Total Pageviews

Thursday 20 October 2011

वायूसेनेच्या पुस्तिकेतून सुरक्षेविषयीची गोपनीय माहिती उघड !

Today, October 21, 2011, 11 hours ago |अशा सुरक्षायंत्रणा राष्ट्र आणि जनता यांचे रक्षण काय करणार ?

नवी दिल्ली, २० ऑक्टोबर - जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील सैन्यदलाच्या सीमावर्ती चौक्यांसाठी साहित्य घेऊन जाण्यासाठी, तसेच जवानांची ने-आण करण्यासाठी वायूसेना हेलिकॉप्टर भाड्याने घेण्याचा विचार करत आहे.

यासाठी वायूसेनेने खुल्या निविदा मागवल्या आहेत. या निविदांसाठी बनवण्यात आलेल्या माहितीपर विज्ञापन पुस्तिकेमध्ये वायूसेनेने जम्मू-काश्मीर आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांतील सीमा भागातील भारतीय सैन्याच्या चौक्यांची, तसेच त्या ठिकाणी असलेल्या हेलिपॅडची सखोल माहिती दिली आहे. वायूसेनेने अशी संवेदनशील माहिती सार्वजनिक केल्याने भारतीय सैन्य अधिकार्‍यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सैन्य अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारची अतीसंवेदशील आणि गोपनीय माहिती सार्वजनिक करणे चुकीचे आहे.
(भारतीय वायूसेनेतील ज्या अधिकार्‍यांनी हे विज्ञापन प्रकाशित केले आहे, त्यांच्यावर  कठोर कारवाई करायला हवी. अर्थात् भ्रष्टाचार आणि राष्ट्रद्रोह हीच प्रमुख वैशिष्ट्ये असलेले  शासन या दोषींवर काही कारवाई करेल, अशी अपेक्षाच बाळगता येणार नाही. )
३० पानांच्या या विज्ञापन पुस्तिकेमध्ये वायूदलाने जम्मू-काश्मीर राज्यातील किश्तवाड, कुपवाडा, तंगधर, कंजालवन, पारलियान, तर अरुणाचल प्रदेशातील तगांग, दोपोरजो, भवानी ड्रॉप, जोन आणि यांग्त्जे येथील हेलिपॅडची माहिती देण्यात आली आहे. त्याचबरोबर चीनला लागून असलेल्या सीमेवरील तापुखार आणि ताक्सिंग या चौक्यांचीही माहिती देण्यात आली आहे.

No comments:

Post a Comment