Total Pageviews

Wednesday 12 October 2011

INEFFECTIVE POLICING

लोकांचे बीपी वाढवणारे पोलीस
दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र टाइम्स आणि महाराष्ट्र टाइम्स डॉट कॉमवर एक बातमी प्रसिद्ध झाली. डोंबिवलीत एका घरी चोरांनी डाका घालून सुमारे चौदा लाख रुपयांचे सोने आणि चांदी पळवली. यामुळे घरमालक आठवले यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. त्यांना हार्ट अॅटॅक आला नाही हे सुदैव. या निमित्ताने, मुंबई, ठाणे, डोंबिवली या पट्टयात दिवसाढवळया घरीफोड्या होत आहेत आणि पोलीस नेहमीप्रमाणे निष्क्रीय आहेत असे वारंवार दिसते आहे. या घरफोड्यांचा नीट अभ्यास केला तर त्यात बरेच साम्य आहे. घरातील माणसे अगदी थोडया वेळेसाठी बाहेर गेली तरी घर लुटले जाते आणि नेमक्या त्या घरात घबाड आहे याची चोरांना पूर्ण माहिती असते. बहुतेक वेळा बँकेतून सोने, चांदी अथवा रोख रक्कम काढून आणलेली आहे हे चोरांना नेमके कसे कळते हे पोलिसांना हुडकता येत नसेल तर पोलिसांनाच घरी पाठवण्याची गरज आहे. खरे म्हणजे, पोलीस आणि चोर यांचे संगनमत असावे असा संशय यावा अशी परिस्थिती आहे. घरफोडीबरोबर, बाइकवरून येऊन महिलेच्या गळयातील माळ पळवण्याचे प्रकार वाढत आहेत. यातही पोलीस शोध लावण्यात निष्प्रभ ठरत आहेत. दोन इतक्या मोठ्या गुन्ह्यांबाबत पोलीस चोरांपुढे हात टेकत आहेत हे दृश्य अनाकलनीय आहे. यात दुदैर्वाची बाब अशी की, ज्येष्ठ पोलीस अधिकारी या घटनांची अजिबात दखल घेत नाहीत. या प्रकरणात सामान्य माणूस पोळला जात असल्यामुळे राजकारणीही त्यांच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. सर्वसाधारणपणे, पोलिसांना आपल्या कार्यक्षेत्रात कोणती गँग वावरत आहे, त्यांची कार्यपद्धती काय आहे वगैरे तपशील माहित असतो. या टोळ्या आपल्या डोक्यावर बसणार नाहीत याबाबत ते दक्ष असतात. आता मात्र पोलिसांनी झोपेचे सोंग घेतलेले आणि चोर, दरवडेखारे मोकाट फिरत आहेत हा अनुभव येतो आहे. आठवले यांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आल्याची बातमी आली इतकेच. असे असंख्य आठवले, आयुष्यभर कष्ट करून जमवलेली पुंजी कोणीतरी चोरतो आणि ज्यांच्याकडे अपेक्षेने बघावे ते पोलीस उडवाउडवीची उत्तरे देतात या धक्क्यातून कधीच सावरत नाहीत. कदाचित काहींचा मृत्यूही यामुळे होत असेल. पण पोलिसांना काय त्याचे
सुहास फडके

No comments:

Post a Comment