काळ्या पैशाच्या चातुर्यकथा!- सारंग दर्शने चोर-पोलिसांच्या शर्यतीत पोलिस अधिक चाणाक्ष, सावध, बुद्धिमान आणि चपळ असावे लागतात. तरच ते चोरांना धडा शिकवू शकण र भारतात जन्म घेणाऱ्या काळ्या पैशाबाबत मात्र आजवर एकदाही 'पोलिस' जास्त हुशार ठरलेले नाहीत. सदैव 'चोरांची'च सरशी. या चोरांचे कर्तब किती श्रेष्ठ आहे, याचा एक मासला नुकताच उजेडात आला. झाले असे की, बहामा या बेटांच्या छोट्या देशात भारतातून होणारी निर्यात गेल्या तीन वर्षांत प्रचंड वाढली. त्या तुलनेत आयात मात्र अल्प. जगभर विखुरलेला काळा पैसा बहामाच्या भूमीवर 'पांढरा' बनवून उजळ माथ्याने भारतात आणण्याची ही चतुराई सध्या फळफळते आहे. तीन वर्षांपूवीर् बहामाला होणारी वस्तूंची निर्यात होती अवघी २० लाख डॉलर मूल्याची. ती यंदा थेट दोन अब्ज डॉलरांच्या पुढे गेली. अख्खा युरोप आणि अमेरिका निर्यातीच्या आघाडीवर मार खात असताना भारताची एका छोट्या देशाला होणारी ही भरघोस निर्यात थक्क करणारी आहे!
ही किमया चढी बिले लावून साधली जाते. म्हणजे निर्यात होणाऱ्या वस्तूची किंमत कागदपत्रांत शेकडोपट जास्त दाखवायची. शिवाय, ही दहा रुपयांची वस्तू लाख रुपयांना विकत घेणाऱ्या बहामातील कंपन्याही आपल्याच पित्त्यांच्या नावावर ठेवायच्या. म्हणजे, दोन्हीकडे फुलप्रूफ. एका अंदाजानुसार बहामाला भारतीय निर्यात गेली दोन वषेर् 'दर महिन्याला ५० टक्के' इतक्या थरारक वेगाने वाढली. याचा अर्थ लावणे अवघड नाही. पराकोटीची गुप्तता पाळणाऱ्या स्विस बँकांवरचा दबाव सतत वाढतो आहे. आथिर्क संकटात असलेल्या अमेरिकेने प्रथम हा दबाव टाकला. आता भारतही तेच करतो आहे. हे दबावाचे राजकारण यशस्वी होण्याच्या आतच स्विस बँकांमधील काळ्या पैशाला पाय फुटत आहेत. अलीकडे, मकाव बेटे, सेशेल्स, न्यू जसीर् आयलंड, केमॅन आयलंड्स, इस्ले ऑफ मॅन अशा अत्यंत छोट्या पण मामुली कर आकारणाऱ्या देशांना प्रचंड महत्त्व आले आहे. (नाही तरी, भारत हा तिसऱ्या जगातील छोट्या व गरीब देशांचा नेता आहेच!) भारतीयांच्या मालकीचे अब्जावधी डॉलर या देशांकडे वेगाने सरकत आहेत.
आथिर्क उदारीकरणानंतर काळा पैसा बाहेर जाऊन 'उजळ' माथ्याने परत येण्याचे 'फिनान्शियल हायवेज' आठ-दहा पदरी तर झालेच; पण त्यांच्यावरची वाहतूकही कित्येकपट वाढली. या महामार्गांचे नियंत्रण सार्वजनिक जीवनात परस्परांचे हाडवैरी दिसणारे प्रत्यक्षात हातात हात घालून करतात. गेल्या दोन वर्षांत केंद सरकारने १८ हजार कोटींचा काळा पैसा खणला खरा; पण आजवर परदेशांत गेलेली रक्कम तब्बल ४५०अब्ज डॉलर असावी. सापडणारा काळा पैसा त्या तुलनेत किस झाडकी पत्ती! जगभर करार करण्याने आणि देशभर धाडी टाकण्याने काळा पैसा सापडेल; मात्र संपणार नाही. काळा पैसा निर्माणच होऊ नये, यासाठी आपण काय करतो, हे जास्त महत्त्वाचे. आणि त्याचे पुरते उत्तर अर्थशास्त्रात नसून राजकारण व राजकीय व्यवस्थेत आहे. ते शोधण्याची हिंमत कोण दाखवणार, हा खरा सवाल आहे.

No comments:
Post a Comment