Total Pageviews

Thursday, 5 July 2018

डिजिटल जग आणि ग्राहक सुरक्षा



कल्पना करा की फेसबुक, व्हॉटसअप, यू ट्यूब बंद झालेले आहे. भर पावसात घाम फुटतो की नाही बघा. आपण या सोशल मीडियाशी पर्यायाने इंटरनेटशी असे काही बांधले गेलेलो आहोत की यातून आपली सुटका नाही. केवळ दोन तास जरी इंटरनेटपासून लांब राहिलो तरी चुकल्या चुकल्यासारखे वाटते. केवळ सोशल मीडियाच नाही तर माहिती, मनोरंजन, खरेदी आणि बँकेचे आर्थिक व्यवहार अशा अनेक गोष्टींसाठी आपण इंटरनेटशी बांधले गेलेलो आहोत. निरनिराळ्या वेबसाईट किंवा ऍप चालू करून आपण आपल्याला हवे असलेले काम करत असतो. आजच्या काळातील इंटरनेट हे अत्यंत महत्त्वाचे आणि उपयोगी साधन बनले आहे. पण हे सर्व सुरक्षित आहे का?
यासंदर्भात भारतीय ग्राहकांची मानसिकता कशी आहे, याचे एक सर्वेक्षण करण्यात आले. अशी सर्वेक्षणे विक्रीतंत्र विकसित करणार्‍या कंपन्या किंवा समूह मानसिकतेचे अभ्यासक करतात. तर या सर्वेक्षणातून एक निष्कर्ष असा निघालाय की आपण भारतीय ग्राहक सुलभता जिल्हा कम्फर्टझोन म्हणून पण ओळखले जाते. त्या सुलभतेला आपण खूप महत्त्व देतो आहोत. म्हणजे कसे, ओठावरच जांभूळ असले तर खूष. ते कसे आहे, खाण्यासारखे आहे की नाही, हे आपण बघण्याचे कष्ट घेत नाही. जाहिरातीत दाखवतात तस्स सगळ बसल्याजागी स्वस्त आणि मस्त मिळाल की आम्ही स्वतःला किती शहाणे आणि लकी समजतो. परवा एक मावशी वैतागून म्हणाली सुद्धा, ‘जागच हलायला नको, आता किराण्यापासून औषधे आणि फ्रीजपासून पिझ्झापर्यंत सगळ बसल्या जागी, एका क्लिकवर मिळतंय, या तरुण पिढीला. म्हणून मग तरण्या झाल्या बरण्या आणि म्हातार्‍या झाल्या हरण्या, अशी गत होते. तसे झाले की जायचे स्लिमिंग सेंटरमध्ये आणि जिममध्ये. काय तरी दिवस आलेत…’
मुंबई ग्राहक पंचायतीच्या ग्राहक शिक्षण कार्यक्रमात योग्य अन्नाची निवड, हा पण एक भाग असतो. तसेच संस्थेच्या वितरण प्रणालीतून आरोग्यदायी अन्नाची सभासदांसाठी निवड होते. जसे की बेकरीतील पदार्थ निवडताना बेकारीला भेट देणे, तेथील स्वच्छता बघणे आणि संस्थेसाठी तयार होणार्‍या उत्पादनात वनस्पती न वापरता लोणी वापरले जाईल, अशी खातरजमा करणे, तेल तूप यांचे परीक्षण करून घेणे इत्यादी, पण हे असे सगळ्या ग्राहकांसाठी नाही घडू शकत, जे बसल्या जागी क्लिक करून खाद्य पदार्थ मागवतात.
हे आपल्याकडे नव्हे तर जगभरातील ग्राहकांबद्दल खरे आहे. त्यामुळेच ग्राहकांची जागतिक पातळीवरील संघटना कंझ्युमर्स इंटरनॅशनल याबद्दल एक प्रस्तावच घेवून आली आहे. गेल्या मे महिन्याच्या 15 आणि 16 तारखेला व्युनेसआयर्स-अर्जेंटिना येथे तेथील ग्राहक संरक्षण मंत्रालय व कंझ्युमर इंटरनॅशनल यांनी संयुक्तपणे एक परिषद भरविली होती. या परिषदेचा हेतू अर्थातच ग्राहक संरक्षण अधिक मजबूत कसे करता येईल, यासंबंधी होता. या परिषदेत प्रामुख्याने 3 मुद्दे चर्चिले गेले.
1. बाल ग्राहकांच्यापुढे असणारी भविष्यकाळातील ऑनलाईन संबंधी आव्हाने.
2. निरनिराळ्या उत्पादनांसंबंधी सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सहयोग तसेच धोक्याची सूचना देणारी यंत्रणा तयार करणे.
3. वाया जाणार्‍या अन्नाची नासाडी थांबवून त्याचा योग्य विनियोग होईल, अशी व्यवस्था उभारणे.
यातील बाल ग्राहकांबद्दलची चिंता ही सर्वच देशात एक भेडसावणारा प्रश्न झाली आहे. त्याचे कारण म्हणजे, केवळ नफा आणि अधिकाधिक माहिती संकलन यावर लक्ष ठेवून बाजारात येणारी विधिनिषेध शून्य उत्पादने. त्या खेळण्यामध्ये लपलंय काय, याची जाणीव बालकांना तर नाहीच, पण त्यांच्या आई-वडिलांनाही खरेदीपूर्वी येणे कठीण अशी खेळणी बाजारात आली आहेत. प्रगत म्हणून मिरवणार्‍या देशातील हे कारनामे इंटरनेटचा कसा आणि किती दुरुपयोग केला जाऊ शकतो, याचे निदर्शक आहेत. काय आहे हे खेळणे?
सॉफ्ट टॉईज प्रकारचे र्कीससू ईस’ (हगी बग) हे खेळणे पाश्चिमात्य देशात लहान मुलांसाठी बाजारात आले. त्याचे वैशिष्ट्ये हे की ते इंटरनेटशी जोडलेले आहे. त्यात मायक्रोफोन आणि कॅमेरा बसवलेला आहे. त्यामुळे ते बोलू शकते, ऐकू शकते तसेच पाहूही शकते. याची ऐकण्याची क्षमता खूपच तीव्र आहे. अतिशय गंमत आणणारे हे खेळणे लहान मुलांचे अत्यंत आवडते आहे. मात्र, या खेळण्याचे इंटरनेट कनेक्शन तितकेसे सुरक्षित नाही, असे आढळून आले आहे. लहान मुलगा या खेळण्याबरोबर खेळत असताना त्याची आई मागे मोबाईलवर काही आर्थिक व्यवहारासंबंधी आपल्या बँक अकाऊंटची माहिती सांगत असेल तर हे खेळणे अशी वैयक्तिक अति महत्त्वाची माहितीही आपोआप टिपणारच आहे. ती अशाप्रकारे उघड होताना हॅकरसाठीही केवळ पर्वणीच नव्हे तर आमंत्रणच ठरेल. मग नंतर त्या घरावर काय अरिष्ट ओढवेल हे वेगळे स्पष्ट करून सांगायलाच नको.
दर दिवसागणिक डिजिटल जग बदलत असते. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या संरक्षणासाठी निरनिराळ्या देशांमध्ये माहितीची देवाण घेवाण झालीच पाहिजे. या दृष्टीने डिजिटल इंडेक्स ही संकल्पना कंझ्युमर्स इंटरनॅशनल घेऊन आली आहे, जी सगळ्यांनाच उपयोगी पडणार आहे. आजच्या घडीला खडज स्टॅण्डर्डस् इत्यादी कॉमर्सबाबत सक्रिय आहेच. पुढे येणार्‍या ऑगस्टमध्ये ॠ20 च्या परिषदेत अधिक सविस्तर चर्चा होणार आहे. या सर्व उपाय योजनांमुळे ग्राहक अधिकाधिक सुरक्षित होऊ शकेल, मात्र त्यासाठी त्याने स्वतः जागरूक राहणे ही तितकेच महत्त्वाचे आहे.


No comments:

Post a Comment