Total Pageviews

Friday, 2 September 2011

EXCELLENT ARTICLE ON ANNA HAZARE BY PARAG PATIL

COMMON MAN VS PSEUDO SECULARS & LEFT LEANING INTELECTUALS
पराग पाटील
parag.patil@expressindia.com
भारतीय जनता तेव्हा त्या वेलीच्या फुलांच्या सडय़ात न्हाऊन निघत होती. नैतिक आंदोलनाचा हा परिमळ लोकांना नवं बळ देऊन गेला. भ्रष्टाचाराच्या जिव्हा किती जहरी असतात हे अनुभवलेल्या सामान्यांना या भ्रष्टाचारी भूकेवरचा हा उपासाचा उतारा प्रचंड आवडून गेला आहे.मनोहरचं मुलुंडमधे औषधांचं दुकान आहे. कित्येक वर्षांत तो दुकान सोडून बाहेर गेलेला नाही. अनेक वर्षे दुकानात उभं राहून वरखाली करून त्याच्या गुडघ्यांची वाट लागलीय; पण दुकानातला डेरा त्याने कुठल्याही परिस्थितीत हलवला नाही. अगदी नातेसंबंधातल्या लग्नातही तो हजर राहत नाही.पण परवा तो आझाद मैदानावर आवर्जून जाऊन आला.अण्णांना सपोर्ट म्हणून.. दिवसभर!हा आश्चर्याचा एक प्रचंड मोठा धक्का होता. मनोहरला ओळखणाऱ्यांसाठी तर तो नक्कीच होता. कारण तो असा आंदोलन करणाऱ्यांमधला नाही. नारेबाजी करणाऱ्यांमधला तर नक्कीच नाही.मनोहरला दुकानातून बाहेर काढलं म्हणून अण्णांना मनातल्या मनात कडक सलाम ठोकला. या सगळ्या आंदोलनाबद्दल जे काही उरलेसुरले किंतू होते ते एकदम गळून पडले.मनोहरला जाण्याचं नेमकं कारण विचारलं. तो म्हणाला, ‘‘आमच्या धंद्यातल्या करप्शनचं प्रमाण म्हणजे डोक्यावरून पाणी गेलंय. खूप कठीण झालंय. अण्णांना सपोर्ट करणं ही माझीच खूप आतली गरज होती.’’असे अनेक मनोहर या आंदोलनादरम्यान आपल्या कोशातून बाहेर पडलेले आढळले. त्यांचा राग, त्यांच्या मनातली खदखद यानिमित्ताने बाहेर पडली असेल. कदाचित ते भाबडेही असतील, पण या आंदोलनातून व्यक्त झालेला आशावाद सगळ्यांचाच हुरूप वाढवणारा होता.मात्र या सर्व आंदोलनातून फक्त आशावादच व्यक्त झाला असं नाही. एक वैचारिक घुसळण होत असल्यासारखं वातावरण तयार झालं होतं. अण्णांच्या आंदोलनाच्या निमित्ताने टीव्ही चॅनेल्सवरची इतकी पॅनेल डिस्कशन झाली की त्याने डोकं बधिर होऊन गेलं. हे कमी म्हणून की काय दुसऱ्या दिवशी सकाळी पेपरमध्ये तेच वाचावं लागायचं. मीडियामध्ये हा डिस्कशनचा ओव्हरडोस झाला तरी सर्वसामान्य लोकांना त्याचं काही सोयरसुतक नव्हतं. ते त्यांच्या अण्णांवर खूश होते.कधी नव्हे ते सर्वसामान्य जनता एका बाजूला आणि बुद्धिवादी दुसऱ्या बाजूला असं एक चित्र इलेक्ट्रॉनिक मीडियावर झळकताना दिसलं. खरं तर बुद्धिवाद्यांचा या आंदोलनाला पाठिंबाच असल्याचं दिसलं, पण काहीतरी विचित्र आकस मात्र जाणवत होता. त्यामुळे बरेच बुद्धिवादी खुलेपणाने या आंदोलनाला अनुमोदन देताना दिसले नाहीत. पार्लमेण्टरी डेमोक्रसी आणि पीपल्स पॉवर या चर्चेत सगळे इतके अडकले होते की लोकभावनेवर आरूढ अण्णांना अप्रत्यक्षरीत्या ते पाण्यात पाहू लागले. अभावितपणे राजकारण्यांची बाजू घेऊ लागले. लोकांना हे आवडलं नाही. बुद्धिवाद्यांची ही कुंपणावरची भूमिका या आंदोलनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा अधोरेखित झाली. मात्र या वेळी लोकांना अशा बुद्धिवाद्यांचा राग येऊ लागल्याचं स्पष्टपणे जाणवत होतं. ‘बघता काय, सामील व्हा’ हा नारा अगदी गल्ली-बोळ, सोसायटय़ा, चाळींमधून घुमू लागला.राजकारणी तेच आहेत, नोकरशहाही फार काही बदलणार नाहीत. भ्रष्टाचारी, गुंड त्यांचे रंग बदलणार आहेतच. बदलायचं आहे ते लोकांना. आणि त्याची सुरुवात अण्णांनी धडाक्यात करून दिली आहे. तरीही लोकांनी संयम सोडला नाही. हा चमत्कारच म्हणावा लागेल. तुमचा अण्णा उपोषण करून काय जग बदलणार, अशा कुत्सित प्रश्नावरही लोक शांतपणे उत्तर देत होते. स्वयंस्फूर्त आंदोलनातले हिंसा टाळणारे किंवा प्रखर विधानं गिळणारे तरुण बघितले आणि बऱ्यापैकी दिलासा वाटला. खोचक प्रश्न विचारणारे बुद्धिवादी वा राजकीय झोकेखोर नंतर संख्याबळ पाहून सोयीस्करपणे अण्णांची बाजू घेऊ लागले.अण्णांच्या आंदोलनातून अनेकांनी आपली सोय पाहिली हे खरं आहे. इलेक्ट्रॉनिक्स मीडियाला अण्णांच्या रूपाने १२ दिवसांचा तुफानी टीआरपी मिळाला. अनेक चॅनेल्सनी या काळात आपला जाहिरातींचा दोन-अडीच मिनिटांचा स्लॉट वाढवून चार मिनिटांचा केला. अण्णांसंबंधी अपडेट घ्यायला न्यूज चॅनेल लावलं तर फक्त जाहिरातीच दिसायच्या. एका चॅनेलने तर अण्णांच्या हेल्थ बुलेटिनसाठी स्पॉन्सरशिपच मिळवली होती.चॅनेलवरच्या पॅनेल डिस्कशनमधले लोकच अण्णांच्या आंदोलनाला मीडिया सर्कस म्हणून हिणवत होते आणि तेच चॅनेल या सर्कशीचा खेळ लावून पैसाही वसूल करत होतं.मराठी मीडिया द्विधा मन:स्थितीत होता. अण्णा आंतरराष्ट्रीय फिगर बनलेत हे पचवायला अवघड जात होतं. अण्णा आणि राज ठाकरे यांच्या टीआरपी व्हॅल्यूसंबंधीही चर्चा होत होती आणि अण्णांनी राज ठाकरेंना मागे टाकल्याच्याही चर्चा होत होत्या. तरीही पत्रकार आणि बुद्धिवाद्यांमध्ये राज ठाकरेंविषयी जसे फॅनफॉलोअर्स निर्माण झाले तसे अण्णांविषयी झाले नाहीत.पण अण्णा आणि त्यांच्या टीमला त्याची फिकीर नव्हती. अण्णांचं वर्णनसीरियल किलर’ म्हणून होऊ लागलं. टीव्ही मालिकांच्या लोकप्रियतेलाही अण्णांमुळे ग्रहण लागलं होतं आणि सर्वसामान्य तरमी अण्णा हजारे’ म्हणवूनही घ्यायला लागला होता.अण्णांच्या या बारा दिवसांच्या आंदोलनाला इलेक्ट्रॉनिक मीडियाने हवा दिली की आणखी काय याच्या चर्चा खूप झाल्या आणि होतायत. मीडियाची मोठी गंमत या वेळी लक्षात आली. मीडियाला सतत अ‍ॅक्शन हवी असते. अण्णांच्या अटकनाटय़ामुळे ती या आंदोलनाच्या सुरुवातीला मिळालीही. नंतर मात्र रामलीला मैदानात आंदोलन स्थिरावल्यावर जो एक संथपणा आला तो मीडियाला मानवणारा नव्हता. सरकारने वेट अ‍ॅण्ड वॉच अशी भूमिका घेतली ती तर मीडियाला परवडणारी नव्हती. झेंडे घेऊन घोषणा देणारे लोक आणि मेणबत्त्यांचा मार्च किती काळ दाखवणार? अ‍ॅक्शन नसल्यामुळे मीडिया अस्वस्थ होऊ लागला. अण्णांसंबंधीच्या सकारात्मक-नकारात्मक अशा कोणत्याही बातमीचा शोध घेऊ लागला. मनीष तिवारींची माफी, अण्णांना भेटायला येणारे सेलिब्रिटीज ते मांडवलीसाठी येणारे राजकारणी या सगळ्यांच्याच ब्रेकिंग न्यूज होऊ लागल्या.सोशल नेटवर्किंग साइटचा फारसा परिणाम या वेळी मात्र जाणवला नाही. एक एसेमेस फिरत होता तो मात्र अण्णाच्या लोकप्रियतेविषयी मार्मिक भाष्य करणारा होता..
I miss those days when I used to type Anna and google suggested Kournikova...
अण्णा आता यूथ आयकॉन झालेत अशीही ललकारी यानिमित्ताने दिली गेली. अण्णांनीही त्यांच्या मागे असलेल्या युवाशक्तीबद्दल सतत गौरवोद्गार काढले. मात्र अण्णांच्या आंदोलनात सहभागी या युवा पिढीबद्दल विविध आशंका व्यक्त झाल्या.ते मुळात स्वत: कायदा पाळणारे आहेत का, अण्णांच्या पाठिंब्यासाठी मोर्चा काढणाऱ्यांमध्ये करचुकवे होते, स्वत: लाच घेणारे नसले तरी लाच देणारे होते वगैरे.अण्णा टोपी घालून मोटारसायकलवरून मोर्चात सहभागी झालेल्या युवक-युवतीला एका ठिकाणी हटकून विचारलं, तुम्ही हेल्मेट घालता बाइकवर बसला आहात, मग हा भ्रष्टाचार नाही का? ती बिचारी पोरं एकदम कानकोंडी झाली. मग स्वत:चीच लाज वाटली.. आपलाही मनीष तिवारी होतोय की काय, भीती वाटली.. या छोटय़ा त्रुटींना गंभीर स्वरूप देऊन आपण या आंदोलनाविषयी नकारात्मकता विकसित करतोय की काय?१५ ऑगस्टला ही पोरं झेंडा घेऊन उतरली नव्हती, पण अण्णांच्या सपोर्टसाठी आली. उद्दिष्ट तर चांगलं आहे. आपल्या प्रश्नांना तर उद्दिष्टही नाही. एक गोष्ट तर मान्य करायला पाहिजे की अण्णांचं हे नैतिक आंदोलन आहे आणि ते बऱ्यापैकी यशस्वी झालं आहे.राजकारणी तेच आहेत, नोकरशहाही फार काही बदलणार नाहीत. भ्रष्टाचारी, गुंड त्यांचे रंग बदलणार आहेतच. बदलायचं आहे ते लोकांना आणि त्याची सुरुवात अण्णांनी धडाक्यात करून दिली आहे.लोकांमध्ये भ्रष्टाचाराविषयी चीड निर्माण झाली आहे, पण मधल्या काळात अमेरिकन नागरिकांची मानसिकता भारतीय मध्यमवर्गाने स्वीकारायला सुरुवात केली होती.आपला नेता स्वच्छ पाहिजे, मग भले आपण कसंही वागलं तरी चालेल. थोडक्यात, भगत सिंग शेजारच्या घरात जन्माला यावा, ही भावना.मात्र अण्णांनी तुम्हीच अण्णा व्हा, असा संदेश दिला आणि तो लोकांना आवडला. प्रत्येकजणमी अण्णा हजारे’ म्हणवून घेऊ लागला. नैतिक आंदोलनाचं यश अण्णांना तिथेच मिळालं. लोकांना अण्णांजवळ चारित्र्यसंपन्नता आणि विश्वासार्हता मिळाली. त्यामुळे या ७४ वर्षीय तोडकंमोडकं हिंदी बोलणाऱ्या माणसावर आख्ख्या देशाने जीव टाकला.राहता राहिलं जनलोकपाल विधेयक आणि इतर सुधारणांविषयी अण्णा टीमचा आग्रह. आता त्यांनी भ्रष्टाचारविरोधी एक वातावरण आणि सुंदर प्लॅटफॉर्म लोकांच्या मनातच केला आहे हे कुणीही अमान्य करणार नाही.करप्शनविषयी उद्विग्नतेने बोलणारी माणसं आता अचानक भ्रष्टाचार संपवण्याची भाषा बोलू लागली आहेत. हा पॉझिटिव्ह माइण्डसेट निर्माण झालाय हेही नसे थोडके.या आंदोलनातून नव्या नेतृत्वाला धुमारे फुटतील यात शंका नाही. आंदोलनात कुठल्याही एका विचारधारेचा पॅटर्न नव्हता, पक्षीय संघटन नव्हतं. पण नैतिक बळ होतं आणि हे सगळं बदलू शकतं हा प्रखर विश्वास होता. नव्या युगाचं नवं नेतृत्व निर्माण होण्याची प्रक्रिया या संक्रमणावरच्या श्रद्धेतूनच तयार होते.युवा नेता कैसा हो, या संदर्भातला एक मेल फिरतोय. त्यात साधेपणाने या आंदोलनाला दिशा देणारा अरविंद केजरीवालचा फोटो आहे, आणि दुसरीकडे मैत्रिणीबरोबर रममाण झालेले राहुल गांधी आहे.आणि हा मेल लोकांना आवडतो आहे

No comments:

Post a Comment