| http://damodarsut.globalmarathi.com/ |
Search by Tags: अण्णा हजारे भ्रष्टाचार जनलोकपाल
राहुलजी, तुम्ही तर म्हणाला होतात कि 'मला भारतीय असण्याची लाज वाटते' म्हणून! मग अशा लोकांचा सर्वोच्च प्रतिनिधी होण्याची तुम्हाला नाही लाज वाटत ? हे कसे काय ? पंतप्रधान झालात तर तुम्हाला मेल्याहून मेल्यासारखे व्हायला हवे. तुमच्या आडनावाची देखील खरतर तुम्हाला फारच लाज वाटायला हवी. बर, तुमचे समर्थक तुम्हाला तरुणांचे नेते म्हणतात. पण तरुण तर अण्णा हजारे या ७३ वर्षाच्या वृद्धाभोवती जमा झालेले दिसतात. त्यांनी हाती घेतलेल्या कार्यात झोकून देतात. त्यांना कोणी ट्रकात घालून आणलेले नाही. बर , अण्णा त्यांना सत्तापदे देतील या आशेने ते आले असावेत असे म्हणावे तर अण्णांकडे नैतिक सत्तेशिवाय काहीच नाही. कमाई तर सोडाच अन्णातर त्यांना मुकाट्याने पोलिसांच्या लाठ्या खा असे सांगतात तरी ते त्यांच्याबरोबरच! आपण या तरुणांमध्ये तर सोडाच , पण इतरही कोठे दिसला नाहीत. भ्रष्टाचाराविरुद्धच्या लढाईत तरुण गुंतलेले असताना , तुम्ही तुमच्या 'चमचा तुकडीत' तरी भ्रष्टाचाराविरुद्ध तोंडदेखला आवाज कराल असे वाटले होते. त्या चमचा तरुणांनीही तुमची साथ सोडली कि काय? तरी देखील तुम्ही तरुणांचे नेते? अण्णांचे आंदोलन हिंसक व्हावे म्हणून चीड आणणारी वक्तव्ये करायला तुमच्या मनीष तिवारी सारख्या चमच्यांना सांगू नका. आंदोलन हिंसक व्हावे आणि ते तसे झाले कि आणीबाणी लावायचा तुमचा विचार आहे कि काय अशी शंका येते. तुम्हाला तरुणांचे नेते व्हायचे असेल तर प्रथम अण्णांचे शागीर्द व्हा! कारण वयोवृद्ध अण्णा मध्येच तरुणांना अन्यायाविरुद्ध खंबीरपणे उभा राहिलेला तरुण दिसतो आहे. राहुलजी तुम्ही अण्णाना शरण जा |
No comments:
Post a Comment