Total Pageviews

Wednesday, 26 October 2011

policing for vip only

मुंबई। दि. २६ (प्रतिनिधी)
केवळ श्रीमंतांच्या सुरक्षेची काळजी करण्यासोबत सामान्यांच्या सुरक्षेकडेही लक्ष द्या, असे उच्च न्यायालयाने आज पोलिसांना सुनावले.
याप्रकरणी कालिना येथील तुलसीदास नायर यांनी याचिका केली आहे. सुंदर नगरमधील घरात आपल्याला काही गुंड जाऊ देत नाहीत. या गुंडांनी माझ्या बहिणीला गेले दहा दिवस या घरात डांबून ठेवले आहे. गुंडांनी माझी गाडी देखील फोडली, असे आरोप याचिकेत करण्यात आले आहेत. तसेच वाकोला पोलीस याबाबत काहीच करीत नसल्याने न्यायालयाने या गुंडांवर कारवाई करण्याचे आदेश द्यावेत व आपल्याला घरात प्रवेश मिळावा, अशी मागणी नायर यांनी याचिकेत केली आहे.
याची दखल घेत न्यायालयाने कोर्ट रीसिव्हरला नायर यांच्या
घराची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. सुट्टीकालीन न्या. शारूख काथावाला यांच्यासमोर या
याचिकेवर आज सुनावणी झाली. त्यात वाकोला विभागाचे एसीपी देखील हजर होते.
कोर्ट रीसिव्हरने आपला अहवाल न्यायालयात सादर केला. त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने पोलिसांना वरील खडे बोल सुनावले. तसेच नायर यांना तत्काळ त्यांच्या घरात घेऊन जावे, असे आदेश न्यायालयाने दिले. यावरील पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे

No comments:

Post a Comment