Total Pageviews

Thursday, 6 October 2011

chinese incurssions into india

INDIAN GOVT TOO SCARED TO REACT
http://maharashtratimes.indiatimes.com/videoshow/9984090.cms

आर. आर. पळसोकर दक्षिण चीन उपसागरात भारताने घुसखोरी केल्याची ओरड चीनने नुकतीच केली. या संदर्भातला मुख्य वाद आहे या समुदप्रदेशा तील दोन द्वीपसमूहांबद्दल . ज्या देशांची या द्वीपसमूहांवर सत्ता असेल, त्यांनाच भोवतालच्या समुदात खनिज तेल, नैसगिर्क वायू आणि मासेमारीवर अधिकार आणि नियंत्रण ठेवता येईल, हे याचे महत्त्व आहे.
दक्षिण चीन उपसागरात (साउथ चायना सी) गस्त घालत असलेल्या ऐरावत या भारतीय युद्धनौकेला ती चीनच्या सागरी हद्दीत असल्याचा इशारा चिनी नौदलाने दिल्याचे वृत्त मध्यंतरी प्रसिद्ध झाले. वास्तविक आंतरराष्ट्रीय समुदावर असलेल्या नौकेला चीनने आक्षेप घेण्याचे काहीच कारण नव्हते. नंतर असा प्रकार घडला नसल्याचा खुलासा चीनने केला. भारतानेही याबद्दल मौन पाळले आहे. या पार्श्वभूमीवर हा वाद काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे.
आपल्या सागरी क्षेत्रापासून दूर, चीनच्या किनारपट्टी जवळ कारवाया करण्याचे भारतीय कूटनीती आणि सामरिक दलांचे काय उद्देश असावे? सजग वाचकांना या विषयावर माहिती असणे गरजेचे आहे. दक्षिण चीन उपसागर हा जगातील वादग्रस्त क्षेत्रांपैकी एक आहे. चीनच्या वाढत्या सार्मथ्यामुळे, उपसागराच्या भोवतालच्या देशांना आपल्या देशहितांचे संरक्षण करणे कठीण होत चालले आहे. म्हणून ते इतर देशांच्या पाठींब्याच्या आणि मदतीच्या शोधात आहेत. व्हिएतनामाने भारताची मदत घेणे हे यातले एक उदाहरण. नकाशा पाहिला तर या उपसागराच्या उत्तरेला चीनची किनारपट्टी आहे. पश्चिमेला व्हिएतनाम, पूवेर्ला फिलिपिन्स आणि दक्षिणेला मलेशियाचे सारावक प्रांत आणि लहान, पण अतीश्रीमंत ब्रुनई हे देश आहेत. या सर्वांचे काही ना काही दावे सागरी प्रदेशावर आहेत. चीन दोन हजार वर्षांपूवीर्च्या इतिहासाचा आधार घेऊन पूर्ण उपसागर आपला अधिकार दाखवितो. व्हिएतनामचे म्हणणे आहे, की हे दावे १९४० नंतरचे आहेत. त्यांचा दावा सतराव्या शतकापासून आहे त्यासाठी त्यांच्याकडे लेखी पुरावे आहेत. मुख्य वाद आहे या समुदप्रदेशातील दोन द्वीपसमूहांबद्दल - उत्तरेला 'पॅरासेल' आणि दक्षिणेला 'स्प्रॅटली'. यातली बेटे अगदी लहान, खडकाळ आणि काहीच उपयोगाची नाहीत. ज्या देशांची या द्वीपसमूहांवर सत्ता असेल, त्यांनाच भोवतालच्या समुदात खनिज तेल, नैसगिर्क वायू आणि मासेमारीवर अधिकार आणि नियंत्रण ठेवता येईल, हे याचे महत्त्व आहे.
ऐतिहासिक दृष्टिकोनातून हे वाद आणखीन गुंतागुंतीचे आहेत. दुसऱ्या महायुद्धाच्या अखेर पर्यंत या सर्व देशांवर जपानसह इतर देशांचे साम्राज्य होते. जपानच्या पराभवानंतर ते स्वतंत्र झाले. आता चीन स्थानिक (आणि जागतिक) महासत्ता आहे. व्हिएतनामशी त्याचे विशेष वैर, १९४७ मध्ये दोन्ही देशांत समुदावर चकमक होऊन चीनने पॅरासेलवर कब्जा केला आणि १९८८ मध्ये स्पॅटलीच्या काही बेटांवर आक्रमण करून आपला झेंडा फडकावला. शिवाय १९७९ मध्ये दोन्ही देशांत व्हिएतनामच्या उत्तर सीमेवर घनघोर लढाई झाली.

'
आसिआन' (असोसिएशन ऑफ साउथ-ईस्ट एशियन नेशन्स) संघटनेचे हे सर्व देश सभासद आहेत चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया इतर काही देश या संघटनेचे प्रेक्षक आणि भागीदार आहेत. 'आसिआन'चा उद्देश आहे की सर्व तंटे-मतभेद चर्चा करून मिटवावेत; पण चीन वाटाघाटींसाठी तयार नाही. या वादाला चीन विरुद्ध इतर सर्व असे रूप आले आहे.
भारताचे दक्षिण चीन उपसागराबद्दल काय धोरण असावे? मवाळ दृष्टिकोनाचा गट म्हणतो की भारताचा चीनबरोबर आधीच सीमावाद आहे; त्यात आपल्या देशापासून दूर असलेल्या प्रदेशात का म्हणून उगीचच वाद वाढवावा? आज भारतासमोर अनेक गंभीर समस्या आहेत, अशा काळात विकासकार्य, व्यापार अशा विषयांवर लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. चीनशी मैत्री ठेवली तर आपण अधिक प्रगती करू शकू. काहींचे मत आहे, की पाश्चिमात्त्य देश भारत-चीन वाद वाढविण्याचा प्रयत्न करतात.
याच्या विरुद्ध मत असे आहे, की येत्या काळात भारत-चीन स्पर्धा अधिक तीव्र होणार. कारण चीनच्या महत्त्वाकांक्षांच्या आड येणारा आशियाई खंडात भारत हा एकमेव देश आहे. म्हणून चीन भारतविरोधी धोरण अवलंबणारच. चीनची पाकिस्तानशी मैत्री, त्यांना शस्त्रपुरवठा करणे, अण्वस्त्रांसाठी मदत करणे ही सर्व भारतविरोधी पावले आहेत. याशिवाय भारताला सामरिक विळखा घालण्यासाठी चीन 'स्ट्रिंग ऑफ र्पल्स' (मोत्यांची माळ) धोरणाअंतर्गत पाकिस्तानातील ग्वादार बंदर, श्रीलंकेतील हंबनतोता बंदर आणि म्यानमार येथे कोको बेटावर टेहळणीसाठी सुविधा तयार करीत आहे. आपण याचा आक्रमक धोरणाने प्रतिकार केला पाहिजे. भारताने पण चीनच्या तटाजवळ नौसेनेसाठी तळ ठेवले पाहिजेत. व्हिएतनामशी मैत्री याच कारणासाठी वाढवणे गरजेचे आहे.
अमेरिकेने भारताच्या अणुशक्तीच्या कार्यक्रमाला विशेष अनुमती देऊन प्रोत्साहन दिले आहे, याचा पूर्ण उपयोग केलाच पाहिजे. भारताला जागतिक व्यवस्थेत दुय्यम स्थान नको. चीनशी नमून घेतले तर असे होण्याची शक्यता आहे. आज आपली अर्थव्यवस्था चांगली आहे, आपले सामरिक सार्मथ्यपण काही कमी नाही, तर का आपण पडते घ्यावे?जवानांसह चार हजारावर चिनी पाकव्याप्त काश्मिरात पाकव्याप्त काश्मिरात चीनच्या मदतीने काही विशिष्ट प्रकारचे बांधकाम पूर्ण जोराने सुरू असल्याचा दावा अखेर खरा ठरला. पाकच्या हद्दीत असलेल्या या प्रदेशात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीच्या जवानांसह चार हजारावर चिनी नागरिक उपस्थित असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल व्ही. के. सिंग यांनी आज दिली. भारतापुढील चिंता वाढविणारीच ही घटना असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. पाकव्याप्त काश्मिरात बांधकाम करण्यासाठी चीनमधून एक चमूच आलेली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी लष्करातील जवानही आहेत. या चिनी नागरिकांची संख्या चार हजारावर आहे, असे त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. फिल्ड मार्शल के. एम. चरिअप्पा यांच्या १६ व्या स्मृती परिसंवादाला संबोधित केल्यानंतर ते बोलत होते. पाकव्याप्त काश्मिरात चीनचे सैनिक आणि नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत, हे खरे आहे काय, असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. पाकव्याप्त काश्मीर हा भारताचाच भाग असून, या भूमीत चीनचे सैनिक आणि अभियंत्यांची उपस्थिती चिंताजनक बाब आहे, अशी भीती यापूर्वीच लष्कराने व्यक्त केली होती. हवाई दल प्रमुख एन. . के. ब्राऊने यांनीही ही बाब भारतासाठी चिंतेची असल्याचे वक्तव्य केले होते. दरम्यान, गेल्या वर्षीही जम्मू-काश्मीरच्या गिलगित-बाल्टिस्थान या भागात सुमारे ११ हजार चिनी सैनिक उपस्थित होते. पण, चीनने मात्र आम्ही येथे कुठलेही चुकीचे काम करीत नसल्याचे स्पष्ट करून भारताला दिलासा दिला होता
चीन आता पाक व्याप्त काश्मीर मधून काराकोरम महामार्ग वापरून पाकिस्तान आणि अफगाणिस्तान चा मार्ग खुला करत आहे. पाकिस्तान सुद्धा,"आयजीच्या जीवावर बायजी उदार" या न्यायाने मुळात हिंदुस्थानचा असलेल्या व्याप्त काश्मीर मधून चीनला असा मार्ग काढण्यास मदत देत आहे. त्या मार्गे त्यांनी रस्ता तसेच लोहमार्ग काढण्याचे ठरवले आहे. अफगाणिस्थान मधील विपुल खनिज संपत्तीवर चीनचा डोळा आहे. जम्मू-काश्मीर हा आपल्या देशाचा असा एकमेव भाग आहे की जेथून चीनी पाकी मिळून हिंदुस्थान साठी घातक होऊ शकतात.
[6 Oct, 2011 | 2140 hrs IST]

Vivek Tavate,Kalwa,
लिहतात… :पाकव्याप्त प्रदेशातील पाकने चिनी सैनिकाना प्रवेश दिला पण एक दिवस ही चिनी या पाकव्याप्त प्रदेशावर आपला हक्क दाखवून भरताविरोधात युध्दाला तयार होतीला प्रदेश काबीज करण्यासाठीच ते पाकला आता मदतीचा पुढे करीत आहेत.अमेरीकेने मदत देणे बंद केल्याने पाक चीनची मदत घेण्यास सुरुवात केली आहे. चीनच्या धुसखोरी पाकसह भारतालाही त्रास दायक आहे.
[6 Oct, 2011 | 1450 hrs IST]

Satish,Mumbai,
लिहतात… :ह्याला जबाबदार आहेत आपले राज्यकरते. हिंदी चिनी भाई भाई हा नारा देऊन देशाची वाट लावणारे नेहरू. सरदार पटेल होते म्हणून हैदराबाद तरी वाचले नाहीतर ती पण एक कायमची डोके दुखी झाली असती.
[6 Oct, 2011 | 1221 hrs IST]

satish,mumbai,
लिहतात… :भारताला सर्व दि शानी धोका आहे. ह्याला कारण आपण सुपुत म्हणून पूजा करतो ते हिंदी चिनी भाई भाई चा नारा देणारे नेहरू. पटेल होते म्हणून हैदराबाद तरी वाचले नाही तर ती पण कायमची डोके दुखी ज़ळी असती.
[6 Oct, 2011 | 1206 hrs IST]

sanjeev,dubai,
लिहतात… :कपिल सिबबाल आणी कंपनी ची मारा अगोदर. साले चिनी कॉंपाण्याना टेली .C कंत्रात देतात आणि एकडे चीन भारता विरोधी कारवाया करतो......
[6 Oct, 2011 | 0054 hrs IST]
साऊथ चीन समुदामध्ये व्हिएतनाम आणि ओएनजीसी विदेशच्या तेल संशोधन कार्यामुळे आपली स्वायत्तता भंग होत आहे, असा कांगावा चीनने सुरू केला आहे. धमकीवजा इशारेही दिले जात आहेत. परिणामी सुधारणेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत-चीन संबंधांना पुन्हा नकारात्मक दिशा मिळण्याचा धोका दिसत आहे.
................
साऊथ चीन समुदामध्ये विएतनाम आणि ह्रहृत्नष्ट विदेशच्या तेल संशोधन आणि विकसन कार्यामुळे आपली स्वायत्तता भंग होत आहे, असा कांगावा चीनने सुरू केला आहे. त्याचप्रमाणे, चीनच्या त्नद्यश्ाड्ढड्डद्य ह्लद्बद्वद्गह्य या राष्ट्रवादी वर्तमानपत्राने, 'या क्षेत्रात कार्यरत होणाऱ्या अन्य पक्षांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल, असा धमकीवजा इशारा असलेला लेख छापला आहे. ह्या सर्व गोष्टींमुळे सुधारणेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारत-चीन संबंधांना पुन्हा नकारात्मक दिशा मिळण्याचा धोका दिसत आहे. आजच्या परिस्थितीत भारत आणि चीन हे अतिशय वेगाने वाढणारे देश आहेत आणि त्यांचे द्विपक्षीय परस्परसंबंध अतिशय किचकट आहेत. जसजसे हे देश अधिक बळकट होतील, तसतसा त्यांच्यातल्या संपर्क हा साहजिकच वाढेल. बहुपक्षीय तसेच वैश्विक पातळीवर देखील त्यांना एकमेकांना सामोरे जावे लागेल आणि त्यांना तृतीयपक्षी विवादात कधी परस्परानुकूल तर कधी परस्परविरोधी बाजू घ्यावी लागेल.
अशाच प्रकारे या साऊथ चीन समुदात असलेल्या विवादात भारत ही एक बाह्य शक्ती आहे आणि हा मुख्य वाद चीन आणि व्हिएतनाम मधला आहे. परासिल बेटांच्या नियंत्रणावरून चीन आणि व्हिएतनाम मध्ये विवाद आहे. पण या दोन देशांमध्ये परासिलवरून १९७४मध्ये युद्ध झालेले आहे. साऊथ चीन समुदात हजारो द्वीप आणि बेटे आहेत ज्यांच्या वरून चीन आणि इतर प्रादेशिक देशांत (ज्यात फिलिपीन्स, मलेशिया आणि तैवान यांचा समावेश आहे) विवाद चालू आहेत. इतिहासात ही बेटे कधी चिनी राजांनी काबीज केली तर कधी इतर देशांच्या राजांनी त्यांच्यावर राज्य केले. जेव्हा दुसऱ्या महायुद्धानंतर चीन आणि इतर देश स्वतंत्र झाले तेव्हा त्यांच्याकडे सागरी सार्मथ्य नसल्यामुळे त्यांना ही बेटे काबीज करता आली नाहीत. पण गेल्या साठ वर्षांत त्यांनी आपला दावा कधी सोडला नाही आणि त्यासाठी त्यांनी विवादित इतिहासाचा उपयोग केला आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे या द्वीप आणि बेटांवर नैसगिर्क वायू आणि तेलाचे साठे आहेत. चीन हा पेट्रोलजन्य पदार्थांसाठी पश्चिम आशियायी देशांमधून होणाऱ्या आयातीवर अवलंबून आहे आणि त्याला ह्या विवादित क्षेत्रातल्या नैसगिर्क ऊजेर्मध्ये रस आहे. तसेच ही खनिजे वाटून घेण्याची त्याची तयारी नाही. त्यामुळे आपल्या राष्ट्रवादी जनतेला उत्तेजित करण्यासाठी त्नद्यश्ाड्ढड्डद्य ञ्जद्बद्वद्गह्य सारख्या वर्तमानपत्रांचा वापर भडक विधाने प्रकाशित करून केला जातो.
या क्षेत्रातून चीन, अमेरिका, जपान, कोरिया तसेच/ दक्षिण-पूर्व आशियातील इतर देशांचे समुदी मार्ग (स्द्गड्ड द्यड्डठ्ठद्गह्य श्ाद्घ ष्श्ाद्वद्वह्वठ्ठद्बष्ड्डह्लद्बश्ाठ्ठ) जातात. जो देश ह्या विवादित बेटांवर नियंत्रण करील त्याला हृच्या समुदी नियम करारानुसार (हृष्टरुह्रस्) आपली नौसेना तिथे तैनात करता येईल आणि इतर देशांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येईल. चीनला ह्या नियंत्रक क्षमतेमध्ये स्वारस्य आहे कारण चिनी राज्यर्कत्यांना असे वाटते की युद्ध परिस्थितीत अमेरिका आपल्या बलवान नौसेनेचा उपयोग साऊथ चीन समुदात करून चीनच्या व्यापारात आणि पश्चिम आशियामधून येणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळा आणील आणि त्यामुळे चीनची युद्धक्षमता नष्ट होईल. थोडक्यात, चीन आणि अमेरिकेतील अविश्वास वाढत असल्यामुळे चीनची असुरक्षिततेची भावना बळकट झाली आहे आणि त्याचा दुष्परिणाम म्हणजे चीन प्रादेशिक देशांशी आज आक्रमक विदेशनीती वापरीत आहे.
भारत आणि व्हिएतनाम मधील परस्परसंबंध ऐतिहासिक आहेत. ठ्ठश्ाठ्ठ -ड्डद्यद्बद्दठ्ठद्वद्गठ्ठह्ल आणि विकसनशील देशांच्या सहकार्याच्या भूमिकेतून जी सकारात्मक मानसिकता निर्माण झाली होती ती दिवंगत पंतप्रधान नरसिंह राव यांच्या 'लूक ईस्ट' विदेश नीतीने अधिक बळकट झाली आहे. १९९२ पासून दोन्ही देशांत कृषी, शिक्षण, उद्योग अशा अनेक क्षेत्रांत सहकार्य विकसित करण्यात आले आहे. २००३च्या भारत-व्हिएतनाम करारानंतर आथिर्क सहकार्य अधिक बळकट झाले आहे आणि आता भारत-व्हिएतनाम आथिर्क व्यवहार जवळपास दोन अब्ज अमेरिकन डॉलर्सपेक्षा अधिक आहे आणि वाढतच आहे.
महत्त्वाचे म्हणजे दोनही देश सोविएत रशिया निमिर्त संरक्षण तंत्रज्ञान वापरत असल्यामुळे सुरक्षा प्रशिक्षण आणि सुरक्षा प्रणालींचे तंत्रज्ञान यातील सहकार्य देखील मजबूत आहे. उदाहरणार्थ, व्हिएतनाम हवाई दलही रशिया निमिर्त मिग २१ विमाने वापरते ज्याच्या वैमानिकांचे प्रशिक्षण १९६० आणि ७०च्या दशकात भारतात देण्यात आले होते. नुकतेच व्हिएतनामने न्हा त्रांग बंदरामध्ये भारतीय नौसेनेच्या ढ्ढहृस् ऐरावतला देखील निमंत्रण दिले होते. त्याचप्रमाणे २००९ आणि २०१०मध्ये व्हिएतनामच्या इतर सैन्य दलांनी देखील दहशतवाद विरोधी प्रशिक्षण आणि युद्ध अभ्यासात भाग घेतला होता.
वर उल्लेख केलेल्या चीनच्या आक्रमक विदेश नीतीने आणि चिनी नौसेनेच्या झपाट्याने होणाऱ्या वाढीने व्हिएतनाम आणि तत्सम प्रादेशिक देशांची सुरक्षा धोक्यात आली आहे. चीनची विमानवाहू युद्धनौका लौकरच तयार होत आहे जी व्हिएतनामसारख्या देशांसाठी चिंताजनक गोष्ट आहे. त्याचप्रमाणे, चीनच्या हैनान पाणबुडी तळामुळे देखील चीन व्हिएतनामवर आधिकाधिक लक्ष ठेवून आहे. त्यामुळे व्हिएतनामने अमेरिकासहित इतर समविचारी देशांशी सहकार्य वाढवण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यामुळे व्हिएतनामला असे वाटते की चीन सौम्य भूमिका घेईल. भारताला अप्रत्यक्ष धमकावल्यानंतर चीनने व्हिएतनामला 'आपसातील विरोध चचेर्ने सोडवू' असा प्रस्ताव दिला आहे.
आजच्या जगात आंतरराष्ट्रीय संबंध अतिशय किचकट झाले आहेत आणि किचकट संबंध सांभाळून त्यातून फायदा होण्यासाठी भारताला बहुव्यापक विदेशनीतीची गरज भासेल. साऊथ चीन समुदातील विवाद हे त्याचे साधे स्वरूप आहे. भारताला खंबीर मानसिकता ठेवून आपले राष्ट्रहित पुढे रेटावे लागेल


चीनच्या सैनिकांनी भारताच्या हवाई हद्दीचे तसेच जमीनीवरील सीमेचे उल्लंघन करत घुसखोरी केली. त्यांनी इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या निवडक जुन्या बंकर आणि तंबूंची तोडफोड केली.
भारतीय हवाई हद्दीचे उल्लंघन करत हेलिकॉप्टरमधून तब्बल दिड किलोमीटर आतमध्ये आलेल्या चीनी सैनिकांनी लेहपासून ३०० किलोमीटरवर असलेल्या न्योमा तालुक्यातील चुमार परिसरात इंडो-तिबेट सीमा पोलीस दलाच्या मालमत्तेचे नुकसान केले.
हेलिकॉप्टरमधून आलेले चीनी सैनिक एका ठिकाणी उतरले. तिथून थोडे अंतर चालत जाऊन त्यांनी तोडफोड केली. भारतीय जमिनीवर आपला हक्क असल्याचा दावा करण्यासाठी चीनने ही कृती केली.
स्थानिकांनी दोन चीनी हेलिकॉप्टर पाहिल्याचे सांगितले

No comments:

Post a Comment