हल्ल्यांचे लक्ष्य सामान्य माणूसच! दिल्लीमध्ये
On 08/09/2011 10:34 AM d said: बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सामान्य माणसाच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दहशतवाद्यांचा उद्देश सामान्य माणसाला हतबल करून त्याची शासन यंत्रणेवरची आस्था कमी करून अराजक माजविणे, हाच असतो. दुर्दैवाने राजकारण्यांमधील इच्छाशक्तीच्या अभावामुळे दहशतवाद्यांची ही खेळी यशस्वी होताना दिसते आहे. सामरिक व गुप्तचर तज्ज्ञांशी चर्चा करून केलेला ऊहापोह...
आज पुन्हा 'ब्रेकिंग न्यूज'... आज पुन्हा नवा आकडा...
26/11 म्हणा...13/2 म्हणा ...किंवा आता 7/9स्फोट दूर तिकडे झाला... म्हणून
त्या यादीत "माझे' कुणी नाही... म्हणून
हायसे वाटत नाही आता मला...आताशा माझा "आज'
"उद्या'ची छातीठोक खात्री देत नाही...
वारंवार स्फोट होणे हे दुर्दैवी आहे. सामान्य माणसाने निश्चितच जास्त जागरूक राहण्याची वेळ आली आहे. पोलिस यंत्रणा तिचे काम करत आहेच. आरोप-प्रत्यारोप करण्याची ही वेळ नाही.
चिंता वाटावी अशी देशाची स्थिती आहे. सामान्य नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. सरकार आणि पोलिस यंत्रणा दोन्हींवर विश्वास राहिलेला नाही. एका बाजूला देशाला भ्रष्टाचाराने ग्रासले असून दुसरीकडे देशात वेगवेगळ्या भागांत बॉंबस्फोट होत असल्याने नागरिक हतबल झाले आहेत.
सरकार आणि पोलिस यांच्यावर सर्व जबाबदारी टाकून चालणार नाही. देशातील कोणत्या ना कोणत्या शहरात स्फोट होत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांनी स्वतः सतर्क राहिले पाहिजे. अन्यथा स्फोटांचे प्रमाण कमी होणार नाही.
मतपेढ्यांच्या राजकारणातून देशात कायम तणाव असतो. नेत्यांचा बंदोबस्त, उत्सवातील बंदोबस्तातच पोलिस जास्त गुंतलेले असतात. त्यांना फारसे स्वातंत्र्य नाही. पोलिस खाते राजकारण्यांच्या हातात असल्याने सामान्य नागरिकांचा कायदा-सुव्यवस्थेवर विश्वासच राहिला नाही.
दहशतवादी स्लिपर सेलच्या मदतीने हल्ले करीत असल्याने गुप्तचर यंत्रणांपुढे मोठे आव्हान आहे. स्लिपर सेल देशाच्या सर्व भागांत कार्यरत आहेत. अशा परिस्थितीत गुप्तचर यंत्रणांना प्रत्येक गोष्ट समजेल, असे गृहीत धरणेही योग्य नाही. या संघटना हल्ल्यांचे इशारे देऊन नागरिकांना दक्ष राहण्याचे आवाहन करीत असतात. या परिस्थितीत नागरिकांनी जागरूक राहून आढळलेल्या प्रत्येक धोक्याची सूचना संबंधित यंत्रणांना द्यायला हवी. नागरिकांमध्ये सुरक्षा मानसिकता निर्माण झाल्यास अशा हल्ल्यांना पायबंद बसू शकेल. सुरक्षा यंत्रणा, गुप्तहेर संघटना व पोलिसांच्या जोडीला नागरिकांनीही काळजी घेणे गरजेचे आहे.
दहशतवादी कायमच गर्दीची ठिकाणे व मोठी शहरे लक्ष्य करतात. या शहरांतील असंख्य गोष्टी त्यांच्या टार्गेट असू शकतात. सध्या सुरू असलेला गणेशोत्सव किंवा उत्तर भारतात सुरू होणारा दसऱ्याचा सण अशा गोष्टी लक्ष्य होऊ शकतात, हे उघड आहे. अशा ठिकाणी कितीही माहिती गोळा केली तरीही हल्ले होऊ शकतात. स्लिपर सेलच्या मदतीने होणाऱ्या या हल्ल्यांची तुलना खाटेत झालेल्या ढेकणांशीच होऊ शकते. एका ठिकाणी रोखला तरीही हल्ला दुसऱ्या ठिकाणी होऊ शकतो. या परिस्थितीमध्ये सामान्य माणूस हताश होणे नैसर्गिक आहे व त्या परिस्थितीमध्ये तो सुरक्षा व गुप्तहेर संघटनांना दोषी ठरवतो. स्फोटासारख्या घटनेनंतर त्याला "इंटेलिजन्स फेल्युअर' म्हणण्याची फॅशन झाली आहे. मात्र, या संघटनांना गाफील म्हणणे त्यांच्यावर अन्याय आहे. आपण ज्या परिस्थितीत राहतो, त्याच्या सामाजिक व राजकीय परिणामांतून हे सर्व होत आहे, हे आपल्याला मान्य करावे लागेल. हल्ले रोखण्यासाठी प्रबळ राजकीय इच्छाशक्तीच्या कीटकनाशकाची गरज आहे; मात्र त्यात मोठी भेसळ झाली आहे, हे दुर्दैव आहे. अशा परिस्थितीत सामान्य नागरिकांनी सुरक्षा यंत्रणांना सहकार्य केले पाहिजे व माध्यमांनीही गुप्तहेर यंत्रणांना दोषी न ठरविता संयत वृत्तांकन केले पाहिजे.
या सर्व व्यवस्थांनी योग्य काम केल्यानंतरही दहशतवाद मुळापासून उघडून टाकण्यासाठी जरब बसविणारी यंत्रणा अत्यंत गरजेची आहे व आपल्या देशात तिचा अभाव आहे. दहशतवाद्यांना पकडल्यानंतर शीघ्र व योग्य शिक्षा झाल्यास भविष्यात दहशतवादी कारवायांना पायबंद घालता येईल.
स्थानिक दक्षता हाच उपाय
भारतात अतिरेकी हल्ल्यांचा धोका कायम राहणार आहे, हे वास्तव समाजाने आता स्वीकारायला हवे. मोठी युद्धे न होता असे छुपे दहशतवादी हल्ले करणे हा "पॅटर्न' पुढेही कायम राहील. नागरिकांमध्ये भीती निर्माण करणे हा या हल्ल्यांचा हेतू असतो. स्थानिक गटांचा (स्लिपर सेल) सहभाग असल्याशिवाय बॉंबस्फोट होत नाहीत हे उघड आहे. हे "स्लिपर सेल' आताच सक्रिय झाले आहेत असे नाही. परदेशातील दहशतवादी संघटनांचा या हल्ल्यांत थेट सहभाग नसला तरी स्थानिक गटांना त्यांचा छुपा पाठिंबा असतोच. स्थानिक सहभागातून होणारे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर दक्षता (लोकल व्हिजिलन्स) बाळगणे अत्यंत गरजेचे झाले आहे. खलिस्तान चळवळीने थैमान घातले असताना पंजाबमध्ये ही दक्षता बाळगली जात होती. समाजातील प्रत्येक व्यक्ती दक्ष राहिली तर हल्ले रोखण्याची शक्यता निर्माण होऊ शकते. गुप्तहेर यंत्रणा किंवा पोलिसांना मिळणारी गुप्त माहिती आकाशातून पडत नाही. ती त्यांना स्थानिक पातळीवरूनच मिळते. त्यामुळे आपल्या आसपासच्या परिसरात काय सुरू आहे याविषयी सामान्य नागरिकांनी सावधान राहायला हवे. गणेशोत्सवाच्या काळात सार्वजनिक मंडळांनी सीसीटीव्ही यंत्रणा बसवून किंवा सुरक्षेसाठी स्वतंत्र पथके तयार करून योग्य दिशेने पाऊल टाकले आहे. अमेरिकेने 9-11 च्या हल्ल्यानंतर "होमलॅंड सिक्युरिटी'ची अत्यंत कडक अंमलबजावणी केली.
"प्रिव्हेंटीव्ह' धोरणामुळे गेल्या दहा वर्षात तेथे मोठा हल्ला झालेला नाही. आपल्याकडे "चलता है' ही वृत्ती आहे. विमानतळावर व्हीआयपींची तपासणी केली तर मोठा गहजब होतो. हल्ले झाल्यावर घटनास्थळाला भेट देणे आणि प्रसिद्धिमाध्यमांना "स्टेटमेंट' देणे एवढेच दिसते. ही मानसिकता बदलायला हवी.
- डॉ. श्रीकांत परांजपे, संरक्षण-सामरिकशास्त्रतज्ज्ञ
कठोर भाषेत उत्तर द्या!दहशतवादी तत्त्वांची विचारधारा असे सांगते, की एका माणसाला मारा व त्यातून हजार लोकांच्या मनात भीती बसवा. त्यामुळेच अतिरेकी ठिकाण निवडताना सामान्य माणसाच्या मनात दहशत बसेल, असेच ठिकाण निवडतात. त्यातून सामान्य माणसाच्या मनात आता आमचे कसे होणार, ही भीती निर्माण होते व त्यांची शासन व्यवस्थेवरची आस्था संपते. दहशतवाद्यांना नेमके हेच हवे असते. दुर्दैवाने लोकांना विश्वास देण्याऐवजी देशाचे गृहमंत्रीच लोकांचा शासन व्यवस्थेवर विश्वास राहिला नसल्याचे वक्तव्य करतात. मी गेली अनेक वर्षे "असिमट्रीकल वॉरफेअर' ही संकल्पना मांडत आहे. त्यानुसार दहशतवादी तुमच्या कमतरतेवर हल्ला करून देश खिळखिळा करण्याचा प्रयत्न करताना दिसतात. या युद्धात सामान्य पोलिस यंत्रणा सक्षम ठरत नाही. दहशतवाद नेहमीच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे, असे सांगत केंद्र सरकार राज्यावर जबाबदारी ढकलत आहे व त्यामध्ये सामान्य माणसाचा बळी जात आहे.
दिल्लीत आज झालेल्या बॉंबहल्ल्याची तयारी मागील किमान 3 ते 4 महिन्यांपासून झाली असेल, हल्ला करणारे स्लिपर सेल दिल्लीतीलच होते व त्यांना दिल्लीच्याच आणखी काही लोकांनी मदत केली, हे मी माझ्या अनुभवातून सांगू शकतो. त्यामुळेच प्रत्यक्ष बॉंबहल्ला केलेल्यांपेक्षा त्यांना मदत करणारे अधिक घातक आहेत. भारतातीलच या लोकांना शोधण्यात गुप्तचर यंत्रणा कमी पडत आहेत. या यंत्रणा रिऍक्टिव्ह प्रकारचे काम करताना दिसतात. भारतात गेली अनेक वर्षे दहशतवादी हल्ले होत असूनही देशाकडे कोणतीही दहशतवादविरोधी धोरण नाही. एखाद्या हल्ल्याची शंका आल्यास थेट तेथे जाऊन तो उधळून लावणे, याला धोरण म्हणतात. जोपर्यंत तुम्ही त्यांच्या घरात जाऊन त्यांना नष्ट करीत नाही, तोपर्यंत ते तुमच्या घरात येऊन हल्ले करणारच. धोरणाबरोबरच भारतात दहशतवादविरोधी सक्षम कायदाही अस्तित्वात नाही. कायदा करण्याचा अधिकार असलेले राजकारणी "सध्या असलेले कायदे नीट वापरल्यास अशा कायद्याची गरज नाही' असे सांगतात. असा कायदा झाल्यास त्यांच्याच हितसंबंधांना बाधा येईल, हे त्यामागचे उघड सत्य आहे. अतिरेक्यांना त्यांनी केलेल्या कृतीपेक्षा अधिक कठोर भाषेत उत्तर दिल्याशिवाय ते ताळ्यावर येत नाहीत, हे मी माझ्या पंजाब, काश्मीर व ईशान्य भारतातील अनुभवावरून सांगू शकतो.
दहशतवादाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी मोठ्या राजकीय इच्छाशक्तीची गरज आहे. त्यासाठी इतर देशांत जाऊन दहशतवादी शोधण्यापेक्षा त्यांचे प्रथम आपल्या देशातून उच्चाटन केले पाहिजे. याच्या जोडीला प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या संरक्षणाची जबाबदारी स्वतःच स्वीकारावी व शासन व्यवस्थेला मदत करून दहशतवादाचा खातमा करावा.
------------------------------------------------------------------------------गुप्तवार्तेच्या अभावामुळेच दहशतवादी हल्ले
गेल्या चाळीस वर्षांत पोलिसांची संख्या चौपटीने वाढली असूनही दहशतवादी हल्ले कमी झालेले नाहीत. त्यामुळे पोलिसांची भरती, प्रशिक्षण व गुणवत्ता या सर्वच गोष्टींबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होते. संख्या वाढली तरी पोलिस महत्त्वाच्या व्यक्तींची सुरक्षा, कैद्यांची ने-आणसारख्या तांत्रिक गोष्टींसारख्या कामात अडकतात व केवळ 15 टक्के पोलिसच प्रत्यक्ष कायदा आणि सुव्यवस्थेचे काम करताना दिसतात. त्यामुळे दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी पोलिसांची इतर कामे बंद करणे गरजेचे आहे.
दिल्लीतील आजचा हल्ला कारवाईयोग्य गुप्तवार्तेचा (ऍक्शनेबल इंटेलिजन्स) अभाव असल्याने झाला आहे. गुप्तचर संघटना हल्ला झाल्यानंतर कोणी व कसा हल्ला केला असेल, याचा ऊहापोह करतात किंवा केवळ हल्ला होणार असल्याचे ऍलर्ट देत राहतात. हे केवळ तांत्रिक गुप्तवार्तेचा उपयोग केल्याने होते. मानवी गुप्तवार्तेच्या माध्यमातून हल्ल्याचे ठिकाण व वेळ मिळविण्यात या संघटना कमी पडतात. दिल्लीतील हल्ल्याच्या वेळीही सीसी टीव्ही कॅमेऱ्यासह सर्व तांत्रिक माध्यमे कमी पडल्याचेच अधोरेखित झाले आहे. अशा ठिकाणी नागरिकांची जबाबदारी वाढते. पोलिस व नागरिकांतील दुरावा संपल्यास व नागरिकांनी कोणतीही संशयास्पद हालचाल पोलिसांपर्यंत पोचविल्यास हल्ल्याचे प्रमाण नक्कीच कमी होऊ शकेल.
भारतामध्ये अडीचशे ते तीनशे स्लिपर सेल कार्यरत असल्याचे सांगितले जाते. साधारण चार ते दहा जणांचे एक सेल असते. बॉंबसाठीचे सामान गोळा करणे, ते जोडणे व ठिकाण ठरवून पळण्याचा रस्ता निवडणे अशी कामे या सेलकडून होतात. हे सर्व जण देशातच राहत असल्याने, त्यांना शोधण्यासाठी मानवी गुप्तवार्ताच सर्वाधिक प्रभावी ठरू शकते. मात्र त्यासाठी गुप्तचर संघटनांनी योग्य ठिकाणी शोध घेणेही गरजेचे आहे!
महाष्ट्रातही मोठ्या दहशतवादी हल्ल्यांची शक्यता आहे व त्यासाठी राज्यातील असलेली दीड लाख पोलिसांची संख्या पुरेशी आहे. मात्र, सर्व व्यवस्था भ्रष्टाचाराने पोखरलेली असल्याने तिला हल्ले रोखणे सोपे नाही. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला अशा हल्ल्यांची सवयच करून घ्यावी लागेल. पुण्यातला दगडूशेठ गणपती नवसाला पावतो म्हणतात. लोकांनी रोजी सकाळी एक नारळ घेऊन देवाकडे जावे व आमच्या शहरात बॉंबस्फोट घडू देऊ नको, असा नवस बोलावा...सामान्य माणसाच्या हातात माझ्या मते एवढेच शिल्लक राहिले आहे....
- हेमंत महाजन, ब्रिगेडिअर (निवृत्त)
आता जबाबदारी प्रत्येकाचीच..
दहशतवाद आपल्या घराच्या आत येऊन पोचला आहे, हे वास्तव आता तरी स्वीकारायलाच हवे. व्यक्ती, समाज आणि सरकारने आपापली जबाबदारी उचलायला हवी...
व्यक्ती
स्वतःच्या कुटुंबाच्या परिघापलीकडे विचार करण्याची गरज.शेजारीपाजारी, आसपासच्या इमारती, जवळचा भाग यावर लक्ष ठेवा. कान व डोळे उघडे ठेवा.सार्वजनिक कार्यक्रमांच्या निमित्ताने लोकांत मिसळा. समाजविघातक, देशविघातक प्रचार, हालचाली सुरू असतील तर पोलिसांना कळवा.सार्वजनिक ठिकाणी वावरताना सजग राहा, दक्षता बाळगा. कोणतेही ठिकाण लक्ष्य होऊ शकत असल्याने "इथे हल्ला होणे शक्यच नाही' असे गृहीत धरू नका. व्यवस्थेविषयी, यंत्रणांविषयी सामान्यांत असंतोष निर्माण करणे हाही या हल्ल्यांचा हेतू असल्याने पोलिस, सुरक्षा यंत्रणांवर अविश्वास दाखवू नका. त्यांना सहकार्य करा.
समाज
सार्वजनिक मंडळे, तरुणांचे गट, विद्यार्थी संघटना, स्वयंसेवी संस्था, विविध कामगार संघटना, धार्मिक-जातनिहाय संघटना, बॅंक कर्मचारी किंवा व्यावसायिकांच्या संघटना या मोठ्या समूहाच्या संपर्कात असतात. त्यांनी आसपास होणारे बदल टिपणे आवश्यक. पोलिस यंत्रणेवरील बंदोबस्ताचा ताण कमी करणे ही समाजाचीच जबाबदारी. समूहगटांनी आपापसांतील वाद शमविणे आवश्यक.तुम्ही सार्वजनिक वाहतुकीचा घटक (रिक्षा, टॅक्सी, बसचालक, बस-रेल्वे प्रवासी) असाल तर विशेष दक्ष राहा. संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाली टिपण्यात पोलिसांना तुमची मदत होऊ शकते.
सरकार
गेल्या काही वर्षांतील हल्ले स्थानिक "स्लीपर सेल'च्या मदतीनेच होत असल्याचे निष्पन्न झाले असल्याने पोलिसांची स्थानिक गुप्तहेर शाखा, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा, विशेष शाखा सक्षम करण्याची गरज.पोलिसांचे खबऱ्यांचे जाळे कमकुवत झाल्याचे गेल्या काही घटनांतून उघड. हे जाळे मजबूत करण्यासाठी नव्याने धोरण आखायला हवे.राज्य पातळीवर दहशतवादविरोधी पथक आणि गुन्हे अन्वेषण विभागात अधिक समन्वय हवा.राज्यांतील सुरक्षा यंत्रणा व राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांत ताळमेळ हवा.प्रतिक्रिया सामान्य जनतेने आता पुढे येऊन सरकारचे अस्त्र शस्त्र घेवून राजकारण्यांना आणि दहशतवाद्यांना मारून टाकले पाहिजे पहिले कॉंग्रेस ला हाकला परत सत्याग्रह करून election घ्यायला पाहिजे कॉंग्रेस सरकार नामर्द आहे त्यांना फक्त मते पाहिजेत काम नकोय कॉंग्रेस सरकार हाय हाय जे कुणी या सारख्या दहशतवाद्यांना मदत करत आहे त्यांना आधी फाशी द्या मग कोणीही त्या नालायकांना मदत करायला पुढे होणार नाही. पण आपले दुर्भाग्य कि इथे अफझल गुरु ला आणि कसाब ला फाशी मिळत नाही तर मदत करणार्यांना काय मिळणार जे कुणी या सारख्या दहशतवाद्यांना मदत करत आहे त्यांना आधी फाशी द्या मग कोणीही त्या नालायकांना मदत करायला पुढे होणार नाही. पण आपले दुर्भाग्य कि इथे अफझल गुरु ला आणि कसाब ला फाशी मिळत नाही तर मदत करणार्यांना काय मिळणार मला वाटते कि आपण ३-४ सैनिकांचे बलिदान देऊन खरच अफजल गुरूला पकडून चूक केली आहे, तो किती प्रामाणिक पायात्नक होता कि संसदेवर हल्ला करून मंत्री लोकांना मारायचा, खरच जर त्याने ते केले आस्ते तर आज सामान्य माणसे मेली नसती! आणि उरलेल्या पुढार्यांनी काहीतरी ठोस पावले जाती आणि धर्माचे राजकारण न करता उचलली असती. पुढील वेळी सानिकांनो २०-२५ सदस्य शहीद झाल्यावरच अफजलला पकडा आणि या देशातील सामान्य जनतेचे भले करा. काय बोलावे काहीच सुचत नाही....राजे तुम्ही पुन्हा जन्माला या एवढेच म्हणावेसे वाटते.....स्वप्नील,पुणे काय बोलावे काहीच सुचत नाही....राजे तुम्ही पुन्हा जन्माला या एवढेच म्हणावेसे वाटते.....स्वप्नील,पुणे एका अफजल च्या फाशीसाठी ११ जणांचे जीव गेले. कसाबसाठी आता किती जणांचे जीव जाणार. PC आता तरी कठोर निर्णय घ्या. जो पर्यंत आपले नाकर्ते नेत्यांना स्फोटाची झळ बसत नाहीत न ..तोपर्यंत हे असेच चालणार .....हल्लेखोरानो सामान्य माणसाला मारून ऐश करा .... सरकारला कशाची पण घाम नही. बांगड्या भरा या दळभद्री सरकारला. हे घुसखोर कुठून येतात ह्याचा सरकारने तपास केला पाहिजे. भारत आणि पाकिस्तान मध्ये रेल्वे पण चालते, त्यातून हे घुसखोर मोकाटपणे येत असतील. कशाला पाहिजे हि रेल्वे. देशामध्ये घुसखोर हाकलण्यासाठी उपक्रम राबवला पाहिजे. तसे केले तर खूप घुसखोर पकडल्या जातील. बाळासाहेबांनी राज्य असतांना बरेच घुसखोर हाकलून लावले होते. सरकारला काही करण्याची अजिबात इच्छाच नाही. घाला अजून त्याला बिर्याणी!. पंतप्रधान बांगलादेशहून आले. "बांगलादेशी नागरिक आता भारतात अधिकृतपणे २४ तास फिरू शकतील. बांगलादेशींना भारतात प्रवेश करण्यासाठी तिन बिघा भाग खुला करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा आज पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी येथे केली" असे लोकमत मध्ये वाचले. आधीच देशात ४कोटी बांगलादेशी घुसखोर देशात आहेत. तिन बिघा भाग खुला म्हणजे वोट बँकसाठीच. घुसखोरांचा नंदनवन म्हणजे भारत. आता तर बस झालेत. ह्या सरकारला मतपेटीतून हाकलून लावू या!.
On 08/09/2011 06:19 ?? chanu said:
On 08/09/2011 06:24 ?? chanu said:
On 08/09/2011 06:34 AM Amar said:
On 08/09/2011 09:02 AM madhuri b. said:
On 08/09/2011 09:11 AM kirti said:
On 08/09/2011 09:35 AM nehul said:
On 08/09/2011 09:36 AM swapnil said:
On 08/09/2011 09:37 AM swapnil said:
On 08/09/2011 10:17 AM Suhas said:
On 08/09/2011 10:28 AM azar jamadar said:
On 08/09/2011 10:29 AM azar jamadar said:

No comments:
Post a Comment