तंदुरुस्त राहण्यासाठी पोषक आहार घेणे आवश्यक आहे. शरीर चांगले राहण्यासाठी हाडे मजबूत असली पाहिजेत. हाडे कमजोर किंवा अशक्त असतील तर शरीरही थकते. हाडांच्या बळकटीसाठी अनेक उपाय आहेत, औषधोपचार आहेत; पण मुळात हाडांचे आरोग्य आपण जपतो का? त्यांच्यासाठी घातक ठरणार्या काही सवयी असतात, त्या आपण बदलतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरते. बदलत्या जीवनशैलीत तंदुरुस्तीकडे दुर्लक्ष होते. हल्ली कमजोर हाडे ही वृद्धत्वातील समस्या न राहता तरुण आणि मुलांमध्येही जाणवते आहे. या सर्वांसाठी अयोग्य जीवनशैली आणि चुकीच्या सवयी कारणीभूत आहेत. आपल्या काही सवयी हाडांच्या आरोग्यावर परिणाम करणार्या आहेत. कोणत्या सवयी आहेत जाणून घेऊया.
अतिमिठाचे सेवन : अतिमीठ किंवा मिठाच्या पदार्थांचे सेवन केल्यास लघवीवाटे कॅल्शियम बाहेर पडते. त्यामुळे हाडे कमजोर होतात.
कॉफीचे अतिसेवन : कॉफीमध्ये कॅफिन असते त्यामुळे हाडांतील कॅल्शिअमची पातळी घटते.
धूम्रपान : सिगरेट प्यायल्याने हाडांच्या पेशींचे नुकसान होते. तसेच नव्या पेशी लवकर तयार होऊ शकत नाहीत.
अति मद्यपान : मद्यपान जास्त प्रमाणात केल्यास कॅल्शियम शोषण्याची क्षमता कमी होते. हाडांमधील कॅल्शियम कमी झाल्याने हाडे ठिसूळ होतात.
अतिआहार : अतिप्रमाणात आहार सेवन केल्यास वजन वाढते. त्यामुळे हाडांवर जास्त भार पडतो. ती कमजोर होतात. पोषक आहार घ्यावा, पण वजन मात्र नियंत्रित ठेवावे.
अति औषधे सेवन : आथ्रारायटिस, अस्थमा सारख्या आजारांमध्ये दीर्घकाळ औषधे घ्यावी लागतात. त्यामुळेही हाडे कमजोर होतात.
डॉ. महेश बरामदे
No comments:
Post a Comment