AIRFORCE AIRCRAFT AT LOWEST SINCE INDEPENDENCE
NO NEW WEAPONS IN ARMY AFTER BOFORS
भ्रष्टाचाराने पुरते लुटले
हिंदुस्थानी सैनिकांकडे शस्त्रेच नाहीत
नवी दिल्ली, दि. ४ (वृत्तसंस्था) - पाकिस्तान आणि चीनकडून हिंदुस्थानच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला असतानाच भ्रष्टाचाराने बरबटलेल्या हिंदुस्थानच्या सैन्याकडे शस्त्रेच नसल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. अनेक शस्त्रास्त्रे संपण्याच्या बेतात असून युद्ध झालेच तर हिंदुस्थानी सैनिक लढणार तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सैन्यातील भ्रष्टाचार हेच कारण असल्याचे संरक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे. सुशांत सरीन यांनी सांगितले की, सैन्यातील भ्रष्टाचाराचा रस्ता हा शस्त्रखरेदीतूनच जातो. राजकीय नेते खरेदी प्रक्रियेत हस्तक्षेप करतात. खरेदी प्रक्रियेवर स्वतत्र संस्थेद्वारे देखरेख ठेवायला हवी. पण तशी संस्थाच अस्तित्वात नाही. संरक्षण मंत्रालयाने आपत्कालीन शस्त्रखरेदी सुरू केली आहे आणि त्यासाठी नेहमीचे धोरणही बाजूस सारले आहे. सर्वात गंभीर गोष्ट ही रणगाड्यांतून डागण्यात येणार्या तोफगोळ्यांची कमतरता आहे. संरक्षण मंत्रालयाने सरकारला लिहिलेल्या पत्रात याची माहिती दिली आहे. सैन्याकडे ६६ हजार तोफगोळ्यांची वानवा आहे. रॉकेट लॉंचरशी संबंधित शस्त्रांचीही टंचाई आहे. तोफगोळे पुरविण्यासाठी हिंदुस्थानचा इस्रायलशी करार झाला आहे. पण इस्रायली लष्करी उद्योगाला आता काळ्या यादीत टाकले आहे. त्याची चौकशी सीबीआय करत असून आता नव्या पुरवठादाराच्या शोधात हिंदुस्थानी लष्कर आहे. एक रशियन कंपनी तोफगोळ्यांच्या पुरवठ्यासाठी पुढे आली आहे. पण तिने सामान्य दरांपेक्षा ४०० पटींनी जास्त दर लावला आहे.

No comments:
Post a Comment