Total Pageviews

Thursday, 20 October 2011

shabana azmi & freedom of speech

शबानांचे विचारप्रशांत भूषण यांना मारहाण झाल्याबद्दल शबाना आझमी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले आहे. सोमवारी सकाळी मी दिल्लीत होतो. दिल्लीतील मौर्यं शेरेटन हॉटेलच्या लॉबीत शबाना आझमी भेटल्या. सिनेमाच्या शूटिंगच्या सेटवर वावरतात तशाच त्या लॉबीत वावरत होत्या. त्यांचे पती जावेद अख्तर हे राज्यसभेत आहेत. देशविरोधी बोलणार्‍यांना, वर्तन करणार्‍यांना सोडू नये अशी जावेद अख्तर यांची भूमिका असते. दिल्लीत पाकिस्तानचे एक शिष्टमंडळ आले. त्यावेळी अख्तर यांनी त्यांच्यासमोर हीच भूमिका मांडली. त्यांची पत्नी शबाना आझमी यांचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य टोकाचे आहे. दिल्लीतील हॉटेलच्या लॉबीत त्या भेटल्या तेव्हा त्या जणू हवेतच तरंगत होत्या व दुसर्‍या दिवशी आझमगढ येथे जाऊन त्यांनी जे विधान केले ते धक्कादायक आहे. ‘‘प्रशांत भूषण यांना सर्वोच्च न्यायालयाच्या चेंबरमध्ये जाऊन मारहाण करणे ही गुंडगिरी आहे. मी धिक्कार करते. आपला देश नक्की कोणत्या दिशेने चाललाय तेच कळत नाही.’’ शबाना आझमी यांचे डोके ठिकाणावर नसावे. प्रशांत भूषण यांच्या मारहाणीचा निषेध त्यांनी केला, पण भूषण यांनी कश्मीरसंदर्भात जे देशद्रोही विधान केले त्याचा निषेध या तरंगणार्‍या बाईसाहेबांनी केला नाही. भूषण यांच्या विधानाशी त्या सहमत आहेत व कश्मीरात सार्वमत घेऊन ते पाकिस्तानला द्यावे असे भूषण यांना वाटते ते बरोबर आहे का हे शबाना आझमी यांनी स्पष्ट करायला हवे.
हे स्वातंत्र्य?‘अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ म्हणजे नक्की काय हे आपल्या देशातील विचारवंत व ज्ञानीजनांना कधीच समजले नाही. बेताल बोलणे व वागणे हेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य असे त्यांना वाटते. प्रशांत भूषण यांनी कश्मीरसंदर्भात जे विधान केले तसे विधान कुणी पाकिस्तानात केले असते तर तेथील कट्टरपंथीयांनी असे वक्तव्य करणार्‍याचा शिरच्छेद केला असता. पण हिंदुस्थानातील सभ्यता, संस्कृती व कायदा अद्याप शाबूत असल्याने प्रशांत भूषण यांना फक्त किरकोळ मारहाणच झाली. राष्ट्रद्रोहाची शिक्षा इतर देशांत काय असते हे आपल्याकडल्या अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या ठेकेदारांना समजावून सांगण्याची गरज आहे. जमिनीवर पाय न ठेवणारे, तरंगणारे नेते आणि विचारवंत देशविरोधी विधान करतात. त्यांना मारणारे गुंड ठरतात. हे कसले अभिव्यक्तिस्वातंत्र्य! तरंगणार्‍या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा धिक्कार असो!

No comments:

Post a Comment