Total Pageviews

Thursday, 8 September 2011

CORRUPTION MUMBAI POLICE

बेइमानीची नवी हद्द
राजधानी स्फोटांनी हादरली आहे. मुंबईत १३ जुलैला झालेल्या स्फोटांचा आजही निर्णायक तपास नाही. अशावेळी मुंबई पोलिस ांच्या बंदोबस्त संरक्षण शाखेतील भ्रष्टाचार उघड व्हावा, ही लाज आणणारी बाब आहे.
या शाखेतील काही हवालदार परस्पर बड्यांच्या संरक्षणासाठी लावले जातात आणि त्या बदल्यात वसूल होणारा पैसा मात्र अधिकाऱ्यांच्या खिशात जातो. हा प्रकार दीर्घकाळ चालू आहे. त्यासाठीच काही अधिकारी १२-१२ वषेर् या शाखेत तळ ठोकून बसलेत का? आता मुंबईचे पोलिस आयुक्त अरुप पटनायक यांनी दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. परंतु केवळ बदल्यांनी हे भागणारे नाही. पोलिसांना सरकारी नोकरी सोडून खासगी चाकरी करायला लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करायला हवी. काही दिवसांपूर्वी, पुढारी तसेच इतरांच्या बंदोबस्तात वाढत्या संख्येने कसे पोलिस अडकत आहेत, याचा तपशील जाहीर झाला.
शहराचे संरक्षण आणि गुन्ह्यांचा तपास ही मुख्य कामे सोडून नेत्यांची मिजास वाढवण्यासाठी त्यांच्या पुढे-मागे पोलिसांना पळायला लावणे, हे चूकच आहे. मात्र, पोलिस अधिकारी स्वत: संरक्षणाचे असे रॅकेट चालवत असतील तर ते अक्षम्य आहे. त्यांना अद्दलच घडवायला हवी. कारण हा नि:शस्त्र सामान्य नागरिकांशी दोह आहे. मुंबईवर हल्ले झाल्यापासून संरक्षणाची पुरेशी साधने, पैसे मिळावेत, यासाठी केंद सरकार दक्ष आहे. पण ती जनहितासाठी वापरली जातात का? कारण पोलिसी कुत्र्यांना प्रशिक्षण द्यायचे; तिथे खासगी कुत्र्यांना शिकवून ती बाहेर मॉलच्या संरक्षणासाठी देण्याचा उद्योगही उघड झाला आहे. कुत्र्यांना शिकवण्याचे हे काम बॉम्बशोधक पथकांकडे आहे. गोरेगाव प्रशिक्षण केंदावर पोलिस अधिकाऱ्याच्या मालकीची अशी आठ कुत्री सापडली. या खासगी कुत्र्यांची बडदास्त ठेवताना सरकारी कुत्र्यांना उपाशी ठेवले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाहणीत अनेक 'सरकारी कुत्री' अशक्त आढळली. स्फोटके हुंगून स्वत:चे आयुष्य कमी करून घेणाऱ्या या मुक्या प्राण्यांना असे उपाशी ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पोलिस दलातून हाकलून दिले पाहिजे. दहशतीची वाढती भीती म्हणजे पाठोपाठ मिळणारी जास्त साधनसंपत्ती. तिला असे पाय फुटणार असतील तर दहशतवाद्यांना वेगळी काय मदत करायला हवी

No comments:

Post a Comment