Total Pageviews

Sunday, 11 September 2011

MINING MAFIA ANDHRA PRADESH

माफियागिरीचा उत्तम नमुना
किरण शेलार
माफिया कुटुंबाचा एक भयंकर नियम म्हणजे जोपर्यंत तुम्ही टोळीचे सदस्य असता तोपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे मानमरातब मिळतात. मात्र जेव्हा तुम्ही या टोळीचे रहात नाही. तेव्हा संपूर्ण वेळीचे एकच लक्ष्य असते ते म्हणजे अशा सदस्याचा खातमा. कॉंग्रेसने सध्या आंध्रमध्ये हेच चालविले आहे. जगनमोहनबरोबरच्या नजिकच्या लढाईमध्ये कॉंग्रेस जिंकल्याचे चित्र असले तरी दीर्घकालीन लढाईमध्ये तेलंगणा उर्वरित आंध्रप्रदेशात कॉग्रेसच्या जनाधारावर मोठा परिणाम होईल, असा स्पष्ट संकेत या घटनाक्रमातून मिळत आहे. आतला माणूस बाहेरचा झाला की त्याला संपविण्याचे माफिया राजकारण कॉंग्रेसला आंध्रप्रदेशात बुडविणार हे मात्र नक्की.माफियांचे जग मोठे विलक्षण असते. त्यांच्या सूत्रबद्धपणे चालणाऱ्या टोळ्या, व्यवस्थित प्रशिक्षित केलेली माणसे, त्यांचे संदेशवहन, वेळच्या वेळी पूर्ण केली जाणारी कामे आणि ती केल्यास मिळणारी कठोर शिक्षा. माफियांच्या जगतातील अजून एक विलक्षण गोष्ट म्हणजे त्यांची टोळी. ही टोळी एखाद्या मोठ्या कुटुंबाप्रमाणे काम करते. माफियांचे सर्व यशापयश या टोळीच्या रचनेवरच आधारित असते. मात्र या कुटुंबाचा एक भयंकर नियम म्हणजे जोपर्यंत तुम्ही टोळीचे सदस्य असता तोपर्यंत तुम्हाला सर्व प्रकारचे मानमरातब मिळतात. तुमच्या कामानुसार तुम्हाला टोळीतल्या विशिष्ट स्तरामध्ये स्थान मिळते. मात्र जेव्हा तुम्ही या टोळीचे रहात नाहीत तेव्हा संपूर्ण टोळीचे एकच लक्ष्य असते, ते म्हणजे अशा सदस्याचा खातमा. इटली जवळच्या सिसिलियन नावाच्या भागात जगातील सर्वात भयंकर माफिया जन्मले आहेत. इटालियन माफियांच्या गोष्टी वाचू लागलो की, माफिया निरनिराळे असले तरी टोळी बाहेर गेलेल्या सदस्याच्या बाबतचा नियम मात्र एकच असल्याचे दिसून येते. सोनिया गांधी सर्र्वेसर्वा असलेल्या "इंडियन नॅशनल कॉंग्रेस'मध्ये ही इटालियन माफिया संस्कृती आता शिरू लागली आहे की काय? असा प्रश्न जगन रेड्डी प्रकरण पाहिल्यावर पडतो. सोनिया गांधींच्या गळ्यातले ताईत असलेल्या राजशेखर रेड्डी उर्फ वायएसआर यांच्या चिरंजीवांना तुरुंगात पाठविण्याची संपूर्ण तयारी कॉंग्रेने केली आहे.भ्रष्टाचार, बेहिशेबी मालमत्ता जमवणे, काळा पैसा असे अनेक आरोप जगन रेड्डी यांच्यावर लावण्यात आले आहेत. खरे तर हा पैसा एकट्या जगन रेड्डी यांनी गेल्या दोन वर्षात कमावलेला नाही. वायएसआर मुख्यमंत्री असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारातूनच ही माया जमविण्यात आली. यात केवळ जगन दोषी नाही. मात्र जोपर्यंत हे पिता-पुत्र कॉंग्रेसच्या पदरात होते तोपर्यंत ते पवित्र होते. आता मात्र कॉंग्रेस हायकमांडच्या विरोधात सूर आळवू लागलेले जगन रेड्डी अचानक कॉंग्रेस सीबीआयच्या दृष्टीने भ्रष्ट झाले आहेत. वायएसआरचा हा राजकीय वारसदार आता कॉंग"ेसला शरण जातो की संघर्ष करतो हे पहावे लागेल.
"
वायएसआर सुरुवातीच्या काळापासून कॉंग्रेसशी संबंधित आहेत. आंध्रच्या राजकारणात अनेक नाट्यमय घटना घडूनसुद्धा त्यांनी कॉंग्रेसची साथ सोडली नाही. एनटी रामाराव यांचा उदय-अस्त, तेलगू देसमची पिछेहाट या सर्व घटनाक्रमात वायएसआर कॉंग्रेसमध्येच राहिले. राज्यात कॉंग्रेसची सत्ता असताना सर्वप्रथम 1980 साली ग्रामविकास मंत्री नंतर महसूल, शिक्षण अशा खात्यांचे मंत्रीपद त्यांच्या वाट्याला आले. चंद्राबाबू नायडू आंध्रचे मुख्यमंत्री असताना वायएसआर आंध्रचे विरोधी पक्षनेते होते. 2004 साली पहिली निवडणूक जिंकल्यानंतर अल्पावधीतच वायएसआर आपल्या कामाच्या पद्धतीमुळे लोकप्रिय झाले. या लोकप्रियतेचा फायदा त्यांना 2009 साली पुन्हा निवडणुका जिंकण्यासाठी झाला. पूर्ण बहुमत आणि लोकप्रियता यामुळे वायएसआर यांचा घोडा वेगात होता. दुर्दैवाने 2 सप्टेंबर 2009 साली राजशेखर रेड्डी यांचे रुद्रकोंडा जंगलाजवळ अपघाती निधन झाले. रेड्डी यांचे हेलिकॉप्टर कोसळून त्यात त्यांच्यासोबत आंध्रचे मुख्य सचिव .एस्‌.सी. वेस्ली यांचेही निधन झाले. राजशेखर रेड्डी हे कॉंग्रेसच्या ख्यातनाम मुख्यमंत्र्यापैकी एक असलेल्या आणि आंध्रला हायटेक करण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या चंद्राबाबू नायडूंना पराजित करून निवडून आलेले. साहजिक कॉंग्रेसच्या दिल्ली वर्तृळात वायएसआरना मोठे महत्त्व प्राप्त झाले. राजशेखर रेड्डी हे नाव जरी हिंदू वाटत असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांनी ख्रिश्र्चन धर्म स्वीकारला होता. राहुल विन्सी, सोनिया मायनो या श्रेणीला खूश करणार्‍या अन्य धर्मांतरित कॉंग्रेस नेत्यांच्या पंक्तीमध्ये वायएसआर सहज जाऊन बसले. दिल्लीत त्यांचा दबदबा इतका होता की, आपल्या परिवारातील अनेकांना त्यांनी राज्याच्या राजकारणात महत्त्वाची पदे दिली.
2004
साली वायएसआर सर्वप्रथम राज्याचे मुख्यमंत्री झाले. दुसर्‍यादा मुख्यमंत्री झाल्यावर मात्र त्यांनी ख्रिश्र्चन अजेंडा राबविण्यास सुरुवात केल्याच्या चर्चांना जोर आला. वायएसआर ख्रिश्र्चन मिशनरी त्यांच्या समर्थकांना साहाय्यभूत होत असल्याचे अनेक आरोपही यावेळी करण्यात आले. 2005 साली तिरुपती देवस्थानाच्या संपत्तीचे व्यवस्थापन करण्यासाठी आरजीबी वेल्थ मॅनेजमेंट कंपनीला पाचारण करण्याचे काम वायएसआरनी केले. आरजीबीचे मालक जी.बी. मॅथ्यू हे धर्मांतरणाचे काम करणाऱ्या विविध संस्थांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते. पुढे वेंकटेश्र्वरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स या मंदिरामार्फत चालणाऱ्या वैद्यकीय संस्थेला डॉ.के.एम्‌. चेरियन हार्ट फाऊंडेशनशी जोडले. यावेळीही वायएसआरच्या या निर्णयाबाबत शंका व्यक्त करण्यात आली. याचे मु" कारण म्हणजे सेवाकार्याच्या आडून धर्मप्रसाराचे काम करणाऱ्या मद्रास मेडिकल मिशनचे डॉ. चेरियन हे प्रमुख होते. वायएसआर स्वत: या दोन संस्थांनी एकत्रितपणे चालवलेल्या उपक"मांना उपस्थित रहात होते. मुख्यमंत्री म्हणून हयात असतानाही वायएसआर यांच्यावर भ्रष्टाचाराचे भरपूर आरोप होते. ज्या ज्या कंपन्यांना आंध्र प्रदेशात कामे हवी आहेत त्यांनी वायएसआर यांच्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली पाहिजे, असा अलिखित नियम वायएसआरने आंध्र प्रदेशामध्ये घालून दिला होता. ज्या प्रमाणात कंपन्यांना आंध्रमध्ये कंत्राटे मिळत त्या प्रमाणात वायएसआरच्या कंपनीमध्ये ही मंडळी आर्थिक गुंतवणूक करीत. अशा प्रकारे वायएसआरने मोठ्या प्रमाणावर माया गोळा केली. अर्थात केंद्रातील कॉंग्रेस सोनिया गांधी यांचा योवळी वायएसआर यांना पूर्ण पाठिंबा होता. कॉंग्रेससमोरचा खरा पेच वायएसआर यांच्या जाण्यामुळे निर्माण झाला. जगनमोहन रेड्डीच वारस
वायएसआर यांच्या अकाली निधनामुळे आंध्रमधला राजकीय चेहरा कॉंग्रेसने गमावला. मात्र बहुमत असल्याने कॉंग्रेस राज्याच्या राजकारणात अडचणीत आली नाही. मात्र वायएसआर यांच्या निधनानंतर काही काळातच वायएसआर समर्थकांनी वायएसआर यांचे चिरंजीव जगनमोहन रेड्डी यांना आंध्रप्रदेशचा मुख्यमंत्री करण्याची मागणी केली. अर्थात यामागे जगन आणि वायएसआर समर्थक होतेच; परंतु कॉंग्रेसने या मागणीला स्पष्ट नकार देत आंध्रप्रदेशातील कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते रोसय्या यांना मुख्यमंत्रीपदी नेमले. रोसय्यांना वायएसआर समर्थक आमदारांनी पाठिंबा देणे हे जवळजवळ अशक्य होते. मात्र काळजीवाहू म्हणून मुख्यमंत्रीपदावर आरूढ झालेले रोसय्या फार काळ चालणार नाही याची जाणीव कॉंग्रेसला नक्कीच होती. आंध्रमध्ये पुढे रोसय्यांच्या विरोधात बंडखोरीची भाषा वापरली जाऊ लागली. स्वतंत्र तेलंगणाचे राजकारण जोरात असताना मुख्यमंत्रीपद पेचात टाकणे कॉंग्रेस हायकमांडला सोईचे नव्हते. जगन यांना मुख्यमंत्री करणे मात्र कॉंग्रेसला कधीच मान्य नव्हते. ज्या प्रकारचा पवित्र रेड्डीसमर्थक आमदारांनी घेतला, ते मान्य करून हायकमांडने जगनसमोर झुकल्याचे चित्र यामुळे निमार्र्ण झाले असते. कॉंग्रेसला कोणत्याही परिस्थितीमध्ये झुकल्याचा संदेश द्यायचा नव्हता. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वायएसआर समर्थक आमदारांनी रोसय्यांना हटविण्यासाठी जोरदार मागणी केली. अनेक आमदारांनी राजीनामा देण्याची भाषाही केली. "रोसय्यांना बदलून जगनमोहन यांना मुख्यमंत्री करा,' असा अप्रत्यक्ष संदेश या सगळ्या कारवायांमागे होता. जगनमोहन यांच्या राजकारणाला काटशह म्हणून कॉंग्रेसने नल्लारी किरण कुमार रेड्डी यांना मुख्ययमंत्रीपदी आणले. किरण कुमार रेड्डी हे वायएसआरचे अत्यंत जवळचे मानले जात. वायएसआरनी त्यांना आंध" विधानसभेचे अध्यक्षपद दिले होते. आमदारांकडून राजीनामा देण्याच्या माध्यामातून दबाव आणण्याचे प्रयत्न होत असतानाच हा निराळेच निणर्र्य कॉंग्रेस हायकमांडने घेतला आणि आंध्रमधले बंड काहीसे थंड झाले. दरम्यान जगनमोहन रेड्डी यांचे बंड थंड झाले असले तरी मुख्यमंत्री होण्याची महत्त्वाकांक्षा जगनमोहनना आजही शांत बसू देत नाही. वायएसआर गेल्यानंतर जगनमोहनने आंध"मधल्या प्रत्येक जिल्ह्यात जाऊन सभा घेण्याचा प्रयत्न केला. "ओदारपू यात्रा' असे नाव त्याने या यात्रेला दिले. वायएसआर यांच्या अकाली जाण्याने आपल्याला लोकांची पूर्ण सहानुभूती मिळेल, असा त्याचा अंदाज होता. काही प्रमाणात या अंदाजाला अर्थही आहे. दिल्लीतील हायकमांडला मात्र जगनमोहनच्या या महत्त्वाकांक्षेने घोर लावला. ही यात्रा थांबवावी म्हणून कॉंग्रेसने जगनमोहनला बजावले. मात्र जगनमोहनने हा आदेश सपशेल धुडकावला. वायएसआर समर्थक आमदार पक्षात राहून दबाव टाकण्याचे काम करीतच होते. यालाच समकक्ष कारवाई म्हणून जगनमोहन यांनी वायएसआर कॉंग्रेस पार्टीची स्थापना केली. जगनमोहन बाहेर गेल्यामुळे कॉंग्रेसची डोकेदुखी संपेल अशी कॉंग्रेस हायकमांडची अपेक्षा होती. जगनमोहन आता पक्षाबाहेरचे झाल्यामुळे जगनमोहन रेड्डी यांनी जमा केलेल्या बेहिशेबी मालमत्तेचे हिशेब लावले जाऊ लागले. ही चर्चा हळूहळू गुन्हा दाखल करण्यापर्यंत जाऊन पोहोचली. अखेर केंद्र सरकारने आपले राजकीय अस्त्र वापरले आणि सीबीआयला जगनमोहन यांच्या मागे लावून दिले. खरे तर ही मालमत्ता एकट्या जगनमोहननी गोळा केलेली नाही, हे सगळ्यांना माहीत आहे. अखेर सीबीआयला वायएसआरचे नावही खटल्यात घ्यावे लागले. वायएसआरचे नाव खटल्यामध्ये येताच वायएसआर समर्थक 24 आमदारांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. ही मंडळी कॉंग्रेस सोडणार का? जगनमोहनच्या वायएसआर कॉंग्रेसमध्ये सहभागी होणार का? या आणि अशा अनेक प्रश्नांनी कॉंग्रेस सध्या बेजार आहे. राजकीय परिपक्वतान दाखविता टोळीबाहेर गेलेल्याला संपविण्याच्या माफिया कार्यपद्धतीने कॉंग्रेसची डोकेदुखी वाढविली आहे.चिरंजीवीचा आधार
वायएसआर समर्थक पक्षातून बाहेर पडले तरी त्यामुळे कॉंग्रेसचे नुकसान होणार नाही याची काळजी कॉंग्रेसने घेतली आहे. तेलगू चित्रपट अभिनेता चिंरजीवी याने आपला "प्रजाराज्यम' हा पक्ष कॉंग्रेसमध्ये विलीन केला आहे. चिरंजीवीकडे आज 18 आमदार आहेत. 150 आमदार निवडून आणून राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर आरूढ होण्याची चिरंजीवी यांची मनिषा होती. मात्र जनमताचा कौल काहीसा निराळाच निघाला. 18 आमदार घेऊन विरोधी पक्षात बसण्यापेक्षा चिरंजीवीने कॉंग्रेसमध्ये येणे पसंत केले. या शिवाय "मजलीसे इत्तेहादुल मुसूलमीन' या पक्षाचे सात आमदार कॉंग्रेसबरोबर आहेत. जगनमोहनबरोबरच्या नजिकच्या लढाईमध्ये कॉंग्रेस जिंकल्याचे चित्र असले तरी दीर्घकालीन लढाईमध्ये तेलंगणा उर्वरित आंध्र प्रदेशात कॉंग्रेसच्या जनाधारावर मोठा परिणाम होईल असा स्पष्ट संकेत या घटनाक्रमातून मिळतो आहे. आतला माणूस बाहेरचा झाला की त्याला संपविण्याचे माफिया राजकारण कॉंग्रेसला आंध्रप्रदेशात बुडविणार हे मात्र नक्की
वायएसआरचा' उदय

No comments:

Post a Comment