅलीज काढल्या, व्यापाऱ्यांनी दुकाने बंद ठेवली. मूठभर लोक वगळता यच्चयावत जनता नी सबंध देश अण्णांच्या ह्य़ा अिहसक आंदोलनात उत्स्फूर्तपणे सामील झाली.आंदोलन आणि उपोषण नवव्या दिवशीही सुरूच असताना अण्णांच्या प्रकृतीविषयी साऱ्यांनाच काळजीही होती. थोडेसे मलूल दिसत असले तरीही अण्णांनी २४ ऑगस्टला मंचावरून खूप जोशपूर्ण भाषण केलं. ‘‘देशासाठी १८५७ ते १९४७ ह्य़ा काळात लोकांनी किती बलिदान दिलंय. गांधीजी म्हणायचे, स्वातंत्र्य मिळालं, पण जोवर सत्तेचं विकेंद्रीकरण होऊन जनतेच्या हातात सत्ता येत नाही, तोवर खऱ्या अर्थानं स्वातंत्र्य मिळणार नाही. मात्र सत्तेचं विकेंद्रीकरण कुठे झालंय, नी सत्ता तळातल्या सर्वसामान्य जनतेपर्यंत कुठे पोहोचलीय? सत्ता तर मंत्रालयातच केंद्रित ठेवलीये.. ही लोकशाही नाहीय. ही तर पुढारीशाही, हुकुमशाही आहे. जनतेला निर्णय घेण्याचा अधिकार कुठे आहे? अधिकारी आणि जनप्रतिनिधी हेच निर्णय घेतात, जनतेचा पसा खर्च करायचा निर्णय हेच लोक घेतात. महागाई वाढतेय, सर्वसामान्य माणसाला छोटय़ा-छोटय़ा गोष्टींसाठी विनाकारण खेटे घालायला लावलं जातंय.. अरे, एअरकंडिशण्ड घर- गाडी- ऑफिसमध्ये बसणाऱ्यांना काय कळणार गरिबांच्या व्यथा? प्रसूतीवेदना गर्भवतीलाच कळणार.. पाकिस्तान की गोली का निशान है मेरे सर पर. एक वह लडमई मने लडम्ी थी, अब ये दूसरी लडमई मं लडम् रहा हूँ, घर में छिपे दुश्मनों से, गद्दारों से. पार आखिर शरीर है. देश की भलाई के लिए, जनता की भलाई के लिए मुझे मृत्यु भी आई, तो वह मेरा सौभाग्य है.’’अण्णांच्या आंदोलनाला गेलेला एक पोरसवदा मुलगा उद्वेगानं म्हणत होता, "It takes years to hang Kasab, months to arrest Kalmadi, but minutes to arrest Anna! This is our democratic India!" दुसऱ्यानंकलयुग की गाथा ऐकवत म्हटलं, ‘‘श्री रामचंद्र कह गये सिया से, ऐसा कलयुग आयेगा कसाब खायेगा बिर्यानी, और अन्ना भूखा रह जायेगा.’’ तिसऱ्यानं मुक्तछंदातली एक कविता लिहिलेला फलक हाती घेतला होता-
‘‘
कितना अजीब है ये आदमी!कोई बस नहीं जलायी ..रेल की पटरी नहीं उखाडी..जबरदस्ती दुकानें बंद नहीं करवायी..मजदूरों के चूल्हे भी नहीं बुझने दिये..चक्का जाम में फंसी किसी महिला के
सडम्क पर बच्चे को जन्म देने की
कोई खबर भी नहीं आयी..पर वाह! क्या जबरदस्त आग लगायी!दिलों में जगी उम्मीदें और आग को अब हम नहीं बुझने देंगे!’’अगदी हेच आव्हान अण्णांनी समस्त तरुणाईला आणि समोरच्या सगळ्यांना उपोषणाच्या दहाव्या दिवशी संध्याकाळी केलं- ‘‘क्रांती की मशाल आपने जो जलायी है, उसे जलने देना, बुझने नहीं देना. अन्ना रहे या रहे!’’ आज गरिबांना जगणं कठीण झालंय. ‘माल खाये मदारी, नाच करे बंदर अशी शेतकऱ्यांची गत झालीय या आपल्या कृषिप्रधान देशात. राबायचं त्यांनी, मलिदा आणखी कुणाला खायला मिळणार. आपल्याला हे बदलायचं आहे. काही लोक जगण्यासाठी खातात, तर काही जण खाण्यासाठी जगतात. काही लोकांना काय खाऊ हा प्रश्न पडतो आणि काही लोकांना काय काय खाऊ हा प्रश्न पडतो.. आपल्याला हे सारं बदलायचंय..दरम्यान अण्णांच्या प्रकृतीविषयी चिंता व्यक्त करीत सरकारनं एका आदर्श मंत्र्याला वाटाघाटीसाठी, मध्यस्थी करण्यासाठी अण्णांकडे पाठवलं होतं. त्यांच्या हाती अण्णांनी सरकारला संदेश पाठवला होता नी तीन मुद्दे संसदेत चच्रेसाठी आणण्याचं सुचवलं होतं. त्या अनुषंगानं ते पुढे सांगतात- ‘‘माझ्या नजरेसमोर गरीब माणूस आहे. ते तीनही मुद्दे- ते तीनही प्रश्न गरिबांचे प्रश्न आहेत. पहिला मुद्दा आहे, गावातल्यापासून ते मंत्रालयापर्यंत सगळे अधिकारी लोकपालच्या कक्षेत आणा. आज सामान्य माणसाला एखाद्या कामासाठी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. एखादा माणूस माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती घेण्यासाठी एखाद्या कार्यालयात जातो. तो ग्रामसेवकाकडे जातो, बीडीओकडे जातो, कुणीच त्याचं ऐकत नाहीत.. करीत करीत मग तो कमिशनरकडे जातो, तिथेही त्याचं म्हणणं कुणी ऐकत नाही. मग तो मंत्रालयात जातो. तिथे तर काय, सगळेच मुके-बहिरे होऊन बसलेले लोक आहेत. हे सगळे अधिकारी लोकपालच्या कक्षेत आल्यावर कुणी भ्रष्टाचार केला, तर लोकपाल त्याची चौकशी करेल. भ्रष्टाचार केला असेल, तर त्याची नी त्याच्या पत्नीची, मुलांची प्रॉपर्टी जप्त करून त्यानं जनतेचा खाल्लेला पसा त्याच्याकडून वसूल करून जनतेला परत केला जाईल. लोकांची कामं कम्प्युटरमध्ये फीड केली जातील. लोकांना कार्यालयात नाहक खेटे मारावे लागणार नाहीत. दुसरा मुद्दा आहे प्रत्येक राज्यात लोकायुक्त आणण्याचा. लोकपाल केंद्रात असेल, आणि लोकायुक्त राज्यांत. जितके अधिकार केंद्रातल्या लोकपालाला असतील, तेवढेच राज्यांतल्या लोकायुक्तांना असतील. ते स्वायत्त असतील, सरकारच्या अंतर्गत असणार नाहीत. कुणाचीही चौकशी करण्याचा त्यांना अधिकार असेल. प्रत्येक कार्यालयात बोर्डवर लिहावं लागेल की इथे इतके लोक काम करतात, अमुक काम इतके दिवसांत होईल. झाल्यास त्या संबंधित अधिकाऱ्याकडून दंड वसूल केला जाईल. आज काय होतंय, जनतेचा ७५ टक्के पसा यांच्या कार्यालयांवर, घरांवर खर्च होतो. उरलेल्या २५ टक्के पशापकी १५ टक्के भ्रष्टाचार होतो. मग विकासासाठी पसा किती उरला? आज कर्ज घेऊन विकास केला जातोय.’’ अण्णा सांगतात. त्यांचा तिसरा मुद्दा सिटिझन चार्टरचा.अण्णांनी समस्त तरुणाईला उपोषणाच्या दहाव्या दिवशी आवाहन केलं- ‘‘क्रांती की मशाल आपने जो जलायी है, उसे जलने देना, बुझने नहीं देना. अन्ना रहे या रहे! अण्णांच्या मागण्या सरकारला मान्य कराव्या लागल्या. भ्रष्टाचाराची कीड समूळ उपटून टाकण्याचे निकराचे प्रयत्न करण्याऐवजी ते करीत असल्याचा आभास निर्माण करीत सरकार आणि राजकीय पक्ष आता राजकीय गुंता निर्माण करतात आणि तो सोडवत बसण्याचं आणि जनतेला त्या गुंत्यात वेढून टाकणार असं चित्र त्यातून उभं करतात.देशाला बरबाद करणाऱ्या सगळ्या भ्रष्ट नेत्यांवर, मंत्र्यांवर आणि स्विस बँकेत काळा पसा ठेवलेल्यांवर अगदी जराही मुलाहिजा ठेवता नावासकट एकेकाला दूषणे देत ह्य़ा सरकारवर आणि जे सत्तेत आहेत, त्यांच्याविषयी पूर्ण अविश्वास यावेळी लोकांनी दाखवला. निवडणुकीत काँग्रेसला मतदार चांगलाच हात दाखवणार आहेत, असं मत आता पहिल्यांदा मतदान करण्यासाठी पात्र ठरणार असलेल्या आणि त्यामुळे मतदानासाठी उत्सुक असलेल्या नवयुवकांनी मांडलं. मात्र त्यांना विकल्प म्हणून उभे राहण्यासाठी स्वच्छ शुद्ध आचरण असलेले नेते आहेतच कुठे असंही काहींनी म्हटलं.नंदन निलेकणी यांनी आपल्या kImagining Indial ह्य़ा पुस्तकात लोकसंख्या, शिक्षण, तंत्रज्ञान इंग्रजीवर असलेलं आपलं भारतीय लोकांचं प्रभुत्व, आरोग्य, आपली इकॉनॉमी, या सर्वावर अतिशय विस्तृत नी सांगोपांग चर्चा केली आहे. भारत जगातली महासत्ता होण्याच्या दिशेनं झेप घेत आहे, असं अतिशय सकारात्मक चित्र त्यात आहे. एखादी बुद्धिजीवी व्यक्ती अगदी मुद्देसूद विश्लेषणासह हे सांगतेय, त्याअर्थी त्यात तथ्य आहे. असे असताना भ्रष्टाचाराच्या गुंत्यात अडकवून भारताला आपणच पुढे जाऊ द्यायचे नाही, असे ठरवायचे की गगनभरारी घेऊ द्यायची, हे आपणच ठरवायचं आहे

‘‘

No comments:

Post a Comment