Total Pageviews

Monday, 16 May 2011

GOVERMENT GOES BONKERS OVER FUEL PRICING

विमानाचेे पेट्रोल दोन रुपयांनी स्वस्तजमिनीवरचे वार्‍यावर; हवेतले डोक्यावर सरकारचे डोके फिरले
मुंबई, दि. १६ (प्रतिनिधी) - एकीकडे सर्वसामान्य माणसाच्या स्कूटरमधील पेट्रोल तब्बल पाच रुपयांनी महाग करणार्‍या केंद्रातील कॉंग्रेस आघाडी सरकारचे हवेत उडणार्‍या धनदांडग्यांवरील प्रेम मात्र उफाळून आले आहे. पेट्रोल दरवाढीविरोधात जनतेचा देशभरात आक्रोश सुरू असतानाच सरकारने विमानाचे पेट्रोल तब्बल पावणेदोनहून अधिक रुपयांनी स्वस्त केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. श्रीमंतांवर सवलतीचा पाऊस पाडणार्‍या सरकारचा सर्वसामान्यांवर अन्याय का? या सरकारचे डोके फिरले आहे काय, असा संतप्त सवाल व्यक्त होत आहे.पेट्रोल दरवाढीविरोधात देशभरात ठिकठिकाणी जनतेने रस्त्यावर उतरून सरकारविरोधात ठणाणा केला आहे. सरकारने पेट्रोल रुपयांनी महाग केल्याने सर्वसामान्य जनतेचा प्रवास महागला आहे. कॉलेज आणि कामावर मोटारसायकलींनी जाणार्‍या विद्यार्थी आणि नोकरदारांना याचा मोठा फटका बसला आहे. बसचा प्रवासही महागणार असून वाहतूक महागल्याने जीवनाश्यक वस्तू भाजीपाल्याचेही भाव कडाडणार आहेत. मात्र सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याऐवजी सरकारने मिठाची गुळणी घेतली आहे. विशेष म्हणजे तोटा होत असल्याचा गळा काढणारे मनमोहन सरकार सर्वसामान्य जनतेला पिळून उद्योगपती आणि श्रीमंतांची कशी धन करीत आहे हेच विमानाच्या पेट्रोल स्वस्ताईवरून स्पष्ट झाले आहे. १० रुपयांचा फरक
विमानासाठी लागणार्‍या इंधनाचा दर (एव्हिएशन टर्बाईन फ्युएल) . टक्क्यांनी म्हणजेच रुपया ७६ पैशांहून अधिक स्वस्त केल्याची घोषणा केंद्र सरकारनेच केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे साध्या पेट्रोलपेक्षा विमानासाठी लागणारे पेट्रोल अधिक चांगल्या दर्जाचे असते. मात्र त्याची किंमत साध्या पेट्रोलपेक्षा १० रुपयांनी कमी आहे
 

No comments:

Post a Comment