सर्वसामान्य जनतेला नक्षलवाद म्हणजे काय याबद्दल
अद्याप पुरेशी माहिती नाही. परंतु एल्गार परिषद आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना
ठार मारण्याच्या कटाची बातमी आल्याने सामान्य नागरिकांना नक्षलवाद काय आहे हे
जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे. त्या अनुषंगाने काही उपलब्ध माहिती
देण्याचा प्रयत्न आहे. मागील वर्षांत गडचिरोली जिल्हयांत तब्बल ६६ नक्षलवादयांना
कंठस्नान घालण्यात आले. देशातील सर्वात मोठी कारवाईसुद्धा गडचिरोली जिल्हयात झाली.
ग्लोबल टेरर इंडेक्स ही सिडनीस्थित संस्था आहे
जी जगातील दहशतवादी संघटनांचे हालचालीवर लक्ष ठेवते, त्यांच्या म्हणण्यानुसार
सन २०१६ मध्ये माओ दहशतवादाचा जगात ४ था क्रमांक आहे. त्याअगोदर तालिबान, इसिस, बोको हराम यांचे क्रमांक आहेत. सन २०१६ मध्ये
माओ दशतवाद्यांनी भारतात ९२९ हल्ले केले ज्यामध्ये ३४० निष्पांपाचे बळी गेले.
देशातील एकुण दहशतवादी घटनांपैकी माओ दहशतवादयांनी ४३ टक्के घटना घडविल्या.
गोंदिया व गडचिरोली जिल्हात आजपर्यंत ५२३ पोलीस ठार मारले व ७०० पेक्षा जास्त
निष्पाप आदिवासींचे खून केले. सर्वसामान्यांना नक्षलवाद म्हणजे आदिवासी लोकांसाठी
काम करणारी सामाजिक संघटना, जी बंदुक हाती घेते असा समज आहे.
नक्षलवाद अणि त्याची
सुरूवात
भारतामध्ये पुर्वी काही राज्यामध्ये जमीनदारी
पद्धत मोठ्या प्रमाणावर होती. या जमीनीवर काम करणारे भुमिहीन लोकांनी जमिनीचे वाटप
व्हावे, म्हणून जमिनदारां विरूद्ध सशस्त्र लढा प्रथम
पश्चिम बंगालमधील नक्षलबारी या गावी चारू मुजुमदार व कानु सन्याल यांच्या
नेतृत्वाखाली लढला गेला. चारू मुजुमदार व कानु संन्याल हे चीनचे माओ यांच्या
तत्वज्ञानापासून प्रेरणा घेऊन जमीनदार वर्ग व राजकीय प्रशासन यांना उलथवुन
टाकण्यासाठी सशस्त्र लढा दिला. हा लढा वेगाने इतरत्र पसरला आणि ज्या कोणी या
लढ्यास विरोध करतील त्यांना नष्ट केले गेले. या लढ्याकडे माओ तत्वज्ञानाची पहिली
चाचणी या दृष्टीकोनातुन बघितले गेले. आज हे काम भारतीय कमुनिस्ट पार्टी ऑफ इंडिया
(माओवादी) करत आहे. यासच ‘माओवाद’ किंवा ती चळवळ नक्षलबारीतुन सुरू झाल्याने ’नक्षलवाद’ म्हणतात.
माओ तत्वज्ञानाचा मुळ
गाभा
माओचे म्हणणे असे होते की, ‘राजकीय सत्ता ही बंदुकीच्या नळीमधून वाहते’ माओच्या तत्वज्ञानानुसार कोणताही ज्वलंत प्रश्न माओवादी घोषणामध्ये
परावर्तीत करणे व नंतर ती कृती घोषणामध्ये परावर्तीत करणे. या तत्वज्ञानाप्रमाणे
आज माओवादी शेतकऱ्यांचा प्रश्न असो, महिलांचा प्रश्न असेल, खैरलांजी, भिमा गोरेगांव ची घटना असो, या माध्यमातुन अशा प्रकारच्या प्रचारतंत्राचा वापर करतात. माओच्या
तत्त्वज्ञानानुसार सशस्त्र लढा दऊन प्रथम खेडे विभाग ताब्यात घेणे, अशारितीने शहराभोवतालची खेडे विभाग ताब्यात घेवुन, शहरास घेरणे व शहरे ही सरकारची बालेकिल्ले असल्याने, ती ताब्यात घेणे व अशा रितीने देश ताब्यात घेणे हा त्यांचा अंतिम
उद्देश आहे.
नक्षलवादी जंगलात कशा
प्रकारे काम करतात
नक्षलवादयांच्या जंगलातील सशस्त्र गटास ते
पिपल्स आर्मी किंवा पिपल्स गुरिल्ला लिबरेशन आर्मी म्हणतात, त्यांची आक्रमण निती खालीलप्रमाणे असते. गनिमी सेना, शत्रु (पोलीस सशस्त्र बले) ज्यावेळी आक्रमक असतो त्यावेळेस माघार
घेईल ज्या वेळेस शत्रु कॅम्प करतो त्यावेळी त्यास पिडा देईल. ज्या वेळेस शत्रु
थकलेला त्या वेळेस हल्ला करील. शत्रु माघार घेईल त्या वेळेस त्याचा पिच्छा पुरवेल.
पुर्वेस आवाज करा पश्चिमेस हल्ला करा.
माओवादयांचा विद्यार्थी व शहरी बेरोजगार युवकाना
या लढयात ओढण्याचा मानस व्यक्त केला. यासाठी भारतातील औधोगिक पट्टे जो
भिलाई-रांची-धनबाद-कोलकाता, मुंबई- पुणे-सुरत-अहमदाबाद या पट्यात कुठल्याही
ज्वलंत प्रश्नावरून लोकमत आपल्या बाजूने करण्यासाठी जमेल त्या धोरणा चा वापर करुन
व सरकार विरोधात विषारी वातावरण तयार करणे. यासाठी माओवादयांच्या बंदी घातलेल्या
संघटना न वापरता (छुप्या संघटना) या अत्यावश्यक ठरविण्यात आल्या. शहरी भागात फ्रंट
संघटना व जन संघटनाच्या माध्यमातून माओवादी काम करातात, या संघटना लोक व जंगलातील माओवादी यांच्यातील दुवा म्हणुन कार्यरत
असतात. त्या वेळी माओवादी मारले गेल्यास, कुठल्याही राज्यात एखादी
घटना जी माध्यमात गाजली असल्यास चौकश्या करतात, गुप्त राहुन जनतेमध्ये
सरकारविरोधी असंतोष तयार करतात,
गंभीर कायदा व
सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण करतात. ही पद्धत खैरलांजी, सिंगूर, जी.के. विधी-चिंतापल्ली आध्रप्रदेश, भिमा कोरेगांव येथे वापरली गेली. जिथे जिथे संघर्ष/समस्या असेल ती
आपल्या फायद्यासाठी व त्याचा नंतर राजकीय एकीकरणासाठी जे एकीकरण पुढे क्रांती
युद्धासाठी वापरण्यात येणार आहे. अश्या संघर्षातुन एक नेटवर्क तयार केले जाते
त्यायोगे गनिमी युद्धासाठी सैन्य मिळविणे व त्यांचा जंगलयुद्धासाठी वापर
करण्यासाठी होतो. फ्रंट संघटनेचा म्होरक्या, दिल्ली येथील एका
महाविद्यालयातील इंग्रजीचा प्रोफेसर, प्रा. साईबाबा यास आजन्म
कारावासाची शिक्षा झालेली आहे. आरडीए नावाच्या शहरात काम करणारे संघटनेचा तो सचिव
होता. अशा फ्रंटचा खरा उद्देश लोकांच्या समस्या सोडवणूक करणे नसून शहरी भागामध्ये
कामगार, कष्टकरी, महिला, शेतकरी, सांस्कृतिक संघटना यांच्या माध्यमातून गनिमी
युद्धास कार्यकर्ते शोधण्याचे काम करणे, आपल्याकडे ज्या
संघटनाच्या नावामध्ये Civil, Liberties,
Rovolutionary, people's, democratic हे शब्द येतात,
अश्या संघटनाबाबत पुर्ण
माहिती करून घेतलेली बरी.
सीपीआय (maoist) चे
२००४ मधील कागदपत्रे Strategy and tactics मध्ये मुक्त विभाग (liberated zone) ची संकल्पना दिली आहे. liberated zone म्हणजे असा भुभाग जेथे मावोवादयाची राजकीय सत्ता असेल जेथे लोकांनी
निवडुन दिलेल्या लोकांची सत्ता नसेल. बंदुक हे सर्वस्व असेल व शासन यंत्रणेस अश्या
भागात येवू दिले जाणार नाही. याच लेखात नक्षलवादयांनी म्हटले आहे की, त्यांचेपेक्षा पोलीससशस्त्र बले, आधुनिक शस्त्रे, प्रशिक्षण यामध्ये मावो दहशतवाद्यांपेक्षा वरचढ असल्याचे मान्य
करतात, परंतु त्यांचे मध्ये स्वयंप्ररणेची (motivation) कमरतता असल्याने सशस्त्र पोलीस बलापेक्षा मावोवादी वरचढ असल्याचे
मानतात.
सीपीआय (maoist) माओवादी यांची भविष्यातील
निती/योजना
१७ डिसेंबर २००२ रोजी CPI माओवादीचे केंद्रीय विभागाने काही ठराव दंडकारण्या विशेष विभाग
समिती व आंध्र, ओरीसा विभाग समितीमध्ये अंमलात आणण्याचे ठरविले.
त्यात गनिमी युद्धाच्या पायावर समाजनिर्मिती २००३ पर्यंत, स्थानिक गनिमी सैन्य अबुजमाड मधील १०० गावात तयार करणे, ग्राम समित्या तयार करणे, महिला पथक, वैद्यकिय पथक व दोन शाळा तयार करण्याचे नियोजन, शेतीचा पद्धतशीर विकास. लोकांना माओवादाबद्दल जागृत करणे व त्यांना
सरकारविरोधी लढयास तयार करणे. अस्तित्वात असलेले गनिमी सैन्यास मजबूत करणे.
इद्रावती, भामरागड, डोवला, काकनाल, भागात शत्रुचे (शासकिय यंत्रणा) आगमन थांबविणे.
प्रगत क्रांतीकारी याची शिक्षण क्षेत्रासाठी निवड करणे.
माओवाद्यांना निधी कोठुन
मिळतो
मुख्यत्वे खंडणीमधुन माओ दहशतवादी (नक्षलवादी)
पैसा गोळा करतात ज्यामध्ये तेंदुपत्ता, बांबू कंत्राटदार, खाणमालक, गावाकऱ्यांच्या रोजगारातील हिस्सा, कॉन्ट्रॅक्टर,
हॉटेल, रिसॉर्ट चालक यांच्याकडून पैसा गोळा केला जातो.
शस्त्र कोठून मिळतात - माओ दहशतवादी (नक्षलवादी) कमकुवत असलेले पोलीस
मुख्यालय, पोलीस ठाणे लुटून, चकमकीत मृत सुरक्षाबलाची
शस्त्रे यांचा वापर करतात. याबरोबरच भूसुरंग ते स्वतः साहित्य मिळवून तयार करतात.
काही शहरात शस्त्र तयार करण्याचे कारखाने यापुर्वी पकडले आहेत.
माओवाद्यांचा शहरात छुपा
लढा का असतो ?
माओ दशहतवाद्यांचा, नक्षलवादयांचा उद्देश लोकशाही, स्वातंत्र्य, यांच्याविरूध्द सशस्त्र लढा आहे. निवडून आलेले सरकार उलथून
टाकण्याचे काम उघडपणे हे करू शकत नाहीत, म्हणुन छुपा लढा.
नावे बदलण्याची पध्दत
माओ नक्षलवादी जंगलात किंवा शहरात नावे बदलून
राहतात. ते स्वत:च्या खर्या नावाचा वापर क्वचितच किंवा फ्रंट संघटनामध्ये करतात
परंतू फ्रँट संघटना व जंगलातील संघटना यांच्यातील पत्रव्यवहारात ते बदललेले नाव
वापरतात जसे दिल्ली विद्यापीठाचा जन्मठेपेच्या शिक्षेत असलेला प्रा. साईबाबा
ज्यावेळी तो जंगलात पत्र पाठवत होता त्यावेळी तो चेतन किंवा अमर नावाने पत्र पाठवत
असे हे नाव संघटनेत कायम असते.
माओवादाची सद्यस्थिती
सन ९ सप्टेंबर १९७६ रोजी माओचे निधन झाले व डेंग
जिओ पेंगची सत्ता आली. बदललेले जागतिक वातावरण, लोकांचे जीवनमान
सुधारण्यासाठी १९८२ साली खाजगी भांडवल व १९८८ साली खाजगी जमीन हस्तांतरण असे बरेच
कायदे आले व माओ काळातील कायदे,
नियम रद्द केले.त्यातून
आजचा आधुनिक, विकसीत, जगाशी स्पर्धा करणारा चीन
निर्माण झाला. आज माओदास धरून बसलेले देश व देशातील जनता विपन्नावस्थेत जीवन जगत
आहेत.
माओवाद व कन्फूशियस, माओ, बुद्ध
चीनमध्ये जिथे माओवाद पसरला तेथेच बौद्ध धर्म, कन्फूशियस, माओ यांचे विचारही मानले जातात, याबाबत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा उल्लेख करणे गरजेचे आहे. २०
नोव्हेंबर १९५६ जागतिक बौद्ध परिषद काठमांडू, नेपाळ येथे केलेले भाषण
महत्वपुर्ण ठरावे, त्यामध्ये ते म्हणतात, नैतिक शिकवणीने व प्रेमाने लोकांची मने वळविणे यावर बुद्धांचा भर
आहे. जोरजबरीने किंवा सत्तेने बुद्धाला विरोधकांना जिंकावयाचे नसून प्रेमाने व
आपुलकीने जिंकायचे आहे. या मूलभूत फरक लक्षात घेतला म्हणजे असे कळून येते कि, तत्वज्ञान प्रस्थापनेसाठी बुद्धास रक्तपात मान्य नाही, उलट साम्यवादास (मावोवादी/नक्षलवादी) हिंसेचाच मार्ग पसंत आहे.
बौद्ध तत्वज्ञान व मार्क्सवाद यांचा तौलनिक अभ्यास केला तेव्हा मी या निष्कर्षाला
पोहचलो की, जगातील एका फार मोठया समस्येच्या बाबतीत, म्हणजेच जगात दुःख आहे व त्याचा निवारणाचा एक निश्चित उपाय आहे या
बाबतीत बुद्धांचाच मार्ग सर्वोत्तम व भरभक्कम आहे.
गोंदिया गडचिरोली का?
सरकारविरोधी सशस्त्र लढा देऊन, लोकशाहीने निवडून आलेले सरकार उलथून टाकावयाचे असल्याने व सरकारशी
समोरासमोर ते लहू शकत नसल्याने त्यांच्या गनिमी युद्धाच्या नितीनुसार ज्या भागात
लोक अशिक्षित असतील, त्यांचा पाठिंबा मिळविणे सोपे जाईल असा भूभाग, युद्धासाठी योग्य भूभाग. ज्यामधे कमी लोकवस्ती, अशिक्षित लोक असलेला. मुख्य शहरापासुन दुर डागराळ, जंगल, शत्रु (सरकार) कमकुवत आहे असा भाग, असा भाग जेथे शत्रुस चकवा देवून हल्ला करता येण्यासारखी स्थिती, म्हणजे ज्या भागात ऍम्बुश लावुन शत्रुस नामोहरम करता येईल असा या
त्यांच्या योजनेशी गडचिरोली गोंदियातील डोंगराळ, जंगल असलेला व गरीब
अशिक्षित आदिवासी बहुल भाग असल्याने त्या भागात माओवाद्यांनी तेंदुपत्ता, बांबु मजुरीच्या माध्यमातून प्रवेश केला. नक्षलवाद्यांनी जर
आदिवासी लोकांसाठी काम करावे,
असे अपेक्षित असले तरी
आदिवासींच्या विकासामधील नक्षलवाद हाच खरा अडथळा बनलेला आहे. अनेक तरुण तरुणींना
नक्षलवाद हा काय आहे, हे माहित सुध्दा नाही. बंदूकीचे आकर्षण व हिरवा
ड्रेस घालायलला भेटला की, ज्यांना हे तरूण पुर्वी घाबरत, बंदूक आल्यानतंर एक प्रकारचा दरारा होईल या उद्देशाने बहुतेक
युवक-युवती यामध्ये सहभागी होतात. तरुणांना बंदूक चालविणेबाबत प्रशिक्षण दिले जाते, वन खात्याचे डेपो,
वाहने जाळणे, आदिवासींना मारहाण करणे, खून करवुन घेणे असे
प्रकार यांचेकडून करून घेतले जातात. काही ठिकाणी त्यांचे चित्रीकरण सुद्धा केले
जाते. अशा युवकयुवती ज्या वेळेस उद्विग्न होतात व चळवळ सोडू इच्छितात त्यावेळी
त्यांच्या कृत्याबाबत त्यांना पोलिसांकडून त्रास होईल, अशी भिती दाखविली जाते व त्याला नक्षलवादयांच्या संघटनेमधून बाहेर
जाण्यास मज्जाव केला जातो.
माओच्या तत्वज्ञानाने काय
होणार आहे
महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त सामाजिक सुधारक
असल्यामुळे शिवाजी महाराजांपासून ते शाहू आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सार्वत्री बाई, धोंडो केशव कर्वे,
गाडगे महाराज यांनी
स्वातंत्र्य, सामाजिक, शैक्षणिक, महिलासांठी काम केले आहे. वर्गसंघर्षाची तीव्रता महाराष्ट्रात
अत्यंत कमी पातळीवर असल्याचे दिसते. महाराष्ट्रामध्ये ज्या कारणासाठी नक्षलवाद
इतरत्र फोफावला आहे. ती कारणे नसल्याने दिसून येते. मग हे माओवादी खैरलांजी, भिमा कोरेगाव,
सुरजागड असे मुद्दे
पद्धतशीर प्रचाराद्वारे तयार करुन समाजामध्ये दरी घडवून आणतात. सशस्त्र चळवळीसाठी
काही कार्यकर्ते मिळाले तर त्यांना जंगलामध्ये पाठवतात. आज माओवादी आदीवासींच्या
मानगुटीवर बसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. माओवाद्यांनी ७०० चे वर आदीवासींचे
खून केलेले आहेत आणि त्यामधुन आता आदिवासी बाहेर पडण्याचा प्रयत्न करीत आहेत.
मावोवादामुळे सर्व समाजाचे नुकसान होणार आहे. माओवादीचे मुळ तत्वज्ञान लोकशाही, स्वातंत्र्य यांचेवर घाला घालणारे असल्याने व राजकिय सत्ता ही
बंदुकिच्या नळीतून वाहते असे मानणारे तत्वज्ञान, भारतासारख्या खंडप्राय, स्वातंत्र्य, लोकशाही असलेल्या देशामध्ये प्रसारित होणे अवघड
आहे. कारण माओवाद हा लोकांवर,
विचारावर, स्वातंत्र्यावर घाला घालणार सिद्धांत आहे. जगामध्ये जे गरीब देश
आहेत जसे व्हेनेझुआला, क्युबा तेथे असे प्रकार आहेत, उलट रशिया, चीन हे जरी कम्युनिष्ट असले तरी या देशांमध्ये
टोकांची भांडवलशाही अस्तित्वात आहे
No comments:
Post a Comment