Total Pageviews

Monday, 10 October 2011

NAXAL EXTORTION IN MINING INDUSTRY

नक्षलवाद्यांमुळे खाण उद्योग संकटात स्मृती सागरिका कानुनगो भारताच्या खाण उद्योगाचा आत्मा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ओडिशा, छत्तीसगड आणि झारखंड या तीन राज्यांत खाण उद्योगाच्या कर्मचाऱ्यांवर नक्षलवाद्यांकडून होणाऱ्या वाढत्या हल्ल्यांमुळे या उद्योगाच्या विकासाला खीळ बसते की काय, अशी भीती व्यक्त होते आहे. गेल्या काही वर्षांत आंध्र प्रदेश, महाराष्ट्रासह वरील राज्यांतील पायाभूत सुविधांची ठिकाणे, ऊर्जा केंद्रे, महत्त्वाची साधनसंपत्ती केंद्रे नक्षलवाद्यांचे लक्ष्य ठरत आहेत. त्यातही खाण उद्योगाला लक्ष्य करण्यामागे देशाच्या अर्थव्यवस्थेला हादरा देण्याचा नक्षलवाद्यांचा हेतू स्पष्ट आहे. 2009 अखेर दहा राज्यांतील 182 जिल्ह्यांतील 40 टक्के भूभाग नक्षलवाद्यांच्या कारवायांनी ग्रस्त झाल्याचे उघडकीस आले आहे. रेड कॉरिडॉर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 92 हजार चौरस किलोमीटर पट्ट्यावर नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. नाल्कोच्या दामनजोडीमधील बॉक्‍साईट खाणीच्या सुरक्षेसाठी नेमलेल्या सुरक्षा दलाच्या 11 जवानांची एप्रिल 2009 मध्ये हत्या करण्यात आली. खाणकामासाठी वापरले जाणारे आरडीएक्‍सही नक्षलवादी चोरून नेतात, असे आढळून आले आहे. नाल्कोच्या उत्पादनावर परिणाम झाल्याने दहा हजार टन उत्पादनाची हानीही सोसावी लागली. ग्रामीण भागातील गरिबांचा पाठिंबा असल्याचा दावा नक्षलवादी करत आहेत. प्रत्यक्षात मात्र त्यांचा लढा येथील लोकशाही व्यवस्थेच्या विरोधात आहे. जमिनींबाबतचे हक्क आणि रोजगारासाठी आपण लढत असल्याचे माओवादी आणि नक्षलवाद्यांचे म्हणणे आहे. शेतमजुरांच्या प्रश्‍नांकडे केंद्र आणि राज्य सरकार फारसे लक्ष देत नसल्याचे नक्षलवाद्यांचे म्हणणे असले, तरी व्यापक पातळीवर दोन्ही सरकारांकडून आता प्रयत्न होत आहेत. त्यामुळे निराश झालेल्या नक्षलवाद्यांकडून महिला, मुले यांना लक्ष्य केले जात आहे. शाळांच्या इमारती स्फोट घडवून उडविल्या जात आहेत. औद्योगिक वापरासाठी असलेले आरडीएक्‍स नक्षलवाद्यांच्या हाती पडणे ही गंभीर बाब असल्याचे माहीतगार सूत्रांनी सांगितले. सरकारने वेळेवर कारवाई केल्यास खाणउद्योगच संकटात सापडण्याची भीती आहे. माओवादी कम्युनिस्ट सेंटर आणि पीपल्स वॉर ग्रुपचा पूर्व भागात प्रभाव वाढवीत असल्याचेही आढळून आले आहे

No comments:

Post a Comment