अजमल कसाबच्या फाशीला सर्वोच्च न्यायालयाकडून स्थगिती
नवी दिल्ली, १० ऑक्टोबर – २६/११च्या मुंबईवरील आक्रमणाच्या वेळी जिवंत पकडण्यात आलेला आतंकवादी अजमल कसाब याच्या फाशीच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. कसाबच्या याचिकेवर सुनावणी झाल्याशिवाय निर्णय दिला जाऊ शकत नाही.
२५ जानेवारीपासून कसाबच्या अर्जावर प्रतिदिन सुनावणी होईल, असे न्यायालयाने फाशीच्या शिक्षेला स्थगिती देतांना म्हटले आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र शासनालाही नोटीस पाठवली आहे. (भारतातील किचकट आणि कूर्मगतीने चालणार्या न्यायप्रणालीचा लाभ कसाबसारखा पाकपुरस्कृत कुख्यात आतंकवादी उठवतो. यातच भारतीय लोकशाहीची निरर्थकता सिद्ध होते ! – कसाब याने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत त्याच्या फाशीच्या शिक्षेला आव्हान दिले होते. २६/११ आक्रमणातील एकमात्र दोषी कसाबने कारागृह अधिकार्यांच्या मार्फत सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणी कसाबला मदत करण्यासाठी वरिष्ठ अधिवक्ता रामचंद्रन यांची ‘न्याय मित्र’ म्हणू्न न्यायालयाने नियुक्ती केली आहे. न्या. आफताब आलम आणि रंजना प्रकाश यांच्या खंडपिठाने सुनावणी केली.
No comments:
Post a Comment