भारताच्या ईशान्येकडील सात राज्यांपैकी एक असणार्या मणीपूरमध्ये गेले दोन महिने येथील कुकी आदिवासी समाजाने वेगळ्या सदर हिल्स जिल्ह्याच्या मागणीसाठी आंदोलन छेडले आहे, तर येथील नागा समाजाचा त्याला विरोध आहे. त्यामुळे दोन्ही गटांनी पुकारलेल्या वेगवेगळ्या नाकेबंदीमुळे मणीपूरचा देशाच्या इतर भागांशी संपर्क तुटला आहे. राज्यात जीवनावश्यक वस्तूंच्या किमती तिपटीने वाढल्या आहेत. एक घरगुती सिलिंडर १ सहस्र ७०० रुपयांना विकला जात आहे, तर पेट्रोलचा प्रतिलिटरचा दर १०० रुपयांवर पोहोचला आहे. मणीपूरमध्ये काँग्रेसचे राज्य आहे आणि केन्द्रातही काँग्रेसचे राज्य आहे.
तरीही येथील जनतेची होणारी ससेहोलपट थांबवण्यास काँग्रेस शासनाला दोन महिन्यांत यश आलेले नाही. सुव्यवस्थेचे गेले दोन महिने तीन तेरा वाजले असतांना त्यावर तथाकथित निधर्मीवादी आणि स्वतःला समाजप्रेमी समजणारी प्रसारमाध्यमे माकडांप्रमाणे वागत आहेत. देशातील एका राज्याचा देशाशी असणारा संपर्क दोन महिने तुटतो आणि २-जी स्पेक्ट्रमच्या घोटाळ्यात सहभाग असल्याचा आरोप असणारे केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम त्यावर काहीही करत नाहीत, यावरून ते भ्रष्ट आणि निष्क्रीयही आहेत, हे उघड होते. मणीपूरसारखी परिस्थिती भाजप अथवा अन्य विरोधी पक्ष सत्तेवर असणार्या राज्यात घडली असती, तर काँग्रेसने आणि त्याचे दिग्विजय सिंग यांनी आतापर्यंत अनेकदा टीका केली असती; मात्र मणीपूरमधील अराजकाविषयी त्यांनी तोंडातून ब्रही काढलेला नाही. भाजपनेही काँग्रेसला यावरून जाब विचारलेला नाही. जनतेची ससेहोलपट होऊ देणारे राज्यातील आणि केन्द्रातील कॉँग्रेस शासन हटवण्याला पर्याय नाही

No comments:
Post a Comment