ट्विटरचे चिह्न ‘चिमणी’ आहे आणि ‘ट्विट’ म्हणजे चिवचिवाट किंवा चिमणीचा आवाज असं आपण म्हणू शकतो. एकावेळी १४० शब्द संदेशात आपण पूर्वी ट्विट करू शकत होतो. पण आता ती मर्यादा दुपटीने वाढविण्यात आली आहे. शब्दांबरोबरच आता आपण फोटो आणि व्हिडिओ, लिंक देखील पाठवू शकतो. जगात काय चालू आहे? लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत? राजकारणी काय करत आहेत? सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडतंय? असं सगळं सगळं जाणून घेण्यासाठी ट्विटर हे एक चांगलं माध्यम आहे.
ट्विटर म्हणजे नेमकं काय, असा प्रश्न अनेकांना पडतो. खरं
तर ट्विटर ही इतर सोशल मीडिया साईटसारखी एक साईट. मात्र, याची
संकल्पना इतर सोशल माध्यमांपेक्षा वेगळी आहे, हेही खरे. २१
मार्च २००६ ला ट्विटरची स्थापना अमेरिकेतील सॅन फ्रन्सिस्को येथे झाली. ट्विटरचे
संस्थापक उएज जॅक डॉर्से. त्यांनी आणि त्यांच्या तीन मित्रांनी मिळून याचा शोध
लावला होता. इतर सोशल माध्यमांपेक्षा ‘ट्विट’ हे ट्विटरचे वैशिष्ट्य. जर आपण पाहिलं तर लक्षात येते की, ट्विटरचे चिह्न ‘चिमणी’ आहे
आणि ‘ट्विट’ म्हणजे चिवचिवाट किंवा
चिमणीचा आवाज असं आपण म्हणू शकतो. एकावेळी १४० शब्द संदेशात आपण पूर्वी ट्विट करू
शकत होतो. पण आता ती मर्यादा दुपटीने वाढविण्यात आली आहे. शब्दांबरोबरच आता आपण
फोटो आणि व्हिडिओ, लिंक देखील पाठवू शकतो. जगात काय चालू आहे?
लोकांच्या मनात काय प्रश्न आहेत? राजकारणी काय
करत आहेत? सेलिब्रिटींच्या आयुष्यात काय घडतंय? असं सगळं सगळं जाणून घेण्यासाठी ट्विटर हे एक चांगलं माध्यम आहे. बर्याच
व्यक्तींची आता ट्विटरवर अकाऊंट आहेत. आपल्याला कोणत्याही विशिष्ट व्यक्तीबद्दल,
स्थानाबद्दल कोणतीही माहिती हवी असेल तर, आपण
त्यांना फॉलो करू शकतो. त्यानंतर त्यांची माहिती त्यांनी केलेल्या ट्विटच्या आधारे
मिळत असते. आता वेगवेगळे राजकीय पक्ष, नेते, बँक, सरकारी व्यक्ती, सेलिब्रिटी,
उद्योगपती हे सगळे ट्विटरचा वापर करतात आणि आपल्या इच्छेनुसार आपण
त्यांना फॉलो करून माहिती घेऊ शकतो. ट्विटरचा आणखी एक फायदा म्हणजे, आपण रिट्विट देखील करू शकतो. रिट्विट म्हणजे एखाद्याचे आवडलेले ट्विट आपण
शेअर करू शकतो. यामध्ये आता बदल झाला तो असा की, पूर्वी लोक
फेसबुक, ऑर्कूट, याहू वर असायचे,
पण आता ट्विटरचा खूप वापर होताना दिसून येतो आणि त्यामुळेच ट्विटर
हे लोकांपर्यंत, जनसंपर्क वाढविण्याचं मार्केटिंग करण्याचं
मोठं माध्यम म्हणून उदयास आलं.
ट्विटरद्वारे
प्रचार-प्रसिद्धी
इतर माध्यमांप्रमाणे ट्विटर एक मोठं ऑनलाईन
माध्यम आहे म्हणून ट्विटरद्वारे प्रसिद्धीचा उपयोग केला जातो आणि त्यासाठी मोठ्या
प्रमाणावर रक्कम देखील समोरच्याला मोजावी लागते. ट्विटर वेगवेगळया कंपन्यांना
किंवा राजकीय पक्षांना प्रसिद्धीसाठी त्यांच्या होम टाईम लाईनवर प्रचार करण्यासाठी
मदत करतो. जे वेगवेगळे उत्पादन असते, त्या उत्पादनाची माहिती टेक्स्ट, हॅशटॅग स्वरूपात, फोटो, व्हिडिओ,
लिंक्सद्वारे, अनलिमिटेड gif द्वारे किंवा ईमोजीद्वारे सोशल मीडियावर त्या उत्पादनाच्या विपणनासाठी
साहय्यभूत ठरते.
त्याचबरोबर सामाजिक आणि राजकीय घडामोडी आणि
तक्रार निवारणाचे नवे माध्यम म्हणूनही ट्विटरकडे पाहायले जाते. याचं उत्तम उदाहरण
म्हणजे सुरेश प्रभू यांनी रेल्वे मंत्री असताना रेल्वेचे ट्विटर हँडल सुरु केले
आणि त्याद्वारे हॅशटॅग किंवा टॅग करून आपली तक्रार प्रवाशी तेथे मांडू लागले आणि
त्यानंतर जवळपास सगळ्याचं मंत्रिमहोदयांनी ट्विटरवरुन अशाप्रकारे जनसंपर्क
वाढविण्यास सुरुवात केली. वेगवेगळ्या देशातील समाजसेवक देखील ट्विटरचा उपयोग करतात, शासनानेदेखील याचा फायदा घेतला
आहे. मोठे सेलिब्रिटी, उद्योगपतीही विविध विषयांवर
ट्विटरवरुन व्यक्त होताना दिसतात.
अमेरिकेत २००८ साली झालेल्या अध्यक्षीय
निवडणुकीत ट्विटरचा सर्वप्रथम खूप मोठा उपयोग झाला होता. राजकीय नेते शशी थरूर, अभिनेता अमिताभ बच्चन, आमीर खान, ऋतिक रोशन हे ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर
सक्रिय दिसतात. या सक्रियतेतून त्यांना पैसादेखील मिळतो. पूर्वी इंग्रजीमध्ये
असणारी ही सेवा आता इतर भाषांमध्ये, देशांमध्ये देखील उपलब्ध
आहे.
ट्विटरद्वारे पैसा कसा
कमावला जातो?
आता मुळात ज्यावेळी आपण ऐकतो की कुणीतरी सोशल
मीडियाद्वारे पैसा कमावतो आहे, हे ऐकून आपल्याला ‘असं होऊ शकतं का?’ हा प्रश्न पडतो. मात्र, गुगलद्वारे पैसे कसे कमविता
येतात, हे आपण आधीच्या लेखात पाहिलं. तसेचं ट्विटरच्या
बाबतीत जो कोणी युझर आहे त्याचे फॉलोअर्स किती आहेत, हे आधी
पाहिलं जातं. त्यांचे ट्विट किती लोकांनी रिट्विट केले? त्याला
किती लाईक्स आहेत? हे देखील तपासले जाते. फक्त अभिनेतेच नाही
तर उद्योगपती, खेळाडू हे देखील याचा फायदा घेतात. यासाठी काय
करावं लागतं, तर सर्वात आधी ट्विटरवर स्वतःचा आयडी अथवा
अकाऊंट असणं गरजेचं आहे. फेसबुकसारखं फेक अकाऊंट उघडून इथे चालत नाही. कारण,
जर तुम्हाला ट्विटरच्या आधारे पैसे कमवायचे आहेत तर, मग चुकीची माहिती दिल्यानंतर ते पैसे मिळणार नाहीत.
त्यानंतर जे काही वेगवेगळे राजकीय, सामाजिक, आर्थिक
अशा ज्या काही बातम्या किंवा घटना, घडामोडी घडत आहेत,
तर त्याबद्दल सातत्याने ट्विटरच्या माध्यमातून माहिती लोकांपर्यंत
पोहोचवायला पाहिजे. यालाच ‘अपडेट राहणं’ असं म्हणतात. आपल्या आजूबाजूच्या घडणार्या घटनांवर स्वत:च्या सृजनशीलतेचा
प्रयोग करून आणि त्याला ट्विट करायचं, जेणेकरून लोक त्याला
रिट्विट करू शकतील. यामुळे आपले जेवढे फॉलोअर्स आहेत, त्यांच्या
संख्येत भर पडते आणि जे फॉलोअर्स आहेत, त्यांनासुद्धा आपण
आपोपाप फॉलो करतो. मात्र, जास्तीत जास्त फॉलोअर्स
वाढविण्यासाठी हॅशटॅग(#) चा वापर करणे, चर्चेतील विषयांवर ट्विट करणे सोयीचे ठरते. जर आपल्या फॉलोअर्सची संख्या
५० हजारांच्या वर गेली, तर आपण वेगवेगळ्या जाहिरात संस्थांशी
संपर्क साधू शकतो. गुगल केल्यानंतर आपल्याला अशा जाहिरात संस्थांची माहितीही
मिळेल. भारताच्या महानगरांमध्ये आणि अशा शहरांमध्ये की जिथे ट्विटरधारकांची संख्या
जास्त आहे, म्हणजे दिल्ली मुंबई, कलकत्ता,
गुजरात, बंगळुरू, हैद्राबाद,
पुणे इथेसुद्धा बऱ्याचशा जाहिरात संस्था आहेत की, ज्या त्यांच्या मोहीमा चालवण्यासाठी आपल्याला मोबदला देते.
ट्विटरद्वारे कसे आणि
किती पैसे मिळू शकतात?
ट्विटरवर जर तुमचे ५० हजार फॉलोअर्स आहेत, तर तुम्हाला एक ट्विट केल्यावर
१० रुपये मिळतात. जर फॉलोअर्सची संख्या एक लाख आहे, तर २०-३०
रुपये एका ट्विट मागे मिळतात. जितके जास्त ट्विट, तितका पैसा
त्यातून मिळतो आणि मग त्याप्रमाणात उत्पन्न वाढत जाते. ट्विटरवर उबेर पेज असते.
त्यावर अकाऊंट तयार करून त्यावर सबस्क्रीप्शनचा पर्याय येतो. मग त्यावर रजिस्टर
करून एक रिव्हर्ट कोड येतो. त्यानंतर त्याची लिंक आपण पुढे पाठवून, मग आपण ट्विटरद्वारे काय पाठवतो आहे, त्याला
रिस्पॉन्स कसा येतो याचा अभ्यास केला जातो. नंतर कंपनी तुमच्याकडून फॉर्म भरून
घेते. प्रत्येक क्लिकवर तुम्हाला पेमेंट मिळणं सुरु होतं. आजकाल वेगवेगळी लोकं
ट्विटद्वारे चर्चेत राहतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील जयंती, स्मृतिदिन व्यतिरिक्त सरकारच्या घोषणा, विरोधकांवर
टीका ट्विटरद्वारे करतात. वीरेंद्र सेहवाग भारताचे माजी क्रिकेटपटू हे सध्या
मोठ्या प्रमाणावर सोशल मीडियावर आहेत. त्यांच्या ट्विटद्वारे ते लोकांचं मनोरंजन
होतं आणि त्याचा चांगला फायदा हा त्यांना होतो. हे त्यांनी स्वतः सांगितले आहे.
ट्विटरद्वारे गेल्या सहा महिन्यात त्यांनी तीस लाख रुपये कमावले आहेत. त्यांचे
ट्विट मनोरंजक असल्याने लोकं ते वाचून रिट्विटही करतात. त्यामुळे त्याच
ब्रॅ्रण्डिंग देखील होत आहे. त्यामुळे काही ब्रॅ्रण्ड्सशी त्यांच्या संपर्क झाला.
सात दशलक्ष लोकं वीरेंद्र सेहवागला ट्विटरवर फॉलो करतात. त्यावरून ते किती
लोकप्रिय आहे, हे आपण समजू शकतो. बॉलिवूडचे सेलिब्रिटी ट्विट
करून लाखो रुपये कमावतात. कधी कधी ब्रॅण्डला घेऊन ते ट्विट करतात, कधी उत्पादनाबद्दल सांगतात अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातात.
आशियाई देशांबाहेर सुद्धा ट्विटरचा उपयोग होतो. त्यामुळे आशियाई देशातसुद्धा
त्याचा वापर दिसतो.
ट्विटरशी संबंधित
महत्त्वाच्या संकल्पना
फॉलो : फॉलो बटणाचा उपयोग
एखाद्या व्यक्तीचे अनुकरण करण्यासाठी होतो आणि त्याद्वारे तिचे ट्विट आपण पाहू
शकतो आणि नवनवीन माहिती मिळवू शकतो. हे एखादी व्यक्ती, उत्पादन,
संस्था असू शकते.
फॉलोईंग : यात एकावेळी आपण किती
व्यक्तींना फॉलो करतो याची संख्या दिसते. यात आपल्याला फॉलो करणा ऱ्या व्यक्तींची संख्या देखील असते.
फॉलोअर्स : आपल्याला फॉलो करणार्या
व्यक्तींना फॉलोअर्स म्हणतात, त्याद्वारे आपण आपली माहिती,
ट्विट्स त्यांच्यापर्यंत पोहोचवू शकतो.
ट्विट्स : जो संदेश आपण एकाच वेळी
आपल्या फॉलोअर्सना पाठवू शकतो.
रिट्विट : आपला मेसेज ज्यावेळी इतर
कोणीतरी फॉरवर्ड करतो त्यास ‘रिट्विट’ म्हणतात.
हॅशटॅग : ट्विटरवर हॅशटॅग (#)
चा वापर कोणत्याही गोष्टीची चर्चा करण्यासाठी केला जातो आणि मग
आपल्याला मांडायचा असलेल्या मुद्द्याला आपण ‘हॅशटॅग’ वापरून ते चर्चेत ठेऊ शकतो. हॅशटॅगचा वापर आपण किंवा चर्चेत असणारी
व्यक्ती करू शकते. रेल्वेसाठी indianrailwayservice असे
हॅशटॅग वापरू शकतो.
ट्रेंड्स : चर्चेत किंवा प्रसिद्ध
असणारे हॅशटॅग ज्यावेळी चर्चेत येतात, त्याला ‘ट्रेंड्स’ असं म्हणतात. ते जगभरात प्रसिद्ध होतात
असं आपण म्हणू शकतो. ज्या गोष्टीचं आपण अनुकरण करतो, त्याला ‘ट्रेंड’ म्हणतात. जगात वेगवेगळ्या गोष्टी या रोजच्या
रोज ट्रेंड होत असतात.
तेव्हा, एकूणच जगभरातील घडामोडींचा कानोसा घ्यायचा असेल तर
ट्विटर हे एक उपयुक्त माध्यम आहे, यात शंका नाही
No comments:
Post a Comment