Total Pageviews

Tuesday, 4 October 2011

6 CRORES FOR A MOTOR CAR FOR PRESIDET IS IT JUSTIFIED

जेम्स बॉन्डचा सिनेमा बघताना त्याच्याकडे असलेल्या अत्याधुनिक गाड्या बघून आपली बोटं तोंडात जातात. त्या गाडीवर हॅन्डग्रॅनेड फेकला तरी गाडीला जराही खरचटत नाही, त्याचवेळी गाडीत असलेले मिसाईल लाँचर शत्रूचा अचूक वेध घेते. सगळ्यांनाच हवी हवीशी वाटणा-या यागाडी सारखी एक आलिशान गाडी आता राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना देण्यात आल्याचे कळते.

गेल्या आठ वर्षापासून लिमोझिन राष्ट्रपतींसाठी वापरण्यात येते. बदलत्या काळानुसार आणि सुरेक्षेच्या दृष्टीने या गाडीत बदल करणे आवश्यक असल्याने मर्सिडिझ बेन्झ एस६००एल पुलमॅन ही गाडी राष्ट्रपतींच्या सेवेत दाखल झाल्याचे कळते. या गाडीला अपग्रेड करण्यासाठी सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे कळते. मात्र राष्ट्रपतीभवन किंवा मर्सिडिझ बेन्झ यावर काही बोलण्यास तयार नाहीत.

नवी गाडी या वर्षांच्या मधल्या काळात खरेदी करण्यात आली असून त्या गाडीला अपग्रेड करण्यसाठी एक वर्षाचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. ही गाडी फ्लॅट टायरवर देखील व्यवस्थित धावावी तसेच गाडीला आग लागली असता पेट्रोल टॅंक आपोआप बंद होऊन गाडीतून बाहेर पडण्यासाठी मार्ग खुला होईल अशी सिस्टिम या गाडीत बसवण्यात येणार आहे.

मर्सिडिझ बेन्झ कंपनीने बनवलेल्या या गाडीचे कोच प्रशस्त आहेत. तसेच गाडीत ४३१५ मीमी इतकी मोकळी जागा मिळते. तर या गाडीची सर्वसाधारण लांबी ६३५६ मीमी इतकी आहे. गाडी प्रशस्त असल्याने महत्वाची बैठक घेणे इथे सहज शक्य होणार आहे. तसेच कोणत्याही राज्याशी थेट संपर्क करता येईल अशी कम्युनिकेशन सिस्टिमही बसवण्यात येणार आहे.

महत्वाची बैठक सुरू असल्यास गुप्तता राखण्यासाठी ड्रायव्हर आणि कोचमध्ये एक दरवाजा ठेवण्यात आला आहे. कोणतीही बैठक नसल्यास मात्र हा दरवाजा खुला ठेवता येऊ शकतो.

१२ सिलेंडर, बाय टर्बो इंजिन, ५५१३ सीसीची ची क्षमता असलेली ही गाडी ५१७ हॉर्सपॉवरचे आऊटपूट देते. यामुळे संकटाच्या वेळी कोणत्याही तणावाशिवाय ही गाडी राष्ट्रपतींना सुरक्षित स्थळी व्यवस्थित पोहचवू शकेल अशी माहिती सुत्रांनी दिली.

No comments:

Post a Comment