मुंबई पोलिसांचा खासगी धंदा!कायदा-सुव्यवस्था राखणे, ज्यांच्या जीवाला धोका आहे अशांना संरक्षण देणे हे पोलिसांचे काम. पण या ड्युटीपेक्षा स्वतःचा खासगी संरक्षण पुरवण्याचा व्यवसाय करुन काही पोलीस अधिकारी रग्गड पैसा कमवत आहेत.
पोलीस दलात काम करताना खासगी सिक्युरिटी एजन्सी चालवणे अथवा अशा स्वरुपाच्या व्यवसायात भागीदार किंवा सल्लागार म्हणून काम करण्यास मनाई आहे. मात्र नियमांकडे दुर्लक्ष करत निवडक पोलीस अधिकारी खासगी सिक्युरिटी एजन्सी चालवत आहेत. कोणी आक्षेप घेऊ नये, यासाठी आपल्या वरिष्टांना एजन्सीच्या उत्पन्नातील ठराविक रक्कम देण्याचा प्रकार देखील बिनदिक्कत सुरू आहे.
नियमानुसार जीवाला धोका असल्याचे कारण देत कोणी पोलीस संरक्षण मागितले तर अशांना पोलीस संरक्षण देतात. या बदल्यात संबंधित व्यक्तींना विशिष्ट रक्कम सरकारी तिजोरीत जमा करावी लागते. मात्र काही पोलीस कोणी संरक्षण मागितल्यास परस्पर स्वतःच्या खासगी सिक्युरिटी एजन्सीमार्फत बॉडीगार्ड पुरवत आहेत.
ही सेवा व्यवस्थित सुरू राहावी यासाठी संरक्षण (प्रोटेक्शन) विभागातील विशिष्ट पोलीस अधिका-यांच्या अनेक वर्षे बदल्याच करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पोलीस दलातले खासगी एजन्सीवाले अनेक वर्षे आपले रॅकेट आरामात चालवत आहेत.
मागील १३ वर्षापासून मुंबई पोलीस दलाच्या संरक्षण (प्रोटेक्शन) विभागात कार्यरत असलेल्या आणि खासगी सिक्युरिटी रॅकेट चालवणा-या इन्स्पेक्टर स्वीव्ह अँथनी यांची बदली झालेली नव्हती. त्यांचे रॅकेट उघडकीस येताच मुंबईच पोलीस आयुक्त अरुप पटनायक यांनी तडकाफडकी अँथनी यांची आझाद मैदान पोलीस स्टेशनला बदली केली. पोलिसांच्या संरक्षण (प्रोटेक्शन) विभागातील इन्स्पेक्टर सचिन गावडे हे गेले एक तप याच विभागात होते. त्यांना देखील मुंबईबाहेर हलवण्यात आले आहे.
राजधानी जगते स्फोटांच्या टांगत्या तलवारीखाली! नवी दिल्ली - दिल्ली उच्च न्यायालयाबाहेर आज (बुधवार) झालेल्या स्फोटामध्ये 11 ठार तर सुमारे 50 जण जखमी झाले. भारताच्या राजधानीवर गेल्या काही वर्षांपासून सतत दहशतवादी हल्ले चालू असून गेल्या 14 वर्षांमध्ये दिल्लीवर 16 दहशतवादी हल्ले झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेक जणांना प्राण गमवावा लागला असून शेकडो जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यांची यादी खाली दिलेली आहे. २५ मे २०११ - दिल्ली उच्च न्यायालयाबाहेरील वाहनतळामध्ये स्फोट २७ सप्टेंबर, २००८ - कुतूबमिनारजवळील मेहरौली फुलांच्या बाजारामध्ये स्फोट - तीन ठार, २७ जखमी १३ सप्टेंबर, २००८ - बॉंबस्फोटांची मालिका. यामध्ये एकूण पाच ठिकाणी स्फोट करण्यात आले - २५ ठार, १०० हून अधिक जखमी १४ एप्रिल, २००६ - जामा मशिदीजवळ दोन स्फोट - १४ जखमी २९ ऑक्टोबर, २००५ - सरोजिनी नगर, पहाडगंज आणि गोविंदपुरी येथे तीन स्फोट - ५९ ठार, १०० हून अधिक जखमी २२ मे, २००५ - दोन चित्रपटगृहांमध्ये स्फोट - एक ठार, ६० हून अधिक जखमी १८ जून, २००० - लाल किल्ल्यावळ दोन शक्तीशाली बॉंबस्फोट - दोन ठार, १५ जखमी २६ जुलै, १९९८ - काश्मीरी गेट येथे बसमध्ये स्फोट - दोन ठार, तीन जखमी ३० डिसेंबर, १९९७ - पंजाबी बाग येथे एका बसमध्ये स्फोट - ४ ठार, ३० हून अधिक जखमी ३० नोव्हेंबर, १९९७ - लाल किल्ल्याजवळ दोन स्फोट - तीन ठार, ७० हून अधिक जखमी २६ ऑक्टोबर, १९९७ - करोल बाग बाजाराजवळ दोन स्फोट - एक ठार, ३४ जखमी १८ ऑक्टोबर, १९९७ -राणीबाग बाजारामध्ये स्फोट - एक ठार, २३ जखमी १० ऑक्टोबर, १९९७ - शांतीवन, कौरिया पुल आणि सदर बाजार येथे तीन स्फोट - एक ठार, १६ जखमी १ ऑक्टोबर, १९९७ - सदर बाजार येथे स्फोट- ३० हून अधिक जखमी ९ जानेवारी, १९९७ - दिल्ली पोलिस मुख्यालयासमोर स्फोट - ५० हून अधिक जखमी

No comments:
Post a Comment