Total Pageviews

Monday 2 July 2018

पाकिस्तान व अफगाणिस्तान या मुस्लीम बहुल देशात अल्पसंख्यांक असलेल्यातालिबान्याआड 'पाकी' मनसुबे महा एमटीबी 02-Jul-2018- हिंदू व शीखांचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे षड्यंत्र सुरू

बहुसंख्य लोकांना भारत तसेच युरोपमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी बळजबरी केली गेली. त्यानंतर दिवसेंदिवस पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची स्थिती बिकट होत गेली. अल्पसंख्यांक हिंदू व शीख तालिबान तसेच गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर येत गेले आणि भारताशी घनिष्ट संबंध असल्याच्या संशयामुळे त्यांच्यावर अत्याचार वाढत गेले त्यामुळे आजघडीला येथे केवळ १००० हिंदू व शिखांची संख्या उरली आहे.

पाकिस्तान व अफगाणिस्तान या मुस्लीम बहुल देशात अल्पसंख्यांक असलेल्या हिंदू व शीखांचे समूळ उच्चाटन करण्याचे मोठे षड्यंत्र सुरू असून यासाठी पाकिस्तानची गुप्तचर संघटना व तालिबानी संघटना पद्धतशीर मोर्चेबांधणी करत असल्याचे दिसते आहे. काही महिन्यापूर्वी पाकिस्तानमध्ये हिंदूंवर झालेले हल्ले आणि नुकताच अफगाणिस्तानमधील नांगरहारची राजधानी जलालाबादमध्ये झालेला आत्मघाती बॉम्ब हल्ला यावरून या देशातील हिंदूंना व त्यांच्या नेत्यांना संपवण्याचा 'पद्धतशीर कट' असल्याचे सिद्ध होते. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी नागरहार या ठिकाणी दौऱ्यावर होते. त्यांना भेटण्यासाठी निघालेल्या काही शीख आणि हिंदूंच्या पथकावर आत्मघातकी बॉम्बहल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १७ शीख आणि हिंदूं बांधवांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये संसदीय निवडणुकीचे एकमेव उमेदवार अवतारसिंह खालसा, कार्यकर्ते रावल सिंग, शीख समूहाचे प्रवक्ते इक्बाल सिंग आणि सामाजिक कार्यकर्ते अनुप सिंग यांचा समावेश आहे. मुख्यता मृत्युमुखी पडलेले लोक हे शीख व हिंदूंचे प्रतिनिधित्व करत होते. या हल्ल्याचा भारत व जागतिक स्थरावरून निषेध करण्यात येत असला तरी येथील हिंदूंवर आतापर्यंत करण्यात आलेल्या अत्याचारावर नजर टाकणे महत्वपूर्ण ठरते.
 
अफगाणिस्तानमध्ये १९९० च्या दशकात जवळपास ८० हजार शीख व हिंदू नागरिक स्थायिक होते. मात्र १९८० व ९० च्या दशकात येथील बदलते राजकीय गणितं, धार्मिक दंगे आणि आतंकी कारवाया यामुळे पाकिस्तानच्या गुप्तचर संघटनेच्या सहकार्याने 'तालिबानी' उदयास आले. पुढे चालून या तालिबान्यांचा फटका अफगाणिस्तानलाही बसला आणि मोठी राजकीय उलथापालथ झाली. या सगळ्या घडामोडीत हिंदू व शीख नागरिकांचे हकनाक 'बळी' गेले. अन्याय अत्याचार आणि मोठ्या प्रमाणावर हत्या करण्यात आल्यामुळे येथील हिंदू समाज घाबरून सैरावैरा इतर देशांचा आसरा घेऊ लागला किंवा मायदेशी परतु लागला. यातील बहुसंख्य लोकांना भारत तसेच युरोपमध्ये स्थलांतरीत करण्यासाठी बळजबरी केली गेली. त्यानंतर दिवसेंदिवस पाकिस्तान तसेच अफगाणिस्तानात राहणाऱ्या हिंदूंची स्थिती बिकट होत गेली. अल्पसंख्यांक हिंदू व शीख तालिबान तसेच गुप्तचर यंत्रणांच्या रडारवर येत गेले आणि भारताशी घनिष्ट संबंध असल्याच्या संशयामुळे त्यांच्यावर अत्याचार वाढत गेले त्यामुळे आजघडीला येथे केवळ १००० हिंदू व शिखांची संख्या उरली आहे. यावरून तालिबान्यांनी व पाकिस्तान गुप्तचर संघटनेची हिंदू अत्याचाराची दाहकता, भीषणता लक्षात येईल. हि भीषणता एवढ्यावरच थांबत नाही तर तालिबान्यांनी अफगाणिस्तानावर वर्चस्व मिळवल्यानंतर आपण हिंदू आहोत, हे जाहीर करण्यासाठी तेथील हिंदूंना पिवळ्या रंगाचे चिन्ह आपल्या पोशाखावर लावावे तसेच महिलांनीही बुरखा घालावा, असे फर्मान तालिबानी राजवटीने सोडले होते. त्यामुळेच उरलेल्या हिंदूंनी हळू-हळू अफगाणिस्तान सोडण्यास सुरुवात केली.
 
या पलीकडे राजकीय विचार केल्यास अफगाणिस्तानामध्ये होऊ घातलेल्या निवडणुका व राष्ट्राध्यक्ष अशरफ घनी यांना भारत व पर्यायाने येथील स्थानिक हिंदू व शिखांचा पाठिंबा हा सुद्धा या हल्ल्यामागील महत्वाचा भाग आहे. यावरून तालिबानची राजकीय महत्त्वाकांक्षा अजूनही संपलेली नाही किंवा ती मुद्दामहून संपवली जात नाही हे दिसून येत आहे. सत्तेत लक्षणीय वाटा मिळावा यासाठी हि संघटना गेल्या २०-२५ वर्षांपासून आतंकी कारवाया करत आली आहे. निवडणुकीच्या तोंडावर अशा आतंकी कारवाया करणे हा यांचा ठरलेला भाग असतो. मात्र यावेळी हिंदू व शिखांच्या प्रतिनिधींवर व अल्पसंख्यांक हिंदूमधून संसदीय निवडणुकीचे एकमेव उमेदवार अवतारसिंह खालसा यांची हत्या करून जगाचे लक्ष वेधून घेणे, अफगाण सरकारला इशारा देऊन सत्तेत वाटा मिळवणे, असा तालिबान्यांचा हेतू असला तरी जगभरातील अल्पसंख्यांक हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांकडे भारत सरकार व परराष्ट्र मंत्रालयाने निषेधापलीकडे जाऊन गांभीर्याने पाहण्याची गरज निर्माण झाली आहे.

No comments:

Post a Comment