Total Pageviews

Wednesday, 26 October 2011

CHINA MILITARY BASES IN PAKISTAN TO FIGHT TERRORISM IN CHINA

इस्लामाबाद - स्वतंत्र राज्याची मागणी करीत झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घालणा-या इस्लामी दहशतवादाला लगाम घालण्यासाठी पाकिस्तानच्या उत्तरेला वझिरीस्तान प्रांतात चीनने लष्करी तळ उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पाकमध्ये लष्करी तळ उभारून भारत आणि अमेरिकेला परस्पर शह देण्याच्या हालचाली चीनने सुरू केल्या आहेत.
पाकिस्तानच्या न्यूज या दैनिकात यासंबंधी एक वृत्तांत प्रकाशित झाला आहे. यात चीन आणि पाकिस्तानमधील जवळीकीवर सविस्तर तपशील देण्यात आला आहे. अल-कायदाशी लागेबांधे असलेल्या इस्ट तुर्कस्तान इस्लामी चळवळ (इटीआयएम) संघटनेच्या कारवायांनी चीनच्या झिजीयांग प्रांतात धुमाकूळ घातला आहे. संघटनेने स्वतंत्र इस्लामी राज्याची मागणी केली असून त्यांना पाकिस्तानातील आदिवासी भागात दहशतवादाचे प्रशिक्षण दिले जाते, असा चीनला दाट संशय आहे. झिजीयांग शहरातील काशगर भागात 30 31 जुलै रोजी दोन बॉम्बस्फोट झाले होते. यात 18 चिनी नागरिक ठार झाले होते. या स्फोटांमागे इटीआयएम संघटनेचा हात असून त्याला पाकिस्तानच्या उत्तर वझिरीस्तानात प्रशिक्षण देण्यात आल्याचा आरोप चीनने केला होता. त्यामुळेच चीनने उत्तर वझिरीस्तान प्रांतात तळ उभारण्यासाठी पाकिस्तानकडे लकडा लावला आहे. याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून उभय देशांच्या राजकीय आणि लष्करी अधिका-यांच्याही एकमेकांच्या देशात दौरे सुरू आहेत. परराष्ट्रमंत्री हिना रब्बानी-खार, राष्ट्राध्यक्ष असिफ अली झरदारी, आयएसआय प्रमुख लेफ्टनंट जनरल अहेमद शुजा पाशा यांनी चीनला भेट दिली होती, तर चीनचे उपपंतप्रधान मेंग जिआन्झू यांनीही पाकला भेट दिली होती. अमेरिकेप्रमाणेच पाकिस्तानातील आदिवासी पट्ट्यात चीनचाही लष्करी तळ असल्यास दहशतवादी कारवायांना आळा घालणे सोपे जाईल, असे चीनला वाटते.
भारताला शह देण्याचे डावपेच पाकव्याप्त काश्मीरसह पाकिस्तानात तेलाची नवी पाइपलाइन, रेल्वेमार्गाचे जाळे, नौदल आणि लष्करी तळ उभारून हे दोन्ही देशांचे भारत आणि अमेरिकेला परस्पर शह देण्याचे कटकारस्थान आहे. चीन-पाकचे हे लागेबांधे भारतासाठी धोक्याचा इशारा असल्याचे एका तज्ज्ञाचे म्हणणे आहे. या तज्ज्ञाने आपले नाव जाहीर केले नाही.
गदर प्रांतात नौदलाचा तळ लादेनवरील अमेरिकेच्या कारवाईनंतर पाकने चीनशी जवळीक वाढवली आहे. पाकच्या गदर बंदरात चीनने नौदलाचा तळ उभारावा, असे 21 मे रोजी संरक्षणमंत्री अहमद मुख्तार म्हणाले होते. भारतीय नौदलास शह देण्यासाठी पाकिस्तानचे हे डावपेच असून चीनलाही तेच हवे आहे. पाकमध्ये लष्करी तळ उभारण्याची सुरुवात नौदल तळाच्या रूपाने करण्याचा चीनचा डाव आहे, असेही या वृत्तात म्हटले आहे.-
-

No comments:

Post a Comment