गडचिरोलीत पोलिस-नक्षली चकमक 02 OCT 20330 PM
गडचिरोली जिल्ह्यात ग्यारापत्ती- कोटगुल मार्गावर नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या सुरूंगस्फोटातून सीआरपीएफचे पोलिस थोडक्यात बचावले. मात्र यानंतर नक्षलवाद्यांनी केलेल्या गोळीबारात दोन पोलिस जखमी झाले. चकमकीत तीन नक्षलवादीही जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कुरखेडा पोलिस उपविभागांतर्गत येत असलेल्या ग्यारापत्ती पोलिस स्टेशनमध्ये तैनात केंदीय राखीव पोलिस दलाचे जवान रविवारी पहाटे तीन वाजल्याच्या सुमारास वाहनांच्या ताफ्यासह शोधमोहिमेवर निघाले होते. हा ताफा भीमनकोजी गावाजवळच्या जंगलात येताच रस्त्याच्या दोन्ही बाजूला दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी सुरूंग स्फोट घडवून आणला. यात एकही पोलिस वाहन सापडले नाही. मात्र या स्फोटानंतर सावध झालेल्या पोलिसांनी लगेच नक्षलवाद्यांवर गोळीबार सुरू केला. नक्षलवाद्यांनी प्रत्युत्तर देत पोलिसांवर गोळीबार केला. यानंतर नक्षलवादी जंगलात पळून गेले. या चकमकीत ओककुमार पांडे (४१) आणि विमलकुमार (३५) हे जवान जखमी झाले. जखमींना तातडीने कुरखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंदात उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचार केल्यानंतर हेलिकॉप्टरने त्यांना गडचिरोली जिल्हा हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. तिथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. यावेळी सी- ६० व सीआरपीएफच्या जवानांनी घटनास्थळाची पाहणी केली असता तिथे रक्तांचा सडा दिसला. ग्रेनेड व क्लेमर माईन मिळाले. पोलिसांनी या सर्व वस्तू जप्त केल्या आहेत. दरम्यान या चकमकीत तीन नक्षलवादी गंभीर जखमी झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे

No comments:
Post a Comment