Total Pageviews

Thursday, 20 October 2011

WASTING GOVT MONEY ON HARE BRAINED SCHEMES

मुंबईत पाच सहस्त्र सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याचा शासनाचा निर्णय

मुंबई, २० ऑक्टोबर - मुंबईवर वारंवार होणार्‍या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये सीसीटीव्ही छायाचित्रक बसविण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाने घेतला. संपूर्ण मुंबईत ठिकठिकाणी ५ सहस्त्र छायाचित्रक बसविण्यात येणार असून त्यासाठी ६०० कोटी रुपयांच्या खर्चास मंत्रिमंडळाने तत्त्वतः मान्यता दिली.
(आतंकवादावर ठोस उपाययोजना करण्याच्या ऐवजी छायचित्रक बसवण्यासारख्या उपाययोजना करून काय उपयोग ? छायाचित्रक बाँबस्फोट होतांना ते टिपतील किंवा टिपणार नाहीत. बाँबस्फोट होऊच नयेत म्हणून उपाययोजना करणे आवश्यक आहे. - )
मुंबईतील बाँबस्फोट मालिकेनंतर मुंबईतील सीसीटीव्ही छायाचित्रकांचे सूत्र ऐरणीवर आले होते. याविषयी शासनाने मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली उच्चाधिकार समिती नेमून याविषयीचे सर्वाधिकार समितीला दिले. त्यानंतर शासन आणि मुख्य सचिव स्तरावर चर्चेच्या अनेक फेर्‍या झाल्या. सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्याबाबत ‘मुंबई फर्स्ट' या स्वयंसेवी संस्थेने विशेष पुढाकार घेतला होता. सीसीटीव्ही छायाचित्रक बसविण्यासाठी सिमेन्स, सस्को या आस्थापनांनी रस दाखवला होता. तसेच इंग्लंड आणि इस्त्रायलची आस्थापनेही या स्पर्धेत होती. सीसीटीव्ही छायाचित्रकांचे तंत्रज्ञान अभ्यासण्यासाठी गृहमंत्री पाटील यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सप्टेंबरच्या अखेरीस लंडनचा दौराही केला. इतक्या मोठ्या प्रवासानंतर सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्यावर आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे समजते. पहिल्या टप्प्यात छायाचित्रक बसविण्यासाठी संवेदनशील ठिकाणे ठरवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्तांवर दायित्व देण्यात आले आहे. गर्दीची ठिकाणे, वाहतूककोंडीची ठिकाणे, प्रार्थनास्थळे आणि मंदिरे, रेल्वेस्थानके, बसस्थानके अशा ठिकाणी प्राधान्याने सीसीटीव्ही छायाचित्रक बसवण्यात येतील

No comments:

Post a Comment