Total Pageviews

Friday, 2 September 2011

SACHIN REFUSES TO BE BRAND AMBASSIDOR FOR MAHARASHTRA

. टा . प्रतिनिधी
मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरने महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसिडर होण्यास मान्यता द्यावी , यासाठी सुमारे वर्षभरापासून पाठपुरावा करूनही त्यास प्रतिसाद मिळाल्याने अखेर हा विचार सरकारने सोडून दिल्याचे पर्यटनमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले .
केरळच्या धर्तीवर महाराष्ट्रातील पर्यटन व्यवसाय वाढीस लागावा , यासाठी पर्यटन खात्याने विविध योजना राबविण्याचे ठरविले . या उपक्रमाचा भाग म्हणून तत्कालीन पर्यटनमंत्री डॉ . विजयकुमार गावित यांनी राज्यातील नामांकित व्यक्तीला महाराष्ट्राचा ब्रँड अॅम्बेसिडर करावे , अशी कल्पना पुढे आली . त्यावेळी अभिनेत्री माधुरी दीक्षित , पार्श्वगायिका आशा भोसले आणि सचिन तेंडुलकर अशी तीन नावे पुढे आली .
दरम्यानच्या काळात मुंबईतील आदर्श घोटाळ्यामुळे राज्यातील नेतृत्वात बदल झाला . उपमुख्यमंत्रीपद अजित पवार यांच्याकडे गेल्यामुळे भुजबळ यांना सार्वजनिक बांधकाम खात्यासोबत राष्ट्रवादीच्या ताब्यातील पर्यटन खात्याचा डॉ . गावित यांच्याकडील कार्यभार सोपविण्यात आला . भुजबळ यांच्याकडे कोणतेही खाते असले तरी त्यात ते नावीन्यपूर्ण योजना आणण्याचा प्रयत्न करतात . त्यामुळे महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसिडर पद सचिनने स्वीकारावे यासाठी भुजबळ यांनी त्याला विनंती पत्र पाठविले .
सततचे क्रिकेट सामने , देश - विदेशातील दौरे यामुळे सचिनकडून पर्यटन खात्याच्या पत्राला उत्तर मिळाले नाही . आता या कारणासाठी तेंडुलकर यांच्याकडे पाठपुरावा करणार नाही , असे भुजबळ यांनी मंत्रालयात सांगितले . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेचे अध्यक्ष असल्याने महाराष्ट्राचे ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून सचिन राजी होईल , असा राष्ट्रवादीच्या काही पदाधिका-यांचा कयास होता . मात्र तो फोल ठरला आहे

No comments:

Post a Comment