Total Pageviews

Saturday, 10 September 2011

इशारे आणि फतवे काढण्यापलीकडे चिदंबरम यांनी काय केले?
राम प्रधान यांचा सवाल

मुंबई : दहशतवादी बॉम्बस्फोट घडवतील असा इशारा जुलैमध्येच दिला होता असे गृहमंत्री पी. चिदंबरम सांगतात, पण असे फतवे काढण्यापलीकडे त्यांनी काय काम केले, कोणती ठोस उपाययोजना केली असा सवाल मुंबई हल्ल्यानंतर नेमलेल्या प्रधान समितीचे अध्यक्ष राम प्रधान यांनी केला. एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रधान म्हणाले, देशात वारंवार दहशतवादी हल्ले होऊनही सरकारला जाग येत नाही याचे मोठे आश्‍चर्य आहे. दिल्ली ही देशाची राजधानी आहे. पण तिथेही सरकारने पोलिसांना तांत्रिक सुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाहीत. या कमकुवत यंत्रणेचा अतिरेक्यांनी पुरेपूर फायदा उठवला आहे आता पोलिसांचा चाचपडत तपास सुरू आहे. अतिरेकी दिशाभूल करून पोलिसांना इथून तिथे पळवत आहेत हे चित्र फारच विदारक आहे

No comments:

Post a Comment