Total Pageviews

Tuesday, 18 October 2011

ANNA HAZARE & KASHMIR

राळेगणसिद्धी,
१८ ऑक्टोबर २०११.
माझ्या भगिनींनो आणि बांधवांनो ,
नमस्कार.
काश्मीर संबंधाने काहीं लोक उलट सुलट चर्चा करतात. मात्र त्यांना माहित नाही की मी सैन्यामध्ये असताना भारत-पाकिस्तानच्या युद्धामध्ये भाग घेतला होता. सीमेवर पाकिस्तानच्या हमल्यामध्ये माझे सर्व-सर्व सहकारी शहीद झाले. मात्र मी वाचलो.
त्याच वेळी मी निर्णय घेतला होता की आता उर्वरित आयुष्य देशाच्या आणि देशातील जनतेच्या सेवेसाठीच अर्पण करायचे.
आजहीं मी पाकिस्तानच्या गोळीचे निशाण माझ्या कपाळावर वागवतो आहे. म्हणूनच माझी धारणा आहे की काश्मीर हे भारताचे अंग आहे आणि अंगच राहणार. त्यासाठी पुन्हा एकदा पाकिस्तानशी लढावं लागलं तरी मी तयारी ठेवीन. मात्र काहीं लोकांना फक्त बोलता येते, जमिनीवर (प्रत्यक्षात) करता येत नाही हीं दुर्दैवी बाब आहे.
कि. बा. हजारे (अण्णा

No comments:

Post a Comment